तुमच्यातले शरीरसंबंध समाधानी नसतील तर तुमचं मन या १० ठिकाणी भरकटू शकतं.
टीम आपलं मानसशास्त्र
नियमितपणे शरीरसंबंध ठेवणे हे पती पत्नी यांच्यातील लैंगिक संबंधांचा अविभाज्य भाग असतो . हे खरे आहे. या एका गोष्टीवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. तुमचे मन , वर्तन , तुमचा मूड , तुमचे दैनंदिन काम , तुमचा उत्साह , अशा अनेक गोष्टींवर परिणाम होतो. तुमच्यातले शरीरसंबंध समाधानी नसतील तर तुमचं मन या १० ठिकाणी भरकटू शकतं.
१. मानसिक ताणतणाव वाढतो :
शरीरसंबंध जर नीट किंवा समाधानी असतील तर शरीरातील एंडॉर्फीन आणि आॉक्सीटॉसीन या हार्मोन्स चे प्रमाण वाढते आणि मानसिक ताण तणाव कमी होवून शांत झोप लागते.
याउलट जर शरीरसंबंध जर नीट किंवा समाधानी नसतील तर या हार्मोन्स मध्ये बिघाड होतो . आणि मानसिक ताण तणाव वाढतो, चिडचिडेपणा वाढतो. त्यातून शांत झोप ही लागत नाही. कारण मन सतत अस्वस्थ असते. शांत झोप नसेल तरी मन भटकू लागते. अगदी मग दुसऱ्यांची तुलना ही केली जाते.
२. लैंगिक समस्येतून मानसिक समस्या निर्माण होतात. :
कोणत्याही गोष्टीचा वापर केला नाही तर ठेवून ठेवून ती वस्तू खराब होते. समजा लोखंडी कुलूप वापरले नाही तर ते गंजून जाते आणि गरजेच्या वेळी त्याचा उपयोग करता येत नाही.
अगदी साधे बघा तुमचा मेंदू कार्यरत ठेवला नाही तरी त्याची कार्यक्षमता कमी होते. मग स्मरणशक्ती कमी होते. विसराळू वृत्ती वाढते.
तसेच जर दोघांच्या मध्ये शरीर संबंध नसतील किंवा समाधानकारक नसतील . तर ते करण्याची इच्छा कमी होवू लागते. एकमेकांना टाळू लागतात. त्यातून लैंगिक इंद्रियांची शक्ती, कार्य क्षमता ही कमी होते. आणि त्यातून मानसिक समस्या निर्माण होतात.
नकारात्मकता , आपल्या मध्ये उणिवा आहेत याची चिंता , ताण मनावर परिणाम करू लागते.
३. रोग प्रतिकारक शक्ती कमी होते आणि त्याचा परिणाम शरीरावर तर होतोच होतो पण मनावर अधिक होतो. :
जे नियमित शरीर संबंध ठेवतात. ज्यांच्या मध्ये खूप चांगले शारीरिक संबंध असतात . त्यांच्यात इम्युनोग्लोबीन ए चे प्रमाण वाढते. म्हणजेच antibodies वाढविण्याचे काम करते. किंवा रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करते. मात्र शारीरिक संबंध समाधानकारक नसतील, होतच नसतील तर हे इम्युनोग्लोबीन ए चे प्रमाण कमी होते. म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. आणि ती कमी झाली तर पटकन कोणतेही इन्फेक्शन होण्याचे, पकडण्याचे chances जास्ती असतात. त्यातून सतत शारीरिक दुखणी त्याचा परिणाम मनावर होत असतो. कित्येक वेळा औषधांना ही शरीर साथ देत नाही . त्यातून शारीरिक वेदना या वाढत असतातच. परंतु मानसिक निराशा येते. आपण सतत आजारी पडतो .काहीच उपाय नाहीत . किती ही औषधे घेतली तरी फरक पडत नाही. सतत त्रास मागे लागला ही नकारात्मक मानसिकता वाढत जाते. नकारात्मक विचारांकडे मन भरकटू लागते.
