Skip to content

यशस्वी आयुष्य जगण्यासाठी केवळ एका उत्तम mindset ची गरज असते.

यशस्वी आयुष्य जगण्यासाठी केवळ एका उत्तम mindset ची गरज असते.


पुजा सातपुते


“मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातात कसा लागावा”

मन, एका वाहत्या समुद्रा सारखं! सतत विचार करणारं, कधी चांगले तर कधी वाईट, आणि या विचारातूनच स्वतः चं आयुष्य निर्माण करणारं!

आपलं आयुष्य हे चढ-उतारांनी भरलेलं असतं, कधी चांगले दिवस तर कधी वाईट, आणि या दोन्ही दिवसांचा अनुभव हा खूप महत्वाचा असतो. वाईट दिवस आपल्याला नम्र बनवतात म्हणजे जेणेकरून आपल्या चांगल्या दिवसात आपले पाय जमीनीवर राहावेत.

आपलं आयुष्य सध्या कसही असो पण एक मात्र खरं आहे कि यशस्वी आयुष्य जगण्यासाठी केवळ एका उत्तम mindset ची गरज असते. आपण आपलं आयुष्य कसं जगतो, स्वतःला कसं घडवतो हे पूर्णपणे आपल्या माईंडसेट वर डिपेंड आहे. वाईट दिवस सगळ्यांच्या आयुष्यात येतात आणि त्यातनं आपण स्वतःचं आयुष्य कसं घडवतो हीच खरी परीक्षा असते.

आपले विचार एक तर आपल्याला यशस्वी करतात किव्हा अधोगतीला नेतात. आपण जो विचार करतो ते आपल्याबरोबर होत असतं. घरातून बाहेर पडताना विचार केला कि आज मी लेट होणार तर तुम्ही लेट होणारच पण उशीर होऊन सुद्धा तुमचं माईंडसेट लवकर पोहचण्याचं ठेवलत तर आपोआप तुम्हाला ऑपशन्स मिळत जाणार आणि तुम्ही वेळेवर पोहचणार. आपल्या विचारात स्वतः ला घडवण्याची एक विलक्षण शक्ती असते आणि त्या शक्तीचा नेहमी सदुपयोग केला पाहिजे.

कधी कधी परिस्थिती आपल्याला दोन ऑपशन देते, हार मानून बसून जाणं किव्हा स्वतःला सिद्ध करण्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणं, आणि हे सर्वस्वी आपल्या माईंडसेट वर अवलंबून असतं. आपले विचार, आपल्या मनावर व बुद्धिवर असलेला ताबा एकतर आपलं आयुष्य घडवतो किव्हा बिघडवतो. आपलं माईंडसेट उत्तम असेल तर आपले चॉईसेस पण उत्तम बनतात.

आयुष्यात हार कधीच मानायची नसते. पॉसिटीव्ह माईंडसेट ठेवून प्रयत्न करायचे असतात. कधी कधी आपण इतर लोकांचा एवढा विचार करतो कि त्यामुळे आपल्या माईंडसेट मध्ये बदल होतो. यश अपयश हे आपल्या माईंडसेट वर डिपेंड आहे. अपयश जरी आलं तरी देखील काही फरक पडत नाही कारण आपल्याला ते आपल्या यशा जवळ नेतं, आपल्या मध्ये बदल घडवतं. कोणा दुसऱ्या बरोबर स्पर्धा करून यशाचं आणि अपयशाचं मोजमाप केलं तर आपण आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकणार नाही. पण हे मोजमाप जर आपण आपल्या स्वतःच्या कामाशी ठेवलं तर आयुष्यात पुढे जाण्याची संधी नक्कीच निर्माण होईल.

दुसऱ्याशी स्पर्धा केल्याने आपण आपलं आयुष्य थांबवतो आणि त्यामुळे आपल्यात नेगेटिव्ह विचार येतात, डिप्रेशन येतं. पण हीच स्पर्धा जर आपण स्वतःशी केली तर आपली प्रगती होते, अजून मेहनत करून चांगलं काहीतरी करण्याची नवीन उमेद मिळते, आपल्या चुका आपल्याला लक्षात येतात आणि मुख्य म्हणजे आपल्या माईंडसेट मध्ये पॉसिटीव्ह बदल होतो.

आपल्या मनावर जर योग्य ताबा असला आणि आपलं माईंडसेट जर उत्तम असेल तर आयुष्यात कितीही अपयश आलं तरी ते पचवून आपण एक यशस्वी आयुष्य जगू शकतो. आपलं आयुष्य हे आपलं असतं आणि त्याचं मोजमाप दुसऱ्यांबरोबर करायचं नसतं. प्रत्ये्यक जण कुठल्या ना कुठल्या तरी प्रसंगातून जात असतो. दुसऱ्यांकडे बघून प्रेरणा घ्यावी आणि आपलं आयुष्य यशस्वी करून दुसऱ्यालाही प्रेरणा द्यावी. नको ती कंपेटिशन करून, डिप्रेस होऊन आपलं आणि दुसऱ्यांचं आयुष्य खराब करू नये.

आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. उत्तम माईंडसेट ठेवून ते अजून सुंदर बनवा, स्वतः मध्ये पॉसिटीव्ह बदल आणा. आयुष्यात यश अपयश हे चालत असतं. अपयशातनं शिकून यशासाठी मार्ग निर्माण करा. उगीच हताश आणि निराश होऊन आपलं सुंदर आयुष्य थांबवू किव्हा संपवू नका. शेवटी यशस्वी आयुष्य जगण्यासाठी केवळ एका उत्तम mindset ची गरज असते आणि तो जर तुम्ही ठेवलात तर तुम्ही नक्कीच यशस्वी वाहाल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!