Life खूप सोप्पी होईल, जेव्हा तुम्ही चीड निर्माण करणाऱ्या घटनांना, व्यक्तींना दुर्लक्ष करायचं शिकाल.
पुजा सातपुते
आपलं आयुष्य आपण सुरळीतपणे जगायचा खूप प्रयत्न करतो. पण कधी कधी असे काही प्रसंग येतात, अशी काही लोकं भेटतात जी आपल्या मध्ये चीड निर्माण करायचा प्रयत्न करतात. काही जण असतात जे स्वतः शांतपणे जगत नाहीत आणि दुसऱ्यालाही शांतपणे जगू देत नाहीत.
अशा लोकांमुळे आपल्या आयुष्यात अश्या काही घटना घडायला लागतात ज्याने आपली चिडचिड व्हायला लागते. आपल्यामध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये नेगेटिव्ह बदल होतो, सगळ्यांशी भांडण करायला लागतो, आपल्या आयुष्यात अशांतता पसरते आणि मग आपलं आयुष्य आपल्याला कठीण वाटायला लागतं.
अशा व्यक्तींपाई किव्हा अशा घटनांपाई आपल्या मध्ये व आपल्या आयुष्यामध्ये चुकीचा बदल होऊ लागतो. त्यापेक्षा जर आपण अशा लोकांकडे किव्हा अशा घटनांकडे दुर्लक्ष करायला शिकलो तर आपलं life किती सोपं होईल. खूपदा आपण परिस्थिती किव्हा समोरच्या व्यक्तींना समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण सतत त्याच गोष्टी घडत राहिल्या तर चिडचिड ही होतेच. पण ही अशी लोकं आपण कितीही प्रयत्न केला तरी सुधारत नसतात. म्हणून अशा वेळी आपण सेल्फिश बनायचं आणि आपल्या तब्येतीसाठी अश्या व्यक्ती किव्हा कुठली घटना योग्य नसेल तर त्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं.
तुम्ही जर विनाकारण सहन करत राहिले तर अशा लोकांना त्याची सवय लागत जाणार आणि यामुळे तुमचं आयुष्य जरी खराब झालं तरी त्यांना काहीही फरक पडणार नाही. म्हणून जेव्हा तुम्ही दुर्लक्ष करायला शिकाल आणि स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायला शिकाल, तुमच्या आयुष्यात कुठलाही नेगेटिव्ह बदल होऊ नाही दिलात तर आपोआपच अशी लोकं व्यवस्थित वागायला लागतील किव्हा तुमच्या आयुष्यातून निघून जातील.
कधीही कोणामुळेही स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नका. एवढं सुंदर आयुष्य कुठल्यातरी वाईट परिस्थितीमुळे किव्हा वाईट व्यक्तींमुळे बदलू देऊ नका. प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. तुमचं चांगलं नशीब खराब होऊ देऊ नका. आपल्यात जर नेगेटिव्ह बदल झाला तर आपले जे खास लोकं असतात ना त्यांना जास्त दुःख होतं आणि आपण त्यांच्यापासून दुरावतो. म्हणून हे आपल्या वर अवलंबून आहे की आपण कोणाला आणि कुठल्या घटनेला किती महत्व द्यायचं ते.
आयुष्य खूप मोठं आहे आणि चांगल्या वाईट गोष्टी या घडत राहणार. जर प्रत्येक गोष्टीमुळे तुम्ही तुमचं डोकं खराब करून घेतलं तर कधीच तुम्ही तुमचं आयुष्य आनंदात जगू शकणार नाही आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही खुश ठेवू शकणार नाही. अश्यानी त्यांच्यातही चिडचिडेपणा निर्माण होईल. म्हणून हे तुमच्या मनावर आहे, एक चांगलं एक्साम्पल सेट करायचं का विनाकारण ड्रामा क्रीएट करत राहायचा.
कधी कधी अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष केलं आणि चीड निर्माण करणाऱ्या घटनांना आपल्या आयुष्यात स्थान नाही दिलं तर आपलं life खूप सोप्पं आणि आनंदी बनतं. एक पॉसिटीव्ह विचार आपल्यात बराच बदल आणू शकतो. जर आपण कुठली गोष्ट खूप घट्ट पकडून ठेवली तर आपल्याच हातांना त्रास होणार. तसंच आपल्या मेंदूचही आहे. तोच तोच विचार करत राहिलो तर चिडचिड ही होणारच.
त्यापेक्षा प्रॉब्लेम काय आहे तो समजून घ्या. समोरची व्यक्ती खरंच प्रॉब्लेम मध्ये आहे तर त्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्न नक्की करा. पण त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव तसाच असेल तर सरळ इग्नोर करायला शिका. तुमचा बराच मौल्यवान वेळ वाचेल आणि त्या वेळेत तुम्ही स्वतःसाठी बऱ्याच चांगल्या गोष्टी करू शकाल.
आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदरच ठेवा. कुठल्या गोष्टीमुळे किव्हा कोणामुळेही तुमच्यात नेगेटिव्ह बदल होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जा. स्वतःला चांगल्या कामात गुंतवा, वाचन करा, कुठेतरी छान ठिकाणी फिरायला जा, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा जे तुम्हाला मोटिवेट आणि इन्स्पायर करतात आणि चीड निर्माण करणाऱ्या व्यक्तींपासून आणि घटनांपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहायचा प्रयत्न करा. आपोआपच तुमचं life तुम्हाला सोप्पं वाटायला लागेल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Nice