सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष असावं, ही स्वकेंद्रित समस्या अशी कमी करा.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक वावरत असतात ज्यांना सर्वांचं लक्ष आपल्याकडे असावं अस वाटत असत. त्यांचं वागणं, बोलण, एकंदरीत वावर असा असतो की चार लोकांचं त्यांच्याकडे लक्ष जाईल. काहीतरी वेगळाच पेहराव करण, नाट्यमय हावभाव, छोटा प्रसंग पण वाढवून सांगणं या सारख्या गोष्टी करून ते लोकांचं लक्ष सहज वेधून घेतात. सर्व लोकांनी माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी ही वृत्ती असते. यातून अनेकदा आपण लोकांना कश्या पद्धतीने आवडू शकतो अस वर्तन करण्यावर भर जास्त असतो. आपलं जे खर व्यक्तिमत्त्व असत ते कुठेतरी हरवून जात. फक्त लोकांचं लक्ष वेधून घ्यायच म्हणून माणूस आपला खरेपणा घालवून बसतो. हे वर्तन एकटेपणा, मत्सर, स्व आदर कमी असण या गोष्टीमुळे निर्माण होत. तसच यामागे personality disorder पण असू शकतो. या अश्या वागण्याचा त्या माणसाच्या नात्यावर परिणाम होतो. नाती तुटतात. कारण लक्ष वेधून घेण्याचा नादात अनेकदा व्यक्ती समोरच्या व्यक्तीला manipulate करायचा प्रयत्न करते. या सर्व गोष्टी समस्या निर्माण करतात म्हणून हे स्वकेंद्रित वागणं कमी करायची गरज असते. ती कशी करायची ते पाहू:
१. स्वतः ला चांगल्या निरोगी पद्धतीने व्यक्त करा: इतरांच लक्ष वेधून घेण्याची जी वृत्ती असते यात माणूस समोरच्याला जसं आवडेल तस वागण्याचं प्रयत्न करत असतो. यातून आपला खरेपणा, आपला सच्चे व्यक्त होत नाही. म्हणून या समस्येतून बाहेर पडायचे असेल तर आधी आपण जिथे आहेत तसे व्यक्त होऊ शकतो असे मार्ग शोधा. मग यात आपली क्रिएटिव्हीटी येऊ शकते. पेटिंग करा, काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा, क्राफ्ट बनवा. जिथे जिथे आपण व्यक्त होऊ शकतो, चांगल्या पद्धतीने आपलं व्यक्तिमत्त्व निघू शकत अश्या गोष्टी करणे.
सोशल मीडिया हल्ली सर्वजण वापरतात. त्यावर वेगवेगळ्या पोस्ट त्यावर कॅप्शन टाकलेले असतात. इथे पण बऱ्याचदा आज माझ्यासोबत किती वाईट घडल, किंवा अशी प्रत्येक डिटेल टाकली जाते ज्यावर लोक लक्ष देतील आणि काहीतरी रिप्लाय देतील. हा सुध्दा लक्ष वेधून घेण्याचाच एक मार्ग आहे. अस न करता सोशल मिडीयाचा चांगल्या पद्धतीनं वापर करा. लोकांनी काहीतरी रिप्लाय द्याया म्हणून आपण काही टाकत नाही ना याचा एकदा विचार करा. मनातील भावना वाढवून न टाकता जेव्हढ्यास तेव्हढ्या टाका.
इतरांकडे लक्ष द्या. आपल्याकडे सर्वांचं लक्ष असावं ही वृत्ती कमी करायची असेल तर आपण इतरांकडे लक्ष देण्याची गरज असते. अश्या बऱ्याच संस्था असतात जिथे स्वयंसेवकांची गरज असते. जिथे मदत हवी असते. तिथे काम करा. आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकलो ही भावना मनाला खूप समाधान देणारी असते. इतर लोकांसोबत वेळ घालवा. त्यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट स्वतःची इतरांसोबत तुलना करू नका. तुलना केल्याने आपल्यामध्ये कमीपणाची जाणीव निर्माण होते. जी आपल्याला काढून टाकायची आहे. अशी तुलना न करता आपल्याकडे काय चांगल आहे याकडे लक्ष द्या.
२. सकारात्मक बदल करा: वर्तन, स्वभाव सुधारायचा असेल तर बदल हा आवश्यक असतोच. म्हणूनच स्वतः मध्ये सकारात्मक बदल करण गरजेचं आहे. त्यासाठी पहिली गोष्ट स्वतः ला माफ करायला शिका. आपल्या अश्या वागण्याने आपण याआधी आपण कदाचित नाती खराब केली असतील, काहीतरी प्रोब्लेम क्रिएट करून ठेवले असतील पण त्या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत. आपण काहीतरी चूक केलेली आहे ही जाणीव आपल्याला सुधारणा करण्यासाठी पुरेशी असते. म्हणून झाल्या गोष्टींसाठी अपराधी न वाटून घेता त्या कश्या बदलता येत जेणेकरून पुढे अस काही होणार नाही याकडे लक्ष द्या.
