Skip to content

उत्तम आरोग्य औषधांमधून मिळत नसून तर तुमच्यातल्या peace of mind मुळे मिळतं.

उत्तम आरोग्य औषधांमधून मिळत नसून तर तुमच्यातल्या peace of mind मुळे मिळतं.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


एका उत्तम आरोग्याची व्याख्या काय आहे? आपल्या सर्वांना ती कदाचित माहीत असेल. अनेक जणांनी ती वाचली असेल, ऐकली असेल. काही जणांना माहिती नसेलही.

कारण अजूनही अनेकांना अस वाटत की फक्त शरीर निरोगी असल की उत्तम आरोग्य अस अस मानावं. तिच त्याची व्याख्या आहे. त्यामुळे शरीराचे जास्तीत जास्त चोचले पुरवले जातात, ते कसं नीट ठेवता येईल याकडे जास्त लक्ष दिलं जातं. मग त्यासाठी जे जे काही करता येईल ते केल जात. आणि हे काही चुकीचं किंवा वाईट नाहीये. आपल्या शरीराची आपण काळजी घेतलीच पाहिजे.

पण फक्त निरोगी शरीर, फक्त आजार मुक्त शरीर म्हणजे आपलं आरोग्य नाही. आरोग्यामध्ये अजून गोष्टी येतात, त्या नीट असल्या, निरोगी असल्या की मग आपल्याला म्हणता येत की माझं आरोग्य चांगल आहे. कोणत्या आहेत मग या गोष्टी? तर आपली मानसिकता, आपलं सामाजिक भान, आपलं स्थान आणि आपलं शरीर या तिन्ही गोष्टी नीट असण, यातून निर्माण झालेलं एकात्मिक कल्याण म्हणजे आरोग्य, एक निरोगी आरोग्य.

एकात्मिक यासाठी कारण यातील एकाही गोष्टीला धक्का लागला, त्यात अडथळे आले तर आपल्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. कारण या तिन्ही गोष्टी एकमेकांवर प्रभाव टाकत असतात. मी मुळचा मनाने भक्कम आहे, पण शरीर चांगल नाही, आयुष्यात चांगली नाही नाती, ती जपायची कशी हे मला माहित नाही अस असेल तर मग हळू हळू आपल्या मनावर त्याचा परिणाम होणार, माझं समाजातील स्थान उच्च आहे सर्व मला मानतात पण मला स्वतःच्या भावनांवर ताबा नाही, मला माझं भावनिक विश्व नीट सांभाळता येत नाहीये तर मग त्याचा माझ्या या सामजिक स्थानावर परिणाम होणार. त्याचप्रमाणे शरीर चांगल आहे पण विचार पद्धती चुकीची आहे त्यामुळे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो आहे, आयुष्य चांगल भासत नाही, अश्यावेळी फक्त शरीर नीट असून चालणार नाही.

आपल्यापैकी अनेक जणांना वाटत की चांगल आरोग्य औषधांमधून मिळत. काहीही झालं घ्या औषध. का? तर बर वाटावं म्हणून. पण खरच त्याने किती वेळ आपल्याला बर वाटत. त्या औषधांचा जितका अवधी असतो तितका वेळ. आणि तो तेवढच वाटणार आहे. कारण कोणतही औषध आपल्याला तात्पुरतं बर करू शकत पण कायमस्वरूपी नाही. ते आपला आजार आटोक्यात ठेवू शकत. फार फार तर वाढू देणार नाही.

पण जगण्यासाठी जी एक मानसिक, आत्मिक शांतता असते मी यातून कधी मिळत नाही. अस असत तर दिवसाला वीस वीस गोळ्या खाणारे समाधानी झाले असते आणि त्यातून बरे पण झाले असते. पण अस होत का नाही? कारण मन स्थिर नाही. अलीकडच्या काळात अनेक सेलिब्रिटी ज्यांना कॅन्सर सारखा असाध्य रोग झालेला आपण पाहिला आहे. तरी त्यावर त्यांनी मात केली व ते बरे झाले. हे का झाल? त्यांनी ट्रीटमेंट घेतली नसेल का? नक्की घेतली असणार. पण ते तेवढ्यावरच थांबले नाही. त्याही पलीकडे ते गेले. त्यांनी विश्वास ठेवला की आपण यातून नक्की बरे होणार आणि त्यासाठी त्यांनी हवे ते सर्व प्रयत्न केले.

आपलं जर मन खंबीर नसेल तर आपण लगेच कोणत्याही गोष्टीला बळी पडतो. कोणत्याही गोष्टीने आपल्याला लगेच फरक पडतो. तेच जर आपण आतून भक्कम असू तर आपण डगमगत नाही. इथे औषध घ्यायची की नाहीत किंवा त्यांना कमी महत्त्व देणं अस नाही. कारण ज्या त्या गोष्टीचं स्वतःच अस वैशिष्ट आहे, महत्त्व आहे. त्यामुळे ती केलीच पाहिजे.

पण फक्त तिच गोष्ट महत्त्वाची आहे, श्रेष्ठ आहे अस मानून आपण गोष्टी करायला लागलो तर मात्र त्या अपुऱ्या पडतील. आपल्याला placibo effect ठाऊकच असेल. पेशंटचा डॉक्टर वर असलेला, त्यांच्या गोळ्यांवर असलेला विश्वास इथे दिसून येतो. तो इतका असतो की जेव्हा डॉक्टर साध्या गोळ्या म्हणजेच ज्याने काहीही परिणाम होणार नाही अश्या गोळ्या देतात तेव्हा देखील पेशंटला ते खाऊन बर वाटत. आणि दोन्ही बाजूंनी बर वाटत, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या देखील. काही जण म्हणतात देखील की मला या अमुक एका डॉक्टर च्या औषधानेच गुण येतो, दुसऱ्या कोणाच्या नाही. इथे त्या औषधाहुन त्या डॉक्टरवर असलेला विश्वास, त्याने तपासल आहे म्हणजे बर वाटणार अशी ही मनाची खात्री असते ती माणसाला बर करते. जर असा विश्वास आपण दुसऱ्या कोणावर ठेवू शकतो तर स्वतःवर का नाही?

आपल्याला जगण्यासाठी आयुष्यावर प्रेम व स्वत:वर प्रेम करावं लागत, स्वतःच्या जगण्यावर प्रेम असावं लागतं. तर आपण कोणत्याही आजारातून बरे होऊ शकतो.यासाठीच फक्त औषधांवर अवलंबून चालत नाही, त्यासाठी

मन खंबीर लागत, चित्त स्थिर शांत लागत. ज्याला आपण peace of mind म्हणतो. याला कुठे अरण्यात जाऊन बसायची गरज नाही की सर्वांपासून दूर जाण्याची गरज नाही. फक्त गरज आहे ती आपली विचार पद्धती बदलण्याची. छोट्या छोट्या गोष्टींवरून लगेच विचलित होण, अस्वस्थ होण, दुसऱ्यांच्या वागण्याचा मनावर परिणाम करून घेणं, अपयशाने लगेच खचून जाणं, माघार घेणे, कितीही असल तरी आयुष्यबद्दल असणारी असमाधानी वृत्ती हे सर्व जेव्हा बदलेल तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने peace of mind मिळेल. आणि त्यासाठी आपल्याला औषधांची गरज नाही भासणार, त्यासाठी हवा विश्वास आणि संयम.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!