Skip to content

डिप्रेशन आणि बायपोलर आजार यांमध्ये काय फरक आहे?

डिप्रेशन आणि बायपोलर आजार यांमध्ये काय फरक आहे?


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


मानसशास्त्र याबद्दल आता आता कुठे समाजामध्ये थोडीफार जागृती निर्माण झाली आहे. त्याबद्दल जाणून घेण्याचा, त्याचे रीतसर शिक्षण घेण्याचा कल देखील वाढला आहे. तसच याबाबत काही समस्या असतील, म्हणजेच मानसिक समस्या असतील तर त्यावर देखील पुढाकार घेऊन उपचार करून घेणाऱ्या लोकांची देखील संख्या वाढत आहे.

परंतु ही एक सुरुवात आहे. यातील सखोल माहिती अजूनही बऱ्याच जणांना किंबहुना या क्षेत्रात असणाऱ्या लोकांना देखील बऱ्याच आजारांची माहिती नाही. त्यातील फरक स्पष्ट झालेला नाही. याचा परिणाम समोरच्या व्यक्तिला जी या समस्येने ग्रस्त आहे तिला तपासण्यात आणि उपचार करण्यावर होतो. आजाराच योग्य निदान करता अल तर पुढे उपचार करायला योग्य दिशा मिळते. चिंता, नैराश्य हे शब्द तर सर्रास हल्ली वापरले जातात.

पण चिंता आणि नैराश्य अवस्था म्हणून नेमकी काय आणि त्याच आजारात रूपांतर होण म्हणजे काय यातील फरक कोणाला माहीत नाही. चिंता आणि नैराश्य म्हणजे काय तेच नेमक झालं आहे हे कसं समजत हे ही फार माहीत नाही. त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर सहज म्हटल जात की मी depressed आहे. बायपोलर हा आजार देखील कोणाला फार माहीत नाही. या आजारांमध्ये बऱ्याचदा गोंधळ होऊ शकतो. म्हणून यातील फरक जाणून घेणे गरजेचं आहे. तो जाणून घेऊ:

डिप्रेशन (नैराश्य): डिप्रेशन म्हणजेच नैराश्य हा एक मनोविकार, एक मूड डिसऑर्डर आहे. दीर्घकाळ टिकणारी दुःखाची आणि निराशेची अवस्था. ही निराशा कित्येक आठवडे, महिने अगदी वर्ष वर्ष टिकून राहते जर यावर योग्य ते उपचार केले नाहीत.याला मेजर डीप्रेसिव डिसऑर्डर किंवा क्लिनिकल डिप्रेशन देखील म्हणतात. स्त्रीयांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येते. ज्या पद्धतीने स्त्रिया आपल्या भावभावना, आपलं दुःख व्यक्त करतात तस त्या तुलनेत पुरुषांना करता येत नाही. ते आपल दुःख बऱ्याचदा लपवून ठेवतात, दाबून टाकतात. त्याउलट राग लगेच व्यक्त करतात. असा नैराश्य ग्रस्त माणूस स्वतः ला इतर कामामध्ये गुंतवतो तसच त्याच risk taking behaviour पण वाढत.

बायपोलर आजार: या आजार पण एक मनोविकृती म्हणजेच मुड डिसऑर्डरच आहे. पण यामध्ये व्यक्तीची अवस्था तिची मनोवस्था एकच असत नाही तर ती दोन टोकांना झुकणारी असते. एका वेळी खूप ऊर्जा असल्यासारखं, एक्साईट असल्यासारखं वाटत तर दुसऱ्या वेळी खूप निराश, अर्थशून्य वाटत. याला मॅनिक डिप्रेशन अस देखील म्हटल जात. हा आजार मॅनिया आणि हायपोमॅनिया यांचं मिश्रण आहे. मॅनियामध्ये रुग्ण ध्येयाकडे आकर्षित होईल, त्या आवेगात तो काहीही करू शकतो. खूप बोलण, झोप कमी. स्वतःच्या क्षमतेवर, योग्यातेबद्दल दुराभिमान,सामाजिक वैयक्तिक तमा झुगारून त्याउलट काहीतरी कृत्य करणे. याउलट हायपोमॅनिया मधली व्यक्ती असते. उदास आणि दुःखी.

डिप्रेशनचे प्रकार: याचे अनेक प्रकार आहेत परंतु DSM नुसार याचे पाच प्रकार पडतात. ते म्हणजे

मेलँकोलिक
एटिपिकल
सीजनल अफेक्टिव डिसऑर्डर
कॅटेटॉनिक
पोस्टपार्टम

बायपोलर:
बायपोलर I: मॅनिया आणि नैराश्य यांचे एक एक असे समान संख्येचे अटॅक रुग्णाला आले असतील तर त्याचं निदान बायपोलर I असं केलं जातं. यात मॅनिया काही आठवडे तर नैराश्य ३-९mahine टिकत.