स्वतःसोबत खर राहायचा प्रयत्न करा. म्हणजेच काय तर लोकांना मी कसा हवा आहे याहून मला कसं राहायचं आहे यावर विचार करा. समोरच्या माणसाला आवडते म्हणून मी करतो असं न करता मला जर ते पटत असेल, आवडत असेल तरच मी करणार. मला अमुक एका कपड्यात चांगल वाटत असेल तर मी तेच घालेन, कदाचित ते स्टायलिश नसतील पण मला त्यात चांगल वाटत आहे. आपले म्हणून काही विचार आहेत, आपलं काहीतरी मत आहे याची जोपर्यंत आपण स्वतः ला जाणीव करून देणार नाही तोपर्यंत ते समोरच्या माणसाला सुद्धा समजणार नाही. खर वागण्याबरोबरच स्वतः ला आहे तस स्वीकारणे, प्रेम करणे पण खूप गरजेचं आहे. मीच जर मला आवडत नसेन, माझच माझ्यावर प्रेम नाही तर त्याचा काय उपयोग? म्हणून लोकांनी आपल्यावर प्रेम करायचं असेल तर आपण आधी स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. मी आहे तसा मला आवडतो. हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. Mindfullness म्हणजेच सजगता.
वर्तमानात राहणे आणि आपल्या श्वासावर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर, बदलांवर लक्ष देणे. अस केल्याने आपलं मन विचलित होत नाही. Mindfullness ची प्रॅक्टिस यात खूप प्रभावी ठरते. यात आपण आपल्या शारीरिक हालचालींकडे तसेच आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचे आहेत. यामुळे आपल्या मनातील नकारात्मक भावना जसे की अपराधीपणा, लाज कमी होण्यास मदत होते. जेव्हा आपण इतरांच लक्ष वेधून घ्यायला पाहतो तेव्हा आपला बराचसा वेळ हा लोकांमध्ये जातो.
म्हणून हे कमी करून स्वतःसोबत वेळ घालवणे. बागेत फिरायला जा, एखाद पुस्तक वाचा, स्वतःसाठी काहीतरी खायला करून घ्या. आपला सहवास एन्जॉय करा. तसच आपण अस का वागतो याची कारण शोधायचा प्रयत्न करा. आपल्याला आपल्यातील चांगल्या गोष्टी जर माहीत असतील तर कमकुवत बाजू पण माहीत पाहिजेत. एखाद्या गोष्टीमागचं कारण समजल तर ती नीट करता येते. म्हणून स्वतःच्या अश्या वागण्याची कारणं शोधा. ती लिहून काढा. यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो काही बदल करण्याचा योजला आहे तो काळजीपूर्वक लिहून ठेवणे आणि त्याची प्रोग्रेस चेक करत राहणे. अस केल्याने आपण आपल्या ट्रॅकवर कितपत आहोत याची माहिती मिळते.
३. मदत मिळवा: बरेचदा आपण आपल्यात जे बदल करायला सुरुवात करतो ते आपल्याला लगेच दिसून येत नाहीत. अश्या वेळी असा एखाडा मित्र जो आपल्याला यात मदत करू शकेल त्याची मदत घ्या. त्याला आपण जे काही बदल करायचं ठरवलं आहे ते सांगा आणि ते बदल कितपत आणि कसे होत आहे, योग्य पद्धतीने होत आहेत ना हे पाहून सांगायला सांगा. अस होऊ शकत की आपल्याला जी गोष्ट पसंद पडणारी नाही, किंवा ऐकायची इच्छा नसेल ती गोष्ट तो सांगू शकतो. ती ऐकण्याची आपली तयारी पाहिजे जर आपल्याला नीट बदल करायचे असतील. लक्ष वेधून घेणे हा आपला जर स्वभावच झाला असेल तर तस वर्तन करताना आपल्याला त्याची तितकी जाणीव असत नाही. ते आपसूक घडून जात. अश्या वेळी हा मित्र आपल्याला मदत करू शकतो. त्याला आपण सांगू शकतो की जिथे आपण अस वर्तन करत आहोत अस वाटत आहे ते त्याने सांगावं. जेणेकरून आपल्याला त्याची जाणीव होईल.
जसं सुरवातीला म्हटल हा एखादा आजार असू शकतो. जर आजार असेल तर यात व्यसन लागण्याची पण शक्यता असते. हे कमी करण्यासाठी support group जॉईन करण फायदेशीर ठरत. जर असा support group तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुम्ही individual therapy देखील घेऊ शकता. याने देखील समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. कारण थेरपी अश्या वागण्याच्या मूळ कारणांचा शोध घेऊन ते बदलाण्यवर भार देते. आपली विचार पद्धती बदलली की आपसूक आपल्या वागण्यात देखील फरक पडतो.
अश्या पद्धतीने आपण आपली ही समस्या कमी करू शकतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