४. कामात एकाग्रता होत नाही:
तुमच्यातले शरीरसंबंध समाधानी नसतील तर तुमचं मन स्थैर्य राखू शकत नाही..सतत चंचलता , अस्वस्थता जाणवते राहते.
आणि बरेचवेळा मग सतत मन चांगले शारीरिक संबंध कसे प्रस्थापित होतील , किंवा त्याकरिता काय करावे लागेल यातच गुरफटून जाते. आणि कामाच्या वेळी देखील कामात लक्ष न लागता ,मन एकाग्र न होता ते शारीरिक संबंधांच्या विचारातच भरकटू लागते.
५. एकटेपणाची भावना :
शारीरिक संबंध जर समाधानकारक नसतील तर मनातून सतत एकटेपणाची भावना वाटू लागते. बरेचवेळा तसे नसते ही. पण मन मात्र विचलित होवून भरकटू लागते.
विनाकारण एकटेपणाची भावना निर्माण होते. मनात आपले कोणी नाही हेच विचार रुजत जातात. जे एकेमकांच्या संबंधांना अजून हानिकारक असतात. त्यातून मन आणि शरीर यात अजून दुरावा ही निर्माण होतो.
६. शरीर संबंध समाधानकारक नसतील तर एकमेकात नक्कीच काही उणिवा आहेत त्याचमुळे संबंध समाधानकारक नाहीत हेच विचार मनात पक्के होवू लागतात. आणि बरेचवेळा असे होते की , शरीर संबंध ठेवताना असे वाटते की जावू दे कशाला ते ठेवायचे त्यातून समाधान नाहीच मिळत. नकोच ते ..त्यापेक्षा काही करायलाच नको असे विचार करून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापासून मन विरोध करू लागते. आणि बरेचवेळा नसलेल्या दोषा मध्ये आणि उणिवा आहेत त्यावर उपाय ही नाहीत अशा विचारात भरकटू लागते.
७. शरीर सबंध समाधानकारक नसतील तर जोडीदारावर संशय ही घेतला जातो.
एकदा , दोनदा असेल किंवा वारंवार जर शरीर संबंध हे समाधान देत नसतील तर जोडीदाराचे बाहेर काही आहे का? या विचाराने मन भरकटू लागते. आणि काही गोष्टीत सतत वॉचमन सारखे लक्ष ठेवून , पुरावे गोळा करण्याकडे , मग ऑफिस मध्ये उशीर झाला कधी येण्यास उशीर झाला तरी मग मनात संशय येवून भरकटू लागते.
८. नशिबाला दोष देत राहायचे :
आता खर तर शरीर संबंध हे समाधानकारक नसतील तर घरचे वातावरण , एकमेकांच्या गरजा , नावीन्य आवश्यकता ,आवड निवड दोघांना मिळणारा एकांत , वेळ , जागा , घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्ती , अशा अनेक कारणांमुळे गोष्टीवर अवलंबून असते.
परंतु मनातून उगीच च माझे नशीबच असे . माझ्या नशिबात सुखच नाही . असे काहीही असंबंध विचार मनात आणून, करून उगीच नशिबाला दोष देत राहायचे. जेणेकरून अधिकाधिक negativity ही येत राहील. यातही परत माझेच नशीब असे. इतरांचे असे याची तुलना करून विचार मन हे मूळ मुद्दा सोडून भरकटू लागते.
९. बरेचवेळा जोडीदार बदल करण्याचे विचार मनात येवू लागतात. : घटफोटाचे विचार ही मनात येवू लागतात.
शारीरिक संबंध जर समाधानकारक नसतील तर हा जोडीदार नकोच , बदलून टाकू जोडीदार , किंवा मग एखादी आवडती व्यक्ती असेल तर तिच्याकडे आकर्षित होवून ती आपल्याला जास्त सुख देईल. तेच मिळवू असे काही विचार मन करून केवळ आपला विचार करण्यात गुंतून जाते. काही वेळेस मग तशी कृती ही घडते. थोडक्यात स्वतच्या जोडीदारासोबत पटत नाही, समाधान नाही म्हणून दुसऱ्यात शोध घेण्याच्या विचारात भरकटू लागते. आणि तेल गेले तूपही गेले असेच बरेचवेळा होते.
