इतर तुमच्याबद्दल काय विचार करताय, सोडून द्या.. तुम्ही निसर्गतः एक सुंदर व्यक्ती आहात.
पुजा सातपुते
कुछ तो लोग कहेंगे,
लोगों का काम है केहना,
छोडो बेकार की बातों मे,
कही बीत ना जाये रैना.
श्री आनंद बक्षीन्नी लिहलेलं , श्री आर. डि. बरमन नी संगीत बद्ध केलेलं आणि किशोर कुमारजीन्नी आपल्या वजनदार व सुरेल आवाजात गायलेलं हे गाणं खूप काही सांगून व शिकवून जातं…
खरंच! आपलं आयुष्य जास्त करून इतर जण काय विचार करतील यातच खर्च होऊन जातं आणि मग आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आपल्याला जाणीव होते, आपण तर आयुष्य आपल्यापरीने कधी जगलोच नाही.
इतरांचं ऐकून आपण विनाकारण आपलं आयुष्य कॉम्प्लिकेट करत राहतो आणि स्वतःला एवढे बदलतो की आपण स्वतःच स्वतःला पूर्णपणे विसरून जातो…
निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला सुंदर बनवलं आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी खास गुण दिला आहे जो आपल्या जवळच्या लोकांना प्रेरणा देतो. कळत नकळत आपण किती साऱ्या जणांना प्रोत्साहन देत असतो हे आपल्याला समजत देखील नाही पण म्हणतात ना वाईट गोष्टींकडे आपलं सहज लक्ष जातं कारण आपण आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या विचारांवर जास्त जगत असतो. लोकांची टीका सहजपणे मनावर घेतो आणि जी लोकं आपल्यातले गुण बघतात त्यांना आपण पूर्णपणे इग्नोर करतो.
टीका ऐकून आपल्याला नेगेटिव्ह विचार यायला लागतात. स्वतःमधला आत्मविश्वास कमी होतो. सतत तेच विचार घोळत राहतात, का बरं तो/ती असा/अशी बोलली असेल, खरं असेल का ते? कदाचित माझ्यामध्येच काहीतरी दोष असणार. मी कितीही प्रयत्न केला तरी काही उपयोग नाही आणि असे बरेच विचार.
एवढे नेगेटिव्ह विचार करताना आपण आपला मौल्यवान वेळ विनाकारण वाया घालवतो. त्यापेक्षा हा वेळ जर आपण पॉसिटीव्ह विचार करण्यात घालवला तर आपली किती प्रगती होईल. आपलं आयुष्य कितीतरी पटीने पुढे जाईल. हे असे बिनकामाचे नेगेटिव्ह विचार करून आपण आपलं आयुष्य थांबवत राहतो आणि विनाकारण डिप्रेस होत राहतो.
आपलं आयुष्य हे आपलं आहे आणि जर का ते आपण दुसऱ्यांच्या ओपिनियन वर जगत राहिलो तर एका प्रकारे आपण निसर्गाला पचताव करायला भाग पाडतोय. निसर्गाने प्रत्येकाला एक सुंदर आयुष्य दिलं आहे, प्रत्येकाला सुंदर बनवलं आहे आणि निसर्गाचा मान ठेवून ते सुंदर ठेवणं हे आपल्या हातात आहे.
आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच लोकांना भेटतो आणि त्यांचे बरेच विचार आत्मसात करत असतो, पॉसिटीव्ह आणि नेगेटिव्ह दोघेही. पण कुठली गोष्ट किती आपल्या मनाला लावून घ्यायची हे आपल्याला कळायला हवं. आपण पुढे सुद्धा नवीन लोकांना भेटणार, लोकं आपल्या मनाप्रमाणे बोलत राहणार आणि विसरून जाणार. आपण जर प्रत्येक गोष्ट मनाला लावत बसलो तर आपलच आयुष्य खराब होणार. दुसऱ्यांचं ओपिनियन ऐकून जरूर घ्या, पटलं तर आत्मसात करा आणि नाही पटलं तर त्यांच्या प्रमाणे विसरून जा.
स्वतः व्यतिरिक्त आपल्याला जास्त कोणीही ओळखू शकत नाही. म्हणून दुसऱ्यांच्या नको त्या ओपिनियन वर आपलं आयुष्य जगू नका. तुम्ही जसे आहात तसे सुंदर आहात. जे तुमचे खास आहेत ते तुम्हाला कसही ऍक्सेप्ट करणार आणि ज्या लोकांना तुम्हाला नावं ठेवायची आहेत ते ती ठेवणारच, मग तुम्ही कितीही चांगले वागलात तरी!
म्हणून इतर तुमच्याबद्दल काय विचार करताय, सोडून द्या.. तुम्ही निसर्गतः एक सुंदर व्यक्ती आहात आणि कायम असेच राहा.
आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. पॉसिटीव्ह विचार करून ते सुंदर ठेवा. नको ते विचार करून कॉम्प्लिकेट नका बनवू. स्वतः मधले गुण ओळखा आणि गुणांच्या मदतीने अवगुणांवर मात करा. योग्य विचाराने स्वतःमध्ये पॉसिटीव्ह बदल नक्कीच आणा पण दुसऱ्यांच्या बोलण्यावरून स्वतःला एवढे पण नका बदलू की त्याचा तुम्हाला पचतावा होईल. खुश राहा, हसत राहा आणि प्रत्येक संकटावर मात करायला शिका, शांतपणाने आणि पॉसिटीव्ह विचाराने.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

सुंदर.वास्तव शिकविणारा.
Kharch.Khup.Sundar.Lekh.Out.Standing