Skip to content

प्रेमात असाल तर त्यांच्या आनंदी जीवनासाठी प्रार्थना करा, पण ते प्रेम मिळवण्याचा अट्टाहास नको.

प्रेमात असाल तर त्यांच्या आनंदी जीवनासाठी प्रार्थना करा, पण ते प्रेम मिळवण्याचा अट्टाहास नको.


पुजा सातपुते


प्रेम म्हणजे काय असतं……. ♥

चातकाला पावसाशी असतं,

टापोर्‍या दव बिंदूला गवताच्या पात्याशि असतं.

प्रेम म्हणजे काय असतं.

जे चंद्राला चांदण्यांशी असतं,

इंद्रधनुष्याला क्षीतिज्याशी असतं,

सळसळणार्‍या वार्याला गर्जणार्‍या ढगांशी असतं.

प्रेम म्हणजे काय असतं.

जे फुलपाखराला फुलाशि असतं,

काजव्याला घनदाट अंधाराशी असतं,

गुणगुणनार्‍या पतंगाला मीणमिणत्या दिव्याशी असतं.

प्रेम म्हणजे काय असतं.

जसं सुखाला दुःखाशी असतं,

हसण्याला रडण्याशी असतं,

रात्रीच्या अंधाराला सकाळच्या उजेडाशी असतं.

प्रेम म्हणजे काय असतं.

जे हळूवार जपायचं असतं,

हृदयात साठवून ठेवायचं असतं,

कितीही दुःख झालं तरी हसत जगायचं असतं,

प्रेम म्हणजे काय असतं.

जे फक्त शेवटपर्यंत…

तिच्यात आणि आपल्यात असतं

त्याच्यात आणि आपल्यात असतं…..

कवी कुसुमाग्रजांची ही कविता मनाला किती भिडते ना?

प्रेम म्हणजे नक्की काय असतं आणि का बरं होतं याचं उत्तर खरं म्हणावं तर कधीच कोणाला सापडलं नाही आहे. का एखाद्या व्यक्ती विषयी आपल्याला वेगळं वाटतं. ती व्यक्ती आपल्याला हवी हवीशी वाटते. त्या व्यक्तीचं स्वप्न आपण बघत राहतो. त्या व्यक्ती शिवाय आपण राहूच शकत नाही असं वाटायला लागतं. प्रेम किती निर्मळ भावना आहे ना आणि ते सांगून होत नसतं.

बरेचदा असं होतं की आपल्याला एखादी व्यक्ती आवडते, हळू हळू त्या व्यक्तीचं आकर्षण व्हायला लागतं आणि आकर्षणाचं रूपांतर प्रेमात होतं. आता प्रेम हे दोघांच्या संमतीने असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर ते एक तर्फी असेल तर मग मन दुखावलं जाण्याचे चांसेस जास्त असतात. आपल्या सारखीच भावना त्या व्यक्तीची नसली तर दुःख होतं, प्रेम भंग झाला असं वाटायला लागतं, त्याचं रूपांतर डिप्रेशन मध्ये होतं आणि त्यात एक तर आपल्या स्वतः बद्दलचा कॉन्फिडन्स कमी होतो किव्हा क्रूरतेचि भावना निर्माण होते. क्रूरता निर्माण झाली की सूड घ्यायला कुठल्याही थराला जाण्याची वृत्ती निर्माण होते.

प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. तुम्हाला कोणाविषयी प्रेम वाटत असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा तसंच वाटत असणार असं तर होऊ शकत नाही ना. आपली भावना त्या व्यक्तीसमोर जरूर व्यक्त करा पण जर ती भावना रेसिप्रोकेट नाही झाली किव्हा त्या व्यक्तीला तुमच्यासाठी तशीच भावना वाटत नसेल तर विनाकारण स्वतःचं व त्या व्यक्तीचं आयुष्य खराब करू नका.

एखाद्याच्या खऱ्या प्रेमात असाल तर त्याच्या आनंदी जीवनासाठी प्रार्थना करा, पण ते प्रेम मिळवण्याचा अट्टाहास करू नका, त्यातनं काहीच निष्पन्न होत नाही. जर हट्ट करून तुम्ही ते प्रेम मिळवलं तरी सुद्धा तुम्ही कधी खुश राहू शकणार नाही. तुमच्याबरोबर तुम्ही त्या व्यक्तीलाही आयुष्य भरासाठी दुःखी ठेवाल. प्रेम हे जबरदस्तीने होत नसतं आणि जबरदस्तीने केलेलं प्रेम हे कधीही टिकत नसतं.

निसर्गाने प्रत्येकासाठी कोणीना कोणीतरी बनवलं आहे आणि योग्य वेळी ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते. एकानी तुमचं प्रेम नाही स्वीकारलं याचा अर्थ कधीच कोणी तुमच्यावर प्रेम करणार नाही असा होत नसतो आणि रिजेकशनमुळे जर तुमच्यात सुडाची भावना निर्माण झाली तर याचा अर्थ तुम्हाला त्या व्यक्तीवर खरं प्रेम कधी झालंच नाही असा होतो. कारण तुम्ही जेव्हा कोणावर खरं प्रेम करता ना तर त्या व्यक्तीला कधीच कुठलं दुःख तुम्ही देऊ शकणार नाही. खरं प्रेम असेल तर नेहमी त्या व्यक्तीच्या सलामतीसाठी तुम्ही प्रार्थना करणार.

आपलं आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि योग्य वेळी योग्य त्या घटना घडत असतात, योग्य व्यक्ती आपल्या जीवनात येत असतात आणि काही व्यक्ती जात असतात. जाण्याचं दुःख जरूर होतं पण निसर्ग तुम्हाला पुढच्या संकटातून वाचवत असतं. म्हणून एखाद्याच्या खऱ्या प्रेमात असाल तर त्याच्या आनंदी जीवनासाठी प्रार्थना करा, पण ते प्रेम मिळवण्याचा अट्टाहास करू नका. जर ते तुमच्या नशीबात असेल तर ते नक्की तुम्हाला मिळणार आणि नाही मिळालं तर निसर्गाची मर्जी समजून पुढे जा. डिप्रेस होऊन स्वतःचं आयुष्य संपवू नका किव्हा रागात येऊन समोरच्याचं आयुष्य खराब करू नका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “प्रेमात असाल तर त्यांच्या आनंदी जीवनासाठी प्रार्थना करा, पण ते प्रेम मिळवण्याचा अट्टाहास नको.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!