वैवाहिक नात्यांमध्ये समस्या असणाऱ्यांनी हा लेख जरूर वाचावा.
हर्षदा पिंपळे
सख्या…
तु असता तर….
मला माझ्या बटा
सावरता आल्या नसत्या….
आणि
माझ्या बटांचा मोह
तुला आवरता आला नसता……..
तु असता तर…. !
पहा,इतकं गोड गोंडस नातं केवळ प्रेयसी आणि प्रियकराचच असतं असं नाही.लग्नानंतरही अर्थात वैवाहिक नातही असचं गोड गोंडस असतं.सुरूवातीला सगळं छान चाललेलं असतं.नव्याचे नऊ दिवसही छानच जातात.आणि सगळ्यांचच नातं शेवटपर्यंत टिकून राहतं असं नाही. कुणाचं नातं कधी कधी अर्ध्यावरच तुटतं.तर कुणाचं नातं अगदी शेवटपर्यंत फुलासारखं फुलत राहतं. पण,नाही म्हंटलं तरीही नॉर्मल आयुष्यात जसे प्रॉब्लेम्स येतात तसेच प्रॉब्लेम्स वैवाहिक आयुष्यातही येतात.
घरातील नात्यांमध्ये जसे वाद निर्माण होतात,समस्या येतात तशाच समस्या या वैवाहिक नात्यातही येतात.आता भिन्न स्वभाव असल्यामुळे साहजिकच एकमेकांशी आणि घरातील इतरांशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतोच. कधी कधी तर पटत नाही. आणि त्यावरून हळुहळू खटके उडणे,वेगवेगळे वाद निर्माण होणे,संवाद तुटणे,एकमेकांशी तुच्छतेने वागणे, एकमेकांचा तिरस्कार करणे अशा गोष्टी वाढू लागतात. आणि साहजिकच यामुळे वैवाहिक नातं गढूळ होत जातं.
वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण होतो. कधी कधी तर गोष्टी इतक्या टोकाला पोहोचतात की “मी का लग्न केल या माणसाशी?/मी का लग्न केलं या बाईशी?” असं बोलण्यापर्यंत दोघांची हिम्मत वाढते. इतकच नाही तर कधी कधी अपत्य असूनही थेट घटस्फोटाचा पर्याय विचारात घेतला जातो. लहान मुलाचा विचार यामध्ये बाजूलाच राहतो.कधी संशयी वृत्ती, तर कधी कधी घरातील सदस्यांची चुकीची वागणूक यामुळेही वैवाहिक नात्यात समस्या येतात.आणि आता वैवाहिक नातं आलं म्हणजे शारीरिक जवळीक तर येणारच.
तर अनेकदा काय होतं वेळेअभावी, कामाअभावी ही शारीरिक जवळीक साधता येत नाही.त्यामुळे कधी कधी चिडचिड वाढून वैवाहिक नातं कोमेजायला लागतं.नाही म्हंटलं तरी कित्येक कारणं आजही वैवाहिक नात्यात समस्या बनून उभी राहतात.त्या कारणांची लिस्ट कधी संपूच शकत नाही. कारण कोणत्या ना कोणत्या नव्या कारणांची उत्पत्ती ही होतच असते.कारणं वाढतच राहतील आपण मात्र सोल्युशन कसं काढता येईल याचा विचार करायला हवा.
तर इथे असलेल्या प्रत्येकाचं वैवाहिक नातं किती सुंदर आहे आणि किती नाही? याची कल्पना मला नक्कीच नाही. ज्यांच नातं सुंदर असेल,ज्यांच नातं अगदी फुलांसारखच दरवळत असेल तर ती निश्चितच चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यांच्या नात्यात काही समस्या आहेत, वाद आहेत ,वैवाहिक नातं तुटण्याच्या मार्गावर आहे त्यांनी हा लेख जरूर वाचावा. हा लेख त्यांच्यासाठीच !
तर,वैवाहिक नातं हे कसं असेल आणि कसं नाही याचा अंदाज हा सहसा बांधता येणं अशक्यच आहे.तरीही या वैवाहिक नात्यात वेगवेगळ्या समस्या येतच असतात.तर अशावेळेस नक्की काय करायला हवं आणि काय नाही याचा विचार प्रत्येक जोडप्याने,जोडीदाराने करणं आवश्यक आहे.आणि नातं टिकवायचं असेल तर त्यासाठी दोघांनीही प्रयत्न करणं must आहे. कारण वैवाहिक नातं हे दोघांच असतं.परंतु त्याचा परिणाम हा संपूर्ण कुटूंबावर होत असतो.मग तो कधी चांगला असतो तर कधी वाईट असतो.