बायपोलर II: जे मॅनियाच प्रमाण प्रकार एक मध्ये कमी असते ते इथे तीव्र असत. इतकाच यात फरक आहे. बायपोलर II मध्ये मॅनियापेक्षा डिप्रेशनच्या अटॅकची संख्या जास्त असली तरी त्यातून आलेली आत्महत्येची प्रवृत्ती धोकादायक ठरते.

सायक्लोथायमिक: यामध्ये हायपोमॅनिया आणि डिप्रेशन या सगळी लक्षण दिसून येतात. तरी यांची तीव्रता आणि कालावधी खूप कमी असतो. तसच हा बायपोलरचा तुलनेने सौम्य प्रकार मानला जातो.

इतर: या तिन्ही प्रकारात न बसणारे अटॅक काही जणांना येतात. ते यात येतात. काही वेळा दोन्ही गोष्टी म्हणजे एकाचवेळी उन्माद आणि त्याचवेळी नैराश्य अस रुग्ण अनुभवत असेल तर त्याला मिक्स एपिसोड म्हटल जात. यात आत्महत्येचा धोका जास्त असतो.

लक्षणांमध्ये असणारा फरक:

डिप्रेशन:
दुःखी, होपलेस, सतत रडु येणे
स्वतः बद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन, अस्वस्थता
यशाहून अपयशकाकडे लक्ष देणे
स्वतः ला दोष देणे, भविष्याची चिंता
कोणत्याही कामावर जास्त वेळ लक्ष केंद्रित न करता येणे
कन्फ्युज असणे व निर्णय घेता न येणे
साधी साधी काम करण्यासाठी देखील जोर द्यावा लागणे
थकवा, सततची डोकेदुखी
एकटे पाडून घेणे
आत्महत्येचे विचार
आत्महत्या करण्याचा प्रयत्न, तशी पार्श्वभूमी असणे.

बायपोलर आजार: याची लक्षणे खूप संकीर्ण असतात. जी टाईप नुसार बदलत जातात. परंतु यातील तीन मुख्य लक्षणे म्हणजे मॅनिया, हायपोमॅनिया आणि डिप्रेशन. या तिन्ही गोष्टींचं मिश्रण वेगवेगळ्या प्रमाणात दिसून येत.

बायपोलर आजार आणि डिप्रेशन मधला महत्त्वाचा फरक म्हणजे बायपोलर आजारामध्ये मॅनियाचा आनंदी मुड चा एकतरी आवेग येऊन जातोच. डिप्रेशन मध्ये मात्र सतत निराशा, हताश, विषण्ण वाटणं या अश्या दुःखी भावनांच चक्र चालू राहतं.

डिप्रेशन आणि बायपोलर होण्यामागची कारणे:

डिप्रेशन:

आनुवंशिकता

मेंदूतील रासायनिक बदल: मेंदूतील विशिष्ठ भागात काही न्युरोट्रांसमीटर्स कमी असणे हे डिप्रेशनचे कारण मानले जाते. उदा. सेरोटनिनची कमी झालेली पातळी.

मानसिक कारण: एखादा मोठा आघात झालेला असला जी बाह्य किंवा अंतर्गत कोणताही असू शकतो तो व्यक्तीवर प्रभाव टाकतो.

याशिवाय ताण, भावनिक आघात, कुपोषण या गोष्टी देखील नैराश्य निर्माण करू शकतात.

बायपोलर:

बायपोलर हा आजार आनुवंशिकता, शरीरातील रासायनिक घटकांचं बदललेल प्रमाण आणि मानसिक सामाजिक परिणाम यांच्यामुळे होतो.

उपचार:

डिप्रेशन: नैराश्य असणाऱ्या व्यक्तीसाठी सर्वात जास्त प्रमाणात वापरली जाणारी उपचार पद्धती म्हणजे औषधोपचार (psychiatrist )आणि मानसोपचार(psychotherapist) औषध डिप्रेशन ची लक्षण कमी करायला मदत करतात पण त्याच बरोबर मानसोपचार विचारांवर काम करत असल्याने दोन्ही गोष्टी घेणे फायदेशीर ठरते. त्याच प्रमाणे एक उपचार चालू असताना दुसरा बंद करून चालत नाही. उदा. मानसोपचार चालू आहे म्हणून डिप्रेशनच्या रुग्णाने अचानक औषधे घेणं
बंद करू नये. तसच हो औषध घेताना ड्रग्स, अल्कोहोल वगैरे घेणे आरोग्याला हानी करू शकत.

बायपोलर: यासाठी देखील औषध, मानसोपचार पद्धती तसच ट्रीटमेंट प्रोग्रॅम्स ज्यामध्ये समुपदेशन आणि मानसिक आधार या गोष्टी असतात. रुग्णाला व्यसन असेल तर डी अडिक्शन वापरले जाते. आजाराची तीव्रता पाहून हॉस्पिटॅल मध्ये ठेवलं जात. तसच रीलाप्स होऊ नये म्हणून उपचार चालू ठेवावे लागतात.

हे असे फरक या दोन्ही आजारामध्ये आहेत. ते नीट जाणून समजून घेऊन त्यावर उपचार घेणं गरजेचं आहे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!