Skip to content

तुमच्या वयात आलेल्या मुलांबरोबर STRESS या टॉपिकवर असं बोला.

तुमच्या वयात आलेल्या मुलांबरोबर STRESS या टॉपिकवर असं बोला.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


पालकत्व म्हणजे वाटते तेवढी साधी गोष्ट नाही. जसं कुंभार मातीच्या कच्च्या गोळ्याला आकार देत त्याच सुबक भांडं बनवतो तसच पालकांच असत. हा आकार देत असताना कुंभाराला खूप काळजी घ्यावी लागते. जरा दुर्लक्ष झाल तर भांडं खराब होण्याची, ते वेडवाकडं होण्याची शक्यता असते. म्हणूनच खूप काळजीपूर्वक सर्व करावं लागत. मुलांच्या आयुष्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाला जर पहिल्यांदा आकार देण्यासाठी कोणाचा हात लागत असेल तर तो पालकांचा असतो. ते त्यांचं व्यक्तिमत्त्व घडवत असतात. हे घडवत असताना त्यांना खूप काळजी घ्यावी लागते. आणि त्यात जर मुल वयात येणार असेल तर ही जबाबदारी अजून वाढते.

कारण या वयात मुलांना अनेक नवनवीन अनुभव येत असतात. अनेक गोष्टींना ते सामोरे जात असतात. शारीरिक बदल देखील होत असतात. हे त्यांना खूप नवीन, अनोळखी असे असतात. शिक्षण, मित्रपरिवार, आजूबाजूच वातावरण सर्वच नवीन असत. अश्या परिस्थितीमध्ये अनेक मुल ताण म्हणजेच स्ट्रेस अनुभवतात. यावेळी त्यांना अश्या व्यक्तीची गरज असते जी या स्ट्रेस मधून त्यांना बाहेर कसं पडायचं यासाठी योग्य मार्गदर्शन करेल. त्याच्या सोबत असेल. पालकांची भूमिका इथे महत्त्वाची ठरते.

कारण या वयात जर चांगल्या पद्धतीने कोण मार्गदर्शन करू शकत असेल तर ते पालक असतात. आणि मुल सर्वात जास्त पालकांच्या जवळ असतात. त्यामुळे ती जितकी मोकळेपणाने आपल्या पालकांशी बोलतील तितकी बाहेर कोणाशी बोलण्याची शक्यता कमी असते. अर्थात पालकांनी तस नात तयार करण्याची पण गरज असते. तरच ते आपल्या मुलांशी यावर बोलू शकतील. तर हा जो ताण मुलांना जाणवतो, किंवा पुढे जाऊन जाणवू शकतो त्यावर पालकांनी त्यांच्याशी कसं बोलायच ते पाहू.

१. कोणत्याही प्रकारे भाषण द्यायचं नाही: एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बोलण हे नेहमी दोन्ही बाजूने होत असत. ज्याला two way communication असं म्हणतात. फक्त एक बोलतोय आणि दुसरा ऐकतोय तर ते बोलण राहत नाही. बोलण्यात समोरच्या व्यक्तीला पण व्यक्त व्हायला जागा दिली जाते. जेव्हा आपण आपल्या मुलाशी स्ट्रेस बद्दल बोलाल तेव्हा तेही दोन्ही बाजूंनी असल पाहिजे. कुठल्यातरी महत्त्वाच्या विषयवार आपण भाषण देतोय अस आपलं बोलण असता कामा नये.

२. नीट ऐका: आपल्याला जर आपल्या मुलांना ताणाला कसं सामोरं जायचं हे सांगायचं असेल तर ते काय सांगत आहेत हे नीट ऐकून घ्यावं लागेल. अनेक पालक मुल काहीतरी सांगू लागली की मधेच बोलू लागतात. तु अस कस केलस, हे अस काही नसत. अस बोलण केल जात. पण यातून त्या मुलाला काय सांगायचं आहे ते अर्धवट राहत. त्यामुळे मध्ये त्याच बोलण न तोडता काळजीपूर्वक ऐकून घ्या. त्याला काय सांगायच आहे ते समजून घ्या. म्हणजे मग आपण त्यावर कश्या पद्धतीने बोलायच हे समजेल.

३. वातावरण हलक फुलकं ठेवा: आपल्याला एखाद्या विषयावर बोलायच आहे याचा अर्थ समोरासमोर खुर्च्या मांडून गंभीर चेहरे करून बोललं पाहिजे अस नाही. जितकं तुम्ही नॉर्मल राहणार तितकं मुल सहजपणे मोकळेपणाने गोष्टी सांगू शकत आणि तुम्ही सांगितलेले ऐकू शकत. त्यामुळे घरातलं काहीतरी काम करत असताना, बागेत गेलेलं असताना, अश्या वेळी तुम्ही या विषयावर बोलू शकता.

