Skip to content

बायकोने पुढे पुढे करणं बंद केले की अनेक नवरोबांना टेन्शन यायला लागतं.

बायकोने पुढे पुढे करणं बंद केले की अनेक नवरोबांना टेन्शन यायला लागतं.


टीम आपलं मानसशास्त्र


घरात ना प्रत्येक गोष्टीत बायको ला पुढे पुढे करण्याची सवय असते. तुम्हीच बघा तुमच्या घरात ही असेच आहे ना ?? पुरुष सहसा पुढे पुढे करत नाहीत. जे काही असेल ते बायका उत्साहाने म्हणा , किंवा काही पुरुषांना सुचत च नसते काय करावे अशा वेळी बायको पुढाकार घेवून ते काम तडीस नेते.

अर्थात पुरुष काही सहज शक्य किंवा त्यांच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी नसतील तिथे उगीच आपले नाक खुपसत ही नाहीत. पण जे मोठे निर्णय असतील. घर घेणे , गुंतवणूक , बचत , आर्थिक व्यवहार , जीवन विमा , मेडिकल पॉलिसी , अशा मोठ्या गोष्टीत नक्कीच स्वतः पुढाकार घेतात.

मग पाहुणे आले त्यांचे व्यवहार , खाणे पिणे , सण , समारंभ देवाणघेवाण , घरातल्या वस्तू खरेदी हे सगळे बायका पुढाकार घेवून करत असतात. आणि अर्थात पुरुष त्यांना पैसे देवून रिकामे होतात . म्हणजे बायकाना ही एक आत्मिक समाधान मिळते. मनाजोगती गोष्ट केली . जे पाहिजे ते केले की आनंद आणि समाधान मिळते. कुठे जायचे काय करायचे , घरातले bdy सेलिब्रेशन असेल किंवा एखादी पिकनिक हे सगळे बायकांच्या पुढाकाराने केले तर बायका ही खुश आणि घरात ही शांतता राहते. आणि पुरुष म्हणूनच बरेचवेळा दूरदृष्टीने बायकोला पुढे पुढं करण्याची संधी देतात.

अगदी सुरुवातीला लग्नानंतर पुरुष सगळ्या गोष्टीत पुढाकार घेत असतो. कारण तेव्हा तेवढी नात्यात मोकळीक नसते. एकमेकांचे नातेवाईक माहिती नसतात. जोडीदाराचे स्वभाव माहिती नसतात. आवडी निवडी माहिती नसतात. म्हणून गाडी ला कसे स्टार्टर मारला की गाडी सुरू होते तसेच आहे. संसाराच्या गाडीला सुरुवातीला स्टार्टर हा पुरुषांनाच मारावा लागतो. पण नंतर मात्र संसाराची गाडी दोघे मिळून सांभाळतात.
सुरुवातीला शारीरिक संबंध हे सुधा नवऱ्याच्या पुढाकाराने होतात कारण स्त्री लज्जा ,संस्कृती , मर्यादा यामुळे तेवढी सुरुवातीला पटकन ओपन होत नाही.
पण एकदा का रुळली की मग मात्र ती स्वतः उत्साहाने पुढाकार घेत असते. आणि स्त्री ही मुळातच नैसर्गिक देणगी घेवून आल्यासारखी multi tasking असते. एका वेळी अनेक आघाड्यांवर पुढाकार घेवून लढत असते म्हणा किंवा तिच्यात त्या गोष्टी करण्याची ती क्षमता असते.

बायकोने पुढे पुढे करणं बंद केले की अनेक नवरोबांना टेन्शन यायला लागतं.का बरे असे होते. काय कारण असावीत .

१. काही तरी बिनसले याची जाणीव होते :बायकोने पुढे पुढे करणं बंद केले की नवऱ्याला लक्षात येते की गाडी कुठे तरी बिघडली आहे. काही तरी बिनसले आहे. बरं स्त्रिया इतक्या छोट्या छोट्या गोष्टी डोक्यात ठेवून असतात आणि त्यामुळे भावनिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या दुखावल्या जातात. त्यांच्या डोक्यात असंख्य वायरच्या गुंतागुंती सारखे विचारांचे जाळे होते. आणि मूळ विचार भलतीकडेच भरकटू लागतो.

आणि हे पुढच्या धोक्याची सूचना असते. जसे वादळापूर्वची शांतता.

२. संपूर्ण जबाबदारी नवऱ्यावर पडते. आणि ती पार पाडणे म्हणजे प्रचंड कसरत होते नवऱ्याची आणि इतके करून एक ना धड भारा भर चिंध्या अशीच अवस्था होते. : प्रत्येक गोष्ट पुढाकार घेवून पूर्ण करण्याची जबाबदारी बायको ही खुबिने, सफाईदारपणे पार पाडत असते.
जेव्हा बायको पुढं पुढं करणे बंद करते तेव्हा नाईलाजाने सगळ्या जबाबदाऱ्या या नवऱ्याला स्वीकाराव्या लागतात आणि त्याची त्यात प्रचंड तारांबळ होते. आणि इतके करून ही काही ही धड होत नाही. त्यातून परत बायकोची चिडचिड , भांडणे , वाद होतात.
एवढेसे सुधा जमत नाही हा उलट वर शिक्का मारला जातो.

३. शारीरिक संबंध ही बिघडतात. :थोडीशी स्फूर्ती किंवा नवऱ्याकडून कुठे ग्रीन सिग्नल मिळाला की बायको शारीरिक संबंधात ही आवडीने पुढाकार घेवून अनेक गोष्टी आनंदाने करत असते. त्यात नवरा आणि बायको दोघांना ही खूप सुख , शांती , आणि समाधान मिळत असते.
पण जेव्हा बायको कोणत्याच गोष्टीत पुढं पुढं करणे बंद करते तेव्हा नवऱ्याला टेन्शन येवू लागते की नक्की काय झाले. काय चुकले. काय प्रोब्लेम आहे.

अगदी दुसरे कोणी आयुष्यात आहे का इथे पासून , आपल्यात काही उणीवा जाणवतात का असेही प्रश्न सतावतात.

बायकोने पुढे पुढे करणं बंद केले की अनेक नवरोबांना टेन्शन यायला लागतं. की आपले काही चुकले का , असेल तर काय चुकले, आणि आपण कसे वागायचे आहे काय करायचे आहे. परत पूर्ववत होण्यासाठी बायकोला कसे खुश करायचे आहे. जिच्यावर आपण पूर्णपणे अवलंबून असतो. जी छोट्या निर्णयापासून मोठ्या गोष्टीत ही पुढाकार घेवून मदत करते. तिने पुढं पुढं बंद केलं की एक बाजू अधू झाली असेच पुरुषांची मानसिकता होते.

मग अगदी हे तात्पुरते आहे का ही कुठे तरी कायमच्या दुरव्याची सुरुवात आहे इथे पासून शंका येवू लागतात.
आणि नवऱ्याने कितीही पडती बाजू घेतली , समजून सांगण्याचा आणि समजावून घेण्याचा प्रयत्न केला तरी कुठे तरी अंतर येत जाते. अशावेळी आपली नक्की कोणती भूमिका घ्यवी याचे टेन्शन नवऱ्याला येते.

नवरे ही समंजस असतात. आणि समजून तसेच समजावून सांगणारे असतात. पण बायको मधले काही सूक्ष्म बदल हे त्यांनाही अचंबित करणारे असतात. तर काही वेळेस त्या पेच सोडविणे नवऱ्याला अवघड असते.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!