Skip to content

स्वतःच्या महत्वकांक्षा विषयी रोज काहीतरी लिहा, त्या गोष्टी हळूहळू तुमच्यात उतरतील.

स्वतःच्या महत्वकांक्षा विषयी रोज काहीतरी लिहा, त्या गोष्टी हळूहळू तुमच्यात उतरतील.


टीम आपलं मानसशास्त्र


मला नेहमी एक गोष्ट आठवते. एक लहान मुलगा रोज पाऊस पडेल या विचाराने , खात्रीने छत्री घेवून जात असे. सगळे लोक त्याला वेड्यात काढत. पण त्याची खात्री होती की एक ना एक दिवस पाऊस पडेल. आणि खरेच एक दिवस पाऊस पडतो तेव्हा त्याच्या छत्रीचा उपयोग होतो. आणि इतर लोक जे त्याच्यावर हसत असतात ते त्या क्षणी भिजत असतात. यात त्याची खात्री आणि विश्वास दिसतो.

आयुष्यात प्रत्येकाला काही ना काही महत्वाकांक्षा असते. कोणाला उच्च शिक्षण घ्यायचे असते .कोणाला चांगली नोकरी , कोणाला परदेशात स्थायिक व्हायचे. तर कोणाला सुंदर मुलीशी लग्न करून आनंदी संसार करायचा असतो. कोणाला परदेश भ्रमंती. कोणाला एव्हरेस्ट सर करण्याची महत्वाकांक्षा.. कोणाला भरपूर पैसे कमवून सर्व आनंद मिळवायचे असतात. तर कोणाला आपल्याकडे जे नाही ते मिळवण्याची महत्वाकांक्षा असते. किती किती म्हणून सांगावे.

तुमची महत्वाकांक्षा खूप छोटी असो , मोठी असो किंवा आता तुमच्या कक्षे बाहेरची असो. पण ती महत्वाकांक्षा जर खरेच खूप strong असेल. ती पूर्ण करण्याचा तुम्ही निश्चय केला असेल तर ती नक्कीच पूर्ण होते.

जी महत्वाकांक्षा आहे ती मनात आल्यापासून ती पूर्ण होईपर्यंत सतत त्याचा ध्यास घेणे जरुरी असते. याकरिता
स्वतःच्या महत्वकांक्षा विषयी रोज काहीतरी लिहा, त्या गोष्टी हळूहळू तुमच्यात उतरतील.

१. महत्वाकांक्षा याचा अर्थ आधी समजून घ्या :
तुम्ही तुमच्या काही इच्छा ठेवता . आकांक्षा बाळगता. ध्येय ठरविता यात तुम्हाला तुमचे समाधान मिळणे महत्त्वाचे असते.

पण जेव्हा तुम्ही तुमची महत्वाकांक्षा ठरविता तेव्हा त्याचा अर्थ काय होतो ? महत्व + आकांक्षा = यात एक तर तुम्ही स्वतः तुमची काही तरी महत्वाची आकांक्षा ठेवता किंवा ध्येय ठरविता त्याकरिता खटपट , धडपड करत असता.

दुसरे हा विचार करा . की महत्व +आकांक्षा म्हणजे तुम्हाला काही तरी महत्व पाहिजे. जे इतरांच्या कडून अपेक्षित आहे. दुसऱ्या कोणी तुम्हाला महत्व देईल ही आकांक्षा.

आता इतरांनी तुम्हाला महत्व द्यावे असे का वाटते तर तुमच्यात काही तरी न्यूनगंड असतो. कमतरता असते. आणि ती नकारात्मकता तुमचे मन खात असते. आणि सगळ्यात महत्वाचे तुम्हीच तुम्हाला ओळखले नसते. तुम्ही तुमची योग्यता ओळखली नसते. तुमच्यातली क्षमता ओळखली नसते.त्याचमुळे इतरांनी का तुम्हाला महत्व द्यायचे ?आणि इतरांची जर तेव्हढी क्षमता नसेल तुम्हाला पारखण्याची तर ?

महत्वाकांक्षी म्हणजे तुम्ही तुमच्यातल्या उत्कृष्टतेवर भर द्या. दुसऱ्या कोणाशी ही तुमची तुलना करूच नका. फक्त स्वतः ला चांगले ओळखा. तेव्हा तुम्हाला तुमचे चांगले गुण , तुमच्यातली सर्वात unique गुण समजतील.

याचा वापर करून तुम्ही तुमची ध्येय प्राप्ती करता आणि यशस्वी होता तेव्हा त्याला महत्वाकांक्षी म्हणतात.

