Skip to content

शांतता हवी असेल तर वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या.

शांतता हवी असेल तर वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या.


मेराज बागवान


आयुष्यात प्रत्येकाला शांतता हवी असते.पण ही शांतता मिळविण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतोच असे नाही.अनेकजणांना वाटत असते मी का बदलू,मीच का माझ्यामध्ये बदल करू.त्यांना गरज असेल ते ते बदलतील.मी असाच आहे आणि असाच राहणार.पण काही जण असेही असतात जे क्षणोक्षणी स्वतःमध्ये बदल करीत असतात.कारण त्यांना वाद घालण्यापेक्षा शांतता हवीशी वाटते.आणि म्हणूनच ते मग स्वतःमध्ये बदल करतात.आणि हीच आज काळाची गरज आहे.दुसऱ्याचा स्वभाव आपण नाही बदलू शकत.मग ती व्यक्ती आपल्या कितीही जवळची असेल तरी देखील.म्हणूनच जर तुम्हाला शांतता हवी असेल,नातेसंबंध टिकवायचे असतील तर एखाद्या गोष्टीवरून वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या.आयुष्यात शांतता मिळविण्यासाठी आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी हे खूप गरजेचे आहे.

माणसांशी संवाद साधत असताना विविध विषयांवर चर्चा होते.मग कधी कधी ह्या संवादाचे रूपांतर वादात होते.एकज हीच गोष्ट बरोबर असे म्हणत असतो तर दुसरा म्हणत असतो की मी म्हणत आहे तेच योग्य आहे.अशाने मग वाद वाढत जातो,भांडणे होतात आणि नातेसंबंध दुरावतात.मग अशा वेळी नक्की काय केले पाहिजे? सोपे आहे.स्वतः बदलावे.म्हणजेच काय, तो विषय काही काळ बाजूला ठेवावा आणि शांत राहावे.पण अनेकजणांना वाटत असते, मी ह्या विषयाचा शोक्षमोक्ष लावल्याशिवाय गप्प बसणार नाही.आणि आपण नेमके इथेच चुकतो.आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा शोक्षमोक्ष कधीच लावता येत नाही.आणि म्हणूनच त्या काळावर सोडून द्याव्या लागतात.काळ हेच त्यावर उत्तर असते.

घरात,कार्यालयात,मित्र-मंडळींमध्ये अनेक वाद-विवाद घडत असतात.कधी कधी हे वाद-विवाद इतके टोकाला जातात की अगदी ते नाते कायमचे तुटून जाते.आजकाल तर नाती लगेच तुटण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.यातून समाज विघातक गोष्टी देखील घडत आहेत.जसे की , खून, मारामाऱ्या,सामाजिक आणि घरगुती हिंसाचार,घटस्फोट, बलात्कार,ऍसिड हल्ले,दंगे-धोपे इत्यादी. ह्या सगळ्या मागे एकच महत्वाचे कारण असते ,ते म्हणजे, ‘कोणीच मागेच न हटने, कोणीच माघार न घेणे आणि कोणीच स्वतःमध्ये बदल न करणे’.काहींना वाटत असते की ,स्वतः बदलणे म्हणजे स्वतःचा अहंकार दुखावणे,स्वाभिमानाला ठेच पोहचवणे.आणि मग ह्या खोट्या अहंकारापायी माणूस स्वतःच स्वतःचीच शांतता भंग करून ठेवतो आणि दोष समाजाला देतो.

काही जणांना वाटत असते,मी म्हणेल तसेच व्हायला हवे.मला जी गोष्ट आवडते ती मला मिळायलाच हवी.ही माणसे खूप आत्मकेंद्रित,स्वकेंद्रित असतात.मग जेव्हा त्यांना समजते की ही गोष्ट आपल्याला मिळणारच नाही, त्यावेळी ते खूप चिडचिड करतात.आणि ही जी मानसिकता आहे तीच खूप धोकादायक आहे जी मानसिक स्वास्थ्य हरवून टाकू शकते.आयुष्य खूप सोपे असते पण माणूस त्याला स्वतःच्या हातानेच गुंतागुंतीचे करून टाकतो.आयुष्य हे असते जिथे आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असे नाही. कारण काही गोष्टी नाशिबातच असाव्या लागतात,ओढून ताणून काहीच होत नाही. आणि हेच खरे आयुष्य असते.जेव्हा आपण हे समजून घेऊ शकू तेंव्हाच शांतीमय आयुष्य जगू शकू.आणि ह्या शांतीसाठी गरज आहे ती स्वतःमध्ये बदल करण्याची.दृष्टिकोन बदलण्याची.

