Skip to content

तुम्हाला माहितीये का, साधं जगणं हे आपलं आयुष्य आनंदी बनवतं.

तुम्हाला माहितीये का, साधं जगणं हे आपलं आयुष्य आनंदी बनवतं.


अपर्णा कुलकर्णी


बाबा, काहीही झालं तरी तुम्ही इतके नॉर्मल कसे रिॲक्ट होऊ शकता ?? नाही मला काही समजतच नाही. मी खूपदा विचारता विचारता राहून गेलो पण आज माझ्या गाडीचे लोन कॅन्सल झाले हे ऐकून पण तुम्ही पेपर वाचत बसला आहात ?? आपल्या मुलाचे नव्या गाडीचे स्वप्न स्वप्नच राहिले याचे तुम्हाला काहीच कसे वाटत नाही बाबा ?? मला कमाल वाटते सगळ्या गोष्टींची. आई तू तरी बोल ना बाबांशी, वेदांत तणतणत घरात निघून गेला. इकडे विनायकराव मात्र पेपर वाचत गालातल्या गालात हसत होते.

अरुणाताई विनायकरावांसाठी चहा घेऊन आल्या आणि म्हणाल्या आज वेदांत खूपच त्रागा करून ऑफिसमध्ये गेला आहे. तुम्हाला तो बरेच प्रश्न विचारत होता पण तुम्ही काहीच का बोलला नाहीत ?? अग अरुणा तो खूप चिडलेला होता, मी त्याला समजवायला गेलो असतो तर त्याला माझे म्हणणे पटल नसते. म्हणून मी काहीच बोललो नाही. जरा त्याच डोकं शांत होऊदे मग बोलतो. बोलत असतानाच विनायकरावांचे लक्ष दाराकडे गेले आणि आपल्या लाडक्या लेकीला आलेले पाहून ते आनंदी झाले.

वनिताला गावातच दिले होते. तिचे लव मॅरेज झाले होते. वानिताचा नवरा अंकित लेक्चरर होता आणि स्वतःचे घर शेती सगळेच होते. शिवाय निर्व्यसनी आणि शांत स्वभावाचा होता. त्यामुळे विनायक रावांनी विरोध. न करता त्यांचे लग्न लावून दिले होते. पण आज वनिता मात्र खूप अस्वस्थ आणि चिडलेली होती. घरात येताच डोकं दुखतंय अस सांगून रूममध्ये जाऊन पडली होती. विनायकराव मात्र मुलांचं वागणं बघुन जरा विचारात पडले होते. सकाळी वेदांत आणि आता वनिता चिडून बसले होते. अरुणाताई मात्र चांगल्याच अस्वस्थ झाल्या होत्या. त्यांची अवस्था पाहून विनायक रावांनी कशीबशी त्यांची समजूत घातली आणि मी दोघानाही समजावून सांगेन असे वचन दिले.

मुलगी घरी आल्यामुळे अरुणाताईंनी सगळे पदार्थ वनिताच्या आवडीचे बनवले होते. सगळ्यांची जेवणे झाली आणि विनायकराव आपल्या दोन्ही मुलांच्या आवडीचे आईसक्रीम घेऊन आले. दोघेही खूप खुश झाले. सगळेच एकत्र आईसक्रीम खात बसले होते. वनिता आणि वेदांत दोघांचाही मुड छान होता आणि हीच संधी विनायकराव शोधत होते.

मग ते म्हणाले, वनिता तू आज जावई बापूंना भांडून का आलीस ते समजले मला. जावई बापूंना फोन केला होता मी. हो मला वाटलच होत बाबा, तो तुम्हाला फोन करून चाड्या सांगणार वनिता म्हणाली. त्यावर विनायकराव म्हणाले, ते काहीच सांगायला तयार नव्हते पण तू इथे आलीस तेंव्हाच मला अंदाज आला होता आणि तोच मी त्यांच्या समोर व्यक्त केला आणि त्यांनी संमती दर्शवली.

जरा विचार कर वनिता, लग्न झाल्यापासून केवळ आणि केवळ तुझ्या हट्टपोटी जावई बापूंनी कार घेतली, एसी बसवून घेतला, फर्निचर केले, अजून जमीन घेतली ती ही तुझ्याच नावे केली आणि आता तू डायमंड नेकलेस हवाय म्हणून वाद घालून आलीस. मान्यच आहे मला अंकितराव सधन आहेत पण त्यांनाही त्यांची काही जबाबदारी, भावाचे शिक्षण आणि बाकीही व्याप आहेतच की. तू जितक्या अपेक्षा आणि सुखसोयीची मागणी करशील ती त्याच वेळी पूर्ण होईल असे नाहीच आणि तसे व्हायला ही नकोच. नाहीतर तुझी गरज आणि त्यांची यादी कधी संपणारच नाही.

वेदांत तुला गाडी घ्यायची होती त्यासाठी तू लोन प्रोसेस करत होतास पण ही तुझी तिसरी गाडी होती बाळा. एक गाडी घ्यायची वर्षभर वापरायची पुन्हा दुसरी घ्यायची. हा जणू काही छंद लागला होता तुला. तुझ्याकडे ही भरपूर शिक्षण, चांगली नोकरी, घर, गाडी सगळेच आहे पण तुमच्या गरजा आणि अपेक्षा संपतच नाहीत. त्या वाढत जात आहेत त्यामुळे तुमची चिडचिड वाढली, असमाधान वाढले आणि समोर असलेले सुख किंवा हातात आहे ते पाहण्याची सवयच मोडली तुमची.

तुम्हाला आठवतंय का तुमच्या लहानपणी वनिताने वापरलेल्या सगळ्या शालेय वस्तू तू हसत वापरत होता ते ही कसलीही तक्रार न करता. एक चोकलेट दोघे वाटून खात होता अगदी आनंदाने. तेंव्हा तुम्ही दोघेही खूप समाधानी, आनंदी होता. मग आता एवढे ऐश्वर्य असूनही इतके असमाधानी का ?? कधी विचार केलाय ?? कारण वाढत्या अपेक्षा आणि गरजा. त्या जर वेळेत थांबवल्या नाहीत तर नात्यात आणि जीवनात अस्थिरता आणि असमाधान यायला वेळ लागणार नाही. लहानपणी तुम्ही आनंदी का होता कारण आपण साधं रहात होतो. पण म्हणजे अपेक्षा करणं किंवा काही मिळवण्याचा अट्टाहास चुकीचा नाहीच अपेक्षा आणि गरजा न संपण, कुठे थांबावं हे न समजने चुकीचे आहे. तुम्हाला माहितीय का साधं जगणं हे आपलं आयुष्य आनंदी बनवत.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “तुम्हाला माहितीये का, साधं जगणं हे आपलं आयुष्य आनंदी बनवतं.”

  1. GROUP WAR CHYA SARVA POSTS MALA KHUP AWADTAT. MI WHATS LA AANI FACEBOOK LA SHARE KARAT ASATO. PAN MAHITI NAHI KI KAY TECNICAL PROBLEM AAHE. MALA SHARE CH OPTION DISAT NAHI AAHE.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!