४. ओव्हररिऍक्ट करू नका: जेव्हा मुल असे काही अनुभव आपल्याला सांगत असतात तेव्हा त्यात काही गोष्टी अश्या असतील ज्यांची आपल्याला अपेक्षा नसेल. पण म्हणून त्या गोष्टी कानावर पडल्यावर त्यावर लगेच रिऍक्ट केल तर त्याने मुल uncomfortable होऊ शकत. ते कदाचित पुढच्या वेळी काहीतरी सांगताना कचरेल. म्हणून ओव्हररिऍक्ट करू नका. त्यांना या गोष्टीची जाणीव करून द्या की अश्या गोष्टी होऊ शकतात. आपल्या त्याला कस हाताळायचे हे पाहायचं आहे.

५. शिकवण्याचा पवित्रा घेऊ नका: मुलाने काहीही सांगितल तरी त्यावर नाही तू यापुढे असच केल पाहिजे. तू असच वागल पाहिजे. अस बरेचदा सांगितल जात. पण याची काही गरज नाही. प्रत्येक बोलण्यातून काहीतरी मोठ निष्पन्न व्हायला पाहिजे किंवा मुलाला त्यातून खूप मोठा धडा दिला पाहिजे अस नाही. त्यामुळे बोलण सहज सोप्प हलक असुदेत. मुलाला आपल्याला हीच जाणीव करून द्यायची आहे की तो किंवा ती एकटी नाहीये. त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत आहात. त्यांना आधार त्याला कोणतरी आहे.

६. समानुभुतीपूर्वक वागा: सहानुभूती आणि समानुभुती यात फरक आहे. सहानुभूती म्हणजे sympathy. यात माणूस फक्त समोरच्या माणसाला जो दुःखात आहे त्याच्या दुःखात सामील व्हायचा प्रयत्न करतो. म्हणजेच सोबत करायचा प्रयत्न करतो. पण यात स्वतःच वाहून जायची शक्यता जास्त असते. तसच समोरच्याला जे काही जाणवत आहे ते आपल्याला तीतक्याच तीव्रतेने जाणवत असही नसत. पण समानुभूती म्हणजे empathy याच्या पुढे जाते. आपण समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातून त्याच जग पाहायचा प्रयत्न करतो. त्याच दुःख सुख समजून घ्यायला पाहतो आणि इतकंच नाही तर त्यातून बाहेर पडायला पण मदत करतो. जेव्हा आपल मुल आपल्याशी काही गोष्टी शेअर करेल जेव्हा आपण empathetic होण गरजेचं आहे. म्हणजेच काय तर मी समजू शकते तुला काय वाटत आहे. मी अश्या गोष्टीतून गेलेलो आहे अस जरी सांगितल तरी मुलांना आधार मिळतो. कारण आपण एकटेच नाही जो हे अनुभवतो आहे हे समजत. त्याचबरोबर आपल्याकडे अनुभव नावाची जी शिदोरी असते ती खूप मौल्यवान असते. त्यातून आपण बरेच काही शिकलेलो असतो तेच आपल्याला आपल्या मुलांना सांगायचं आहे. त्यांच्या अनुभवात आपल्याला वाटेकरी व्हायचे आहे.

७. पार्टनर व्हा: मुलांशी जर नात चांगल ठेवायच असेल तर या वयात मुलांचा मित्र व्हावं लागत. जो त्यांच्यासोबत असेल. तुम्ही पण त्यांचे पार्टनर व्हा. असा पार्टनर होऊन तुम्ही मिळून काही गोष्टी करायच्या आहेत. जसे की स्ट्रेस रिलीफसाठी, व्यवस्थापन करण्यासाठी काही चांगले व्यायाम आहेत, एक्सरसाईस आहेत ते तुम्ही एकत्र करू शकता. ज्यात mindfullness आहे, योगा आहे.

या सर्व गोष्टी तुम्ही नॉर्मल ताण कमी करण्यासाठी करू शकता. अश्या पद्धतीने त्यावर बोलू शकता. पण तुमच मुल जर जास्तच ताण अनुभवत असेल, त्याच्या रोजच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असेल तर मात्र लवकरात लवकर चांगल्या कौन्सिलरची मदत घेणं योग्य ठरतं.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!