स्वतःबद्दल शंका घेणे बंद करणे म्हणजे तुमच्यातल्या क्षमतांना वास्तवात येण्याची संधी मिळणे.
हर्षदा पिंपळे
‘आकाश’ नावाचा मुलगा नुकताच गावाकडून शहराकडे आलेला होता.गावाकडे होता तेथे तो अगदी बिंधास्त वागायचा. न अडखळता बोलायचा. स्वतःची मतं स्पष्टपणे मांडायचा. पण तो शहरात आला तसा फारच बदलला. शहरातील वातावरण त्याला फारसं काही रूचलं नाही.शहरातील वातावरणात तो काही रूळायला तयारच नव्हता.शहरातील राहणीमान, दुसऱ्या मुलांची बोलण्याची, राहण्याची शैली पाहून तो फारच बदलला.
बिंधास्त असणारा आकाश त्यावेळी मात्र बुजरा झाला.बोलताना त त पप करू लागला.गावच्या स्पर्धेत फडाफडा भाषण करणारा आकाश शहरातील कॉलेजच्या आवारातच बोलायला घाबरत होता.शहरात माझा टिकावच लागू शकत नाही असं त्याने मनाशी ठरवूनच टाकलं होतं. न जाणे का पण तो स्वतःवरच शंका घेऊ लागला.”मला हे जमणार नाही. हे माझं काम नाही. मी किती गावठी बोलतो.
इथली लोकं किती शुद्ध बोलतात. फाडफाड इंग्रजी बोलतात.त्यांना नाचण्यापासून गाण्यापर्यंत सगळं येतं.पण मी ? मला मात्र काहीच येत नाही. माझ्यात तितका कॉन्फिडन्सच नाही.” अशा गोष्टी तो स्वतःशीच बोलायला लागला.शेवटी काय झालं तर त्याच्यातील सुप्त गुणांचा विकास हा झालाच नाही.तो लाजरा-बुजराच राहिला.स्वतःला कमी लेखून त्याने फार मोठी चुक केली होती.त्याच्या अशा वागण्यामुळे त्याच्यातील क्षमतांना कधीच वास्तव रूप मिळालं नाही.
शेवटी कुणालातरी याचा अंदाज आला.वाईट काळात कुणीतरी आपल्याला मोटीवेशन देण्याची किंवा साथ देण्याची गरज असते तशीच साथ कॉलेजमध्ये असणाऱ्या एका तरूणाने आकाशला साथ दिली. त्यानेच आकाशला मोटीवेट केलं.स्वतःवर शंका घेणं किती वाईट असू शकतं याची जाणीव त्याने आकाशला करून दिली.
.”तु गावाकडून आलास म्हणून काय झालं ?अरे तुझ्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची क्षमता आहे. त्यांना वास्तव रूप मिळायला हवं नं ? तुझ्या नावीन्यपूर्ण कल्पना इतरांनाही कळायला हव्यात नं ?मग स्वतःवर शंका घेऊन कसं बरं चालेल?” अशाप्रकारे त्याने आकाशला समजावलं. त्याच्यातील क्षमतेची जाणीव करून दिली.
त्या मुलाने समजावलं म्हणून आकाशच्या डोक्यात उशिरा का होईना पण प्रकाश पडला.आकाशने स्वतःवर शंका घेणं हळुहळू बंद केलं.तो स्वतःला प्रत्येक गोष्टीत शोधू लागला.कल्पकतेने विचार करू लागला.त्यासाठी प्रयत्न करू लागला.कालांतराने आकाशने त्याची जवळपास अर्धी स्वप्नं पूर्ण केली होती. गाव आणि शहर , शुद्ध आणि अशुद्ध असं काहीही नसतं हे त्याने accept केलं होतं. आपल्या क्षमताच आपलं अस्तित्व ठरवतात हे त्याला पटलं होतं.
तर…तुम्हीही स्वतःवर शंका घेताय ?
मित्रांनो, आयुष्यात प्रत्येकाची काही ना काही स्वप्न असतात. इच्छा असतात. आणि ते करण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड चालू असते.पण कधी कधी काय होतं की आपणच आपल्यावर शंका घेत राहतो.आपल्याला जमेल का? याआधी कधी मी काही केलं नाही वगैरे असं आपण बोलतो.हे माझं काम नाही असं म्हणून आपण ते टाळतो. आणि यामुळे काय होतं तर आपण स्वतःतील क्षमतांना आधीच जाळून टाकतो.
त्या ओळखून त्यांना वास्तव रूप द्यायचं सोडून भलताच विचार करत राहतो. पण मित्रांनो, हे असं किती काळ चालत राहणार ? त्यापेक्षा स्वतःवर शंका घेणं आधी बंद करायला शिका.आपण करू शकतो,आपण कुठलीही अशक्य गोष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करू शकतो असा विश्वास ठेवा.जे काही करावसं वाटतय ते बिंधास्त करण्याला प्राधान्य द्या. कारण,शंका घेत राहिलात तर स्वतःतील क्षमतांना ओळखणं दूरच राहील. त्यांना वास्तव रूप मिळणही कठीण होऊन जाईल.
समोर धावायची स्पर्धा असते आणि आपली इच्छा असूनही आपण धावत नाही. कारण काय तर स्वतःवरच शंका घ्यायची.’धावताना पडेन,मी हारेन वगैरे वगैरे शंका घेऊन आपण धावनं cancle करतो.
काय मिळतं शंका घेऊन ?
अपयश, नाराजी, निराशा असच काहीसं हातात येतं.त्यापेक्षा शंका घेणं वेळीच थांबवा. आणि एकच लक्षात ठेवा की,स्वतःबद्दल शंका घेणे बंद करणे म्हणजे तुमच्यातल्या क्षमतांना वास्तवात येण्याची संधी मिळणे.
काय मग क्षमतांना वास्तवात येण्याची संधी देणार नं ?
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खूप छान
आपलं मानशास्त्र मुळे मी भरपूर सुधरलोय मानसिक त्रास खूप कमी झालाय tnx मानशास्त्र
आणि अगोदर नवीन लेख आला कि whatsapp ग्रुपवर यायचं ते कृपया चालू करा कारण काही लेख हे निघून जातात.