काही व्यक्तिंना वाद घातल्याशिवाय राहवातच नाही.त्यांना वाटते आपण वाद घातला की आपले म्हणणे समोरचा ऐकेल आणि मग मी म्हणतोय तसेच होईल.पण असे होत नाही.होतो तो फक्त वाद.म्हणून स्वतःमध्ये बदल करायला शिका.जो स्वतःला बदलू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो.मात्र जो स्वतःला कधीच बदलू शकत नाही आणि फक्त समाजात बदल अपेक्षीतो ,त्याला आयुष्यात काहीच बदल दिसणार नाही.त्यामुळे कोणत्याही गोष्टीची सुरवात स्वतःपासून करावी. स्वतःला बालवायला खूप बलशाली मानसिकता आणि दृष्टिकोन लागतो.आणि हीच माणसे आयुष्यात मोठे यश संपादन करू शकतात.

अनेकजण इतरांकडून निरनिराळ्या अपेक्षा ठेवतात. तू माझी स्तुती केलीच पाहिजे,मी तुझ्यासाठी नेहमी इतके करतो तर तू माझी प्रत्येक गोष्ट ऐकलीच पाहिजे, नाही म्हणले नाही पाहिजे,नेहमीच माझी मदत केली पाहिजे.असे काही जण अपेक्षित असतात,मात्र स्वतः काहीच बदलत नसतात. आणि हे खरे जीवन नाही.खरे जीवन ते आहे जिथे अपेक्षा फक्त आणि फक्त स्वतःकडून ठेवली जाते.इतरांना निस्वार्थीपणे मदत केली जाते, कोणताही हेतू न ठेवता नाती जोपासली जातात. निस्सीम प्रेम केले जाते.आणि ह्या काही खूप मोठ्या गोष्टी नाहीत ,सरावाने हे सहज शक्य आहे. पण ह्या साठी गरज आहे ती स्वतःला बदलण्याची.

काळानुरूप,परिस्थितीनुसार प्रत्येकाला स्वतःला बदलून घेतले पाहिजे. स्वतःचे एक ‘अपडेटेड व्हर्जन’ बनवले पाहिजे.यामुळे तुम्ही एक शांतीमय जीवन जगू शकाल.फक्त ह्या सगळ्यात कोणाला दुखावले नाही पाहिजे. पण माणूस आहे, त्यामुळे चूक तर कधी ना कधी होणारच,कोणी ना कोणी दुखावले जाणारच.अशा वेळी स्वतःचा विचार बाजूला ठेवून त्या व्यक्तींची मनापासून माफी देखील मागता आली पाहिजे.कारण आजूबाजूच्या माणसांमुळेच आपले अस्तित्व असते.हीच माणसे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवीत असतात.त्यामुळे त्यांचे ऋण नेहमी बाळगले पाहिजे.

स्वतःला बदलण्यासाठी फार कष्ट नाही घ्यावे लागत.काही सवयी बदलल्या ,दृष्टिकोन बदलला की आपोआप सर्व साध्य होते.फक्त गरज आहे ती स्वतःला बदलून घेण्यासाठी मानसिक तयारीची.आणि खात्री आहे, तुम्हाला जर आयुष्यात शांतता हवी असेल तर तुम्ही नक्की स्वतःला बदलून घ्याल आणि स्वतःचे एक ‘आदर्श व्हर्जन’ तयार कराल.
‘ऑल द बेस्ट!’


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “शांतता हवी असेल तर वाद घालण्यापेक्षा स्वतःलाच बदलून घ्या.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!