नाही तर प्रत्येकजण काही ना काही ठरवतो ..हे करू , ते करू , मी असा , मी तशी आहे . असे होणार पण ते ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतः ला समजून घेत नाहीत .आणि अपयशी होतात.

तुम्हाला जर तुमच्या महत्वाकांक्षा प्रत्यक्षात पूर्ण होण्यासाठी , सत्यात उतरविण्यासाठी काही गोष्टी नियमित केल्या पाहिजेत. त्यातलीच पहिली गोष्ट म्हणजे
स्वतःच्या महत्वकांक्षा विषयी रोज काहीतरी लिहा, त्या गोष्टी हळूहळू तुमच्यात उतरतील.

१. पहिली गोष्ट तुमची महत्वाकांक्षा फिक्स करा. जसे KBC मध्ये ऑप्शन लॉक किया जाये तसे.

२. महत्वाकांक्षा ठरली की रोजचे ध्येय ठरवा. आणि ते रोजच्या रोज पूर्ण करून लिहून ठेवा.
उदाहरणार्थ :- तुम्हाला मोठा उद्योगपती व्हायचे आहे आणि मोठे नाव आणि खूप पैसे कमवायचे आहेत .
त्याकरिता कोणता उद्योग करणार हे आधी नक्की करा. तो लिहून ठेवा.

तो करण्याकरिता तुमचे पुरेसे शिक्षण आहे का ? ज्ञान आहे का ? कमीत कमी आणि जास्तीत जास्त भांडवल किती लागेल याचा अभ्यास करा आणि ते ते मुद्दे लिहून ठेवा. याखेरीज मनुष्यबळ आणि तेही प्रशिक्षित असे लागणार त्याकरिता मुद्दे आणि ओळखीच्या किंवा माहितीतल्या व्यक्ती शोधा. किंवा अशा काही संस्था असतात ज्या योग्य व्यक्ती तुमच्या पर्यंत पोहचवितात त्यांची माहिती घ्या आणि नोंद ठेवा.

माझ्याकडे ज्या उणिवा होत्या किंवा कमतरता होत्या त्या कमी करण्यासाठीं काय प्रयत्न केले आणि सकारात्मक गोष्टी कोणत्या केल्या. स्किल वाढविण्यासाठी कोणती एक स्टेप पुढे गेलो याची नोंद ठेवा.

अगदी ग्राफ जरी केलात तरी रोजच्या रोज तुम्हाला सूक्ष्म बदल जाणवतील.

आधुनिक तंत्रज्ञान , तुमच्या प्रॉडक्ट करिता रिसर्च आणि devlopment करा. जेणेकरून तुमचे प्रॉडक्ट सर्वोत्कृष्ट असेल.

हो आणि केवळ प्रॉडक्ट सर्वोत्कृष्ट असून उपयोगी नाही ते लोकांच्या पर्यंत पोहचणे गरजेचे असते . आणि त्याचा खप होवून तुमचा आणि कंपनी चा टर्न ओव्हर वाढणे गरजेचे असते. शिवाय तुमच्या प्रॉडक्ट ला कायमस्वरूपी मागणी कशी राहील या करिता विचार , प्रयत्न आणि सुधारणा करणे , मार्केटिंग योग्य करणे जरुरी असते. तसे प्लॅन रोजच्या रोज किंवा काही दिवसांनी , महिन्यांनी , वर्षांनी लिहून ठेवून रोजच्या रोज ते कोणते बदल करणे गरजेचे आहे किंवा बदलत्या परिस्थितीत काय करणे गरजेचे हे सगळे छोटे छोटे मुद्दे लिहून तसे प्रोग्रेस करणे जरुरी असते.

३. सकारात्मकता ठेवा.
रोम एका रात्रीत बांधून नाही झाले. Rome was not built in a day.

त्या करिता रोजची मेहनत लागली. रोज थोडे थोडे काम .. कधी त्यात अपयश ही आले असणार. कधी अडथळे असणार. हवा , पावुस , थंडी यांचा परिणाम ही झाला असणार.

तसेच आहे एखादी महत्वाकांक्षा ही आता ठरविली आणि झाली असे होत नाही. त्याकरिता सातत्य , प्रयत्न , नावीन्य , शोध , संशोधन , प्रगती , स्किल , फंड , मनुष्य बळ , advertising, मार्केटिंग, आणि कधी कधी सगळे असून rejection येते . तेव्हा प्रॉडक्ट परत काही बदल , काही सुधारणा , संशोधन करून निर्मिती करावे लागते. Management करावी लागते.

