तुमच्या मनाला ट्रेन करा, प्रत्येक परिस्थितीत चांगलं काहीतरी दिसण्यासाठी!
मेराज बागवान
परिस्थिती नेहमी सारखी नसते.कधी सुख असते, तर कधी दुःख.ऊन-सावली चा हा खेळ कायम सुरूच असतो.काही काही वेळेस तर, दुःखाचे डोंगर एकामागोमाग उभे राहतात.वाईट परिस्थिती येते.अत्यंत बिकट काळातून जावे लागते.
पण हे असे फक्त तुमच्या एकट्याच्या बाबतीत होते असे नाही.किंबहुना,ह्याहून अत्यंत भयंकर परिस्थिती जगातील कित्येक लोक रोज पाहत असतात.आणि तरी देखील ते जगत असतात.म्हणूनच,किती जरी परिस्थिती नकारात्मक असेल तरी देखील,तुमच्या मनाला असे ट्रेन करा की प्रत्येक परिस्थितीत तुमचे डोळे चांगले आणि चांगलेच पाहतील.
आयुष्यात अनेक घटना,गोष्टी घडत असतात.कधी कुणाचे आजारपण ,तरी कधी आर्थिक संकट.कधी नातेसंबंधांमधील ताण-तणाव तर कधी करिअर मधील अडचणी.एक ना अनेक गोष्टी होत असतात.पण ह्या सगळ्यात तुम्ही तुमचे मन खचू दिले नाही पाहिजे.कारण मन जरी अदृश्य असले तरी देखील खूप मोलाचे काम करीत असते.आयुष्याला कलाटणी देण्याचे काम तुमचे मन करते.तुम्ही जसा विचार कराल तसे ते वागत असते.म्हणूच तुमचे मन असे ट्रेन करा की त्या मनाला प्रत्येक परिस्थिती चांगले काही ना काही दिसेलच.
‘जे होते ते चांगल्यासाठीच’ हे वाक्य कायम मनावर बीमबवा. हवे तर रोज हे वाक्य स्वतःशी म्हणा.याने नक्की फरक पडेल.एक नवीन दृष्टिकोन मिळेल.आणि मग तुमचे मन आपोआप नेहमी चांगलाच विचार करेल.मग जरी वाईट काही झाले तरी त्याची दुसरी चांगली बाजू तुमचे मन आपसूकच शोधू लागेल.
कधी कधी तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागतात.कधी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. पण दुसरीकडे, तुमच्या ह्या त्यागामुळे कुणाचे तरी चांगले होत असे.आणि तुमच्यामुळे कुणाचे तरी चांगले होत आहे, हे इतर कुठल्याही गोष्टींपेक्षा खूप महत्वाचे असते.आणि यामुळेच तुमच्या मनाला तुम्ही ह्याच गोष्ट ट्रेन करा.
कधी एखादे नाते तुमच्यापासून कायमचे दुरावते.एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून जाते.कारण काहीही असो,पण यामुळे तुम्ही दुःखी नक्की होतात.पण ह्या घटनेमुळे दुसरीकडे तुमचे तुमच्या स्वतःशी एक खूप सुंदर नाते तयात होऊ लागते.तुम्ही खूप संयमी बनू लागतात.वास्तव स्वीकारतात. आणि एक बळकट व्यक्तित्वाकडे तुमची वाटचाल सुरू होते.आणि ह्यालाच म्हणतात, ‘वाईटातून चांगले काहीतरी घडणे’.
परिस्थिती कशीही असेल तरी तुमचे मन इतके कणखर असले पाहिजे की , त्या परिस्थितीचा दुसऱ्या कोणत्याच गोष्टीवर परिणाम नाही व्हायला हवा.तुमचे मन नेहमी ‘न्यूटरल’ असले पाहिजे.म्हणजेच मन स्थिर असणे गरजेचे आहे.आणि एकदा का तुम्ही तुमच्या मनावर, भावनांवर नियंत्रण मिळवले की परिस्थिती कशीही असो, सर्व काही ठीकच होत असते.
परिस्थिती नेहमी तुमची परीक्षा घेत असते.त्यामुळे तुम्ही नेहमी असे वागले पाहिजे की , पेपर कितीही कठीण असो, विजय फक्त आणि फक्त तुमचाच व्हायला हवा ना की परिस्थितीचा. प्रत्येक परिस्थितीत चांगलं काहीतरी असतंच हा विश्वास प्रथम मनात बाळगा.त्यानंतर त्यावर शांतपणे विचार करा.’जे होत आहे ते माझ्या चांगल्यासाठीच’ हा विचार कायम मनात ठेवा. मी ह्या परिस्थितीवर मात करेन, ही परिस्थिती मला आयुष्याचा नवीन दृष्टिकोन देत आहे. मला कणखर बनवत आहे हा विचार नेहमी करा.
असे हे सर्व ट्रेनिंग जर का तुम्ही तुमच्या मनाला दिले तर मग कोणतीच परिस्थिती तुम्हाला हरवू शकत नाही.कोणतीच परिस्थिती तुमचे काहिच बिघडवू शकत नाही.फक्त या साठी गरज आहे ती आशा ‘माईंड सेट’ ची जे नेहमी प्रत्येक गोष्टीत चांगलेच बघेल.
मनाचा दृष्टिकोन बदला,सर्व काही बदलेल,बहरेल…..
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