१०. दोषारोप करणे सुरू होते : वाद घालण्याकडेच कल :
सुरुवातीला काही काळ एकमेकांना समजून घेवून पुढे जाणे हितावह असते. परंतु काही वेळेस एकमेकांचे खूप जास्त आकर्षण वाटून खूप घाईने शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. पण ते मनासारखे नसतात अशा वेळी एकमेकावर दोषारोप च केले जातात. आणि मनातून सारखे हेच विचार येतात की वाद घालण्यासाठी काय कारणे काढता येतील. याचेच विचार करण्यात वेळ जातो आणि मूळ मुद्दा जो असतो शरीर संबंध चांगले प्रस्थापित ठेवण्यासाठी चे प्रयत्न यापासून मन विचलित होत राहते..भरकटू लागत. दोषारोप म्हणजे दुसऱ्याची चूक आहे हेच विचार येत राहतात.
यावर solution राहिले बाजूला पण वाद घालून ते चुकीचे विचार मनात आणून , सुधारणा राहिले बाजूला पण जोडीदाराची चूक असे पटविण्यात वेळ आणि विचार , energy खर्च होते.
स्वप्नांची दुनिया , काल्पनिक जीवनात जगण्याची सवय लागते .. विचार येत राहतात :
आपल्या मनात पूर्वीपासून काही विचार , कल्पना असतात की आपले शरीर संबंध असे असावेत आणि ते प्रत्यक्षात नाही आले तर आहे त्याचा स्वीकार करून , बदल किंवा वास्तवात जगण्याचा प्रयत्न केला जात नाही. दिवास्वप्न यातच रमले जाते.
जेव्हा प्रत्यक्षात शारीरिक संबंध चांगले , समाधानकारक नसतील तर मनात उगीच च काही स्वप्ने बघितली जातात. किंवा काल्पनिक जीवन जगले जाते. मन सतत कल्पनाविश्वात भरकटू लागते. त्यातून वास्तवाचा स्वीकार करणे अवघड जाते. मग एकमेकात शारीरिक उणिवा च आहेत इथपासून एकमेकांवर अविश्वास दाखवून मन निरोगी गोष्टीपासून भरकटत मनाला हळूहळू अविश्वास , संशयाची कीड लागते. आणि ती वेळीच नाही थांबविली तर रूपांतर उदासीनता , नैराश्य यात अडकून भरकटत जाते.
काही वेळेस सतत चंचल वृत्ती वाढते. चिंता वाढते. चांगले शरीर संबंध नाही झाले तर त्यांची विवाह संस्था च चुकीची असे विचार येवून मनाची अशांतता वाढवतात. मूड disorder चे प्रमाण वाढते. घटकेत एका मूड मध्ये तर दुसऱ्या क्षणी दुसऱ्या मूड मध्ये असे विक्षप्त वागणे होते.
तुमच्यातले शरीरसंबंध समाधानी नसतील तर तुमचं मन या १० ठिकाणी भरकटू शकतं.
म्हणून वेळीच विवाह मार्गदर्शन घ्या , सल्ला घ्या , लग्नापूर्वी सल्ला घ्या. त्यातून त्यात लग्नानंतर बिघडते . एकमेकांचे स्वभाव, काळजी घेणे आपुलकी वाटणे , या अपेक्षा असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत तर ताण तणाव , चिंता , अस्वस्थता, उदासीनता या चक्रात मन भरकटू लागते.
तुमच्यातले शरीरसंबंध समाधानी नसतील तर तुमचं मन तुमच्या ताब्यात असणे गरजेचे असते. मनाला स्थिरता प्राप्त करून देणे गरजेचे आहे. त्यामुळे सगळ्याच वर उपाय म्हणजे शारीरिक फिटनेस , मानसिक फिटनेस राखणे, योगा , प्राणायाम , एकाग्रता वाढविणे या गोष्टी जरूर कराव्यात.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👌👌👌👌👍🏻
Very nice