म्हणजे कधी प्रॉफिट वर काम करावे लागते. कधी लॉस ही येवू शकतो. तर कधी कमी प्रॉफिट वर ही काम करावे लागते. होणारे up and downs. मार्केट मधली , लोकांची आवड निवड , गरज लक्षात घ्यावे लागतात. ते बदल रोज नोंद करून तसे बदल झाले का हे तपासावे लागते.

अपयश आले म्हणून नाराज होवून , नकारात्मक होवून आता सगळे संपले असे म्हणून हताश न होता परत सकारात्मक होवून आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. याची सगळ्याची आपण तपशीलवार नोंद ठेवावी लागते याचे कारण छोट्याशा यशाने आपण हुरळून जातो ते न होता सत्याची जाणीव होते.

४. प्रयत्न , सातत्य , आणि सगळ्यात महत्वाचे awarness आणि consciousness जरुरीचं असतो.
प्रत्येक गोष्टीत जागरूक , सावध असणे गरजेचे असते. ध्येय प्राप्तीसाठी सभोवतालच्या परिस्थिती नुसार स्वतः मध्ये बदल करणे गरजेचे असते. त्यामुळे minute detailing ची नोंद ठेवणे गरजेचे असते.

पूर्वी घडलेली एखादी चूक त्यातून झालेले नुकसानीची नोंद ही ठेवावी म्हणजे तो अनुभव गाठीशी असताना परत कोणत्या चुका करू नयेत याची कायम खबरदारी घेतली जाते. आणि त्यात सुधारणा करण्याकरिता काय केले पाहिजे हे action plans लिहून ते अमलात आणावेत.

५. महत्वाकांक्षा पूर्ण करतानाचे प्रत्येक टप्पे याची समरी आणि पुढचे टप्पे याची योजना लिहून तसे अमलात येण्याकरीता करावे लागणारे प्रयत्न यांची नोंद ठेवा.

६. महत्वाकांक्षा पूर्ण करत असताना होणारे त्रास , सहन करावे लागणारे काही प्रसंग , मिळणारे सुख , शांती , आनंद , समाधान हे लिहून ठेवावे. ज्यातून आपण खरेच
नक्की आपली ध्येय पूर्ण करताना आपल्या महत्व कांक्षे जवळ पोहचलो आहोत का हे खात्री करता येते. किंवा अजून तो टप्पा येण्याकरीता ..गाठण्याकरिता प्रयत्न.

७. खात्री आणि विश्वास : स्वतः वर खात्री आणि विश्वास ठेवा. आणि तो इतरांना सांगण्यापेक्षा तुमच्यातल्या ती खात्री आणि विश्वास निर्माण होणाऱ्या गोष्टी , गुण यांचा विचार करा. आणि ते अजून वाढविण्याकरिता वाचन , बोलणे , सोशल मीडिया यांचा उपयोग करून ते मुद्दे लिहून ठेवून कसे वापरता येतील हे विचार करा.

८. स्वतःच्या महत्वकांक्षा विषयी रोज काहीतरी लिहा, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते वाचत जा , अमलात आणत जा . तर त्या गोष्टी हळूहळू तुमच्यात उतरतील.

आयुष्य सुंदर आहे. पण तितकेच अवघड ही आहे. सुख दुःख , अडीअडचणी त्यावर मात , संकटांचा सामना करत स्वतः वर विश्वास ठेवत आपली ध्येय पूर्ण करण्याचा मानस , महत्वाकांक्षा ठेवा.

गरुड त्यांची महत्वाकांक्षा ठेवतो की आकाशात सर्वात उंच भरारी घ्यायची .त्यात प्रयत्न करत असतो सातत्य असते. म्हणून ते शक्य होते.

तसेच आहे आपले ही स्वतःच्या महत्वकांक्षा विषयी रोज काहीतरी लिहा, म्हणजे त्याला मूर्त स्वरूप येत जाईल.perfection येत जाईल. त्या गोष्टी हळूहळू तुमच्यात उतरतील.आणि तुमचे यश प्राप्ती , ध्येय प्राप्तीची महत्वाकांक्षा पूर्ण होईल.

If you have a target in your mind then it is a challenge. We must achieve the goal with our whole mind and use our strength to make it true , even if we fail it is not the last chance. And we have to try again harder and harder next time. And for it we have to note it down again and again and work on it.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!