आता साधारणपणे वैवाहिक नात्यात कोणत्या समस्या असतात तर —
◆एकमेकांशी न पटणे.वारंवार भांडणं होणे.छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडणे.आर्थिक जबाबदाऱ्यांवरून वेगवेगळे वाद निर्माण होणे.
◆एकमेकांना पुरेसा वेळ देता न येणे.
एकमेकांचा संवाद कमी होणे.संवाद तुटणे.
◆मुलांच्या भविष्याचे निर्णय,
कुटूंबातील वेगवेगळे निर्णय घेताना निर्माण होणारे वाद.
◆एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होणे.
◆घरातील सदस्यांमुळे होणारे प्रॉब्लेम्स.
◆एकमेकांना पुरेशी स्पेस नसणे.
◆कुटूंबाच्या जबाबदाऱ्यांमधून, कामाच्या जबाबदाऱ्यांमधून एकमेकांना पुरेसा वेळ देता न येणे.
◆शारीरिक जवळीक साधण्यासाठी पुरेशी मोकळीक न मिळणे.
◆संशयी वृत्ती.
साधारणपणे असे नाही म्हंटलं तरी छोटे मोठे प्रॉब्लेम्स हे वैवाहिक नात्यात असतात.आता यात वेगळं वाटून घेण्यासारखं काहीच नाही. फरक इतकाच असतो की आपल्या जागा बदललेल्या असतात.जसं काळानुसार बदलावं म्हणतात तसच कधी कधी जागेनुसारही बदलणं आवश्यक असतं.कुठेतरी, कधीतरी तडजोड ही करावी लागते.इतकच की आपल्याला त्याची सवय नसते. दुसऱ्या जागेत, दुसऱ्या वातावरणात मुरायला थोडा वेळ तर लागणारच नं ?
सगळेच एका वर्षात छान सेटल होऊ शकतात असं नाही. प्रत्येकाचं नातं हे क्षणार्धात फुलतं असं नाही. सगळीच नाती क्षणात मुरणारी,क्षणात फुलणारी नसतात. काही नात्यात वेळ हा लागतोच.आणि असे प्रॉब्लेम्स हे वैवाहिक नात्यात येतच असतात हे स्विकारून पुढे जाता यायला हवं.कारण,कधी कधी दोघांची किंवा कुणाचीही चुक नसते चुक असते ती परिस्थितीची.पण मग त्यावेळी आपण परिस्थिती पाहत नाही. उलट एकमेकांना दोष देत बसतो.एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहतो.यामुळे काय होतं तर एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होत जातो.
कामाचा ताण,चिडचिड, वेळेचा अभाव,शारीरिक जवळीकतेचा अभाव , कौटुंबिक, आर्थिक समस्यांचा डोलारा वाढत जातो.आणि साहजिकच या सगळ्याचा परिणाम मनावर, घरावर,आरोग्यावर होत असतो.आणि कधी कधी हा परिणाम सहन होण्यापलिकडे जातो.शेवटी अनेक जोडपी वेगळं/विभक्त होण्याच्या मुद्द्यावर येतात.
थोडक्यात काय होतं तर मेहनतीने जोडलं गेलेलं क्षणात तुटायला लागतं.
पण एक सांगा,हे असं तोडणं खरच गरजेचं आहे का?
मित्रांनो, तुटायला आलं किंवा तुटलं तर काय होतं एकदा जाणून घ्या.
◆मानसिकतेवर, शरिरावर/आरोग्यावर वाईट परिणाम होणे.
◆मुलांच्या मनावर, भविष्यावर परिणाम होणे.
◆दोन्ही कुटूंबातील घडी विस्कटणे.
◆करिअरवर, कामावर विपरीत परिणाम होणे.
◆नैराश्य येणे.
◆सगळं चुकलं,सगळं संपलं अशी भावना मनात घर करायला लागणे.
◆थोडक्यात सांगायच तर उरलेल्या आयुष्यावर या गोष्टीचा भयंकर परिणाम होतो.
एकदा विचार करा.असे अनेक परिणाम त्यामुळे होत असतात.खरं तर एक लक्षात ठेवा.इतर समस्यांप्रमाणे याही समस्या आपल्या वैवाहिक आयुष्यात येतच राहणार.त्यांना स्विकारून, त्यावर मार्ग काढून पुढे जाण्यात अर्थ आहे.आणि आले तर येऊद्या आयुष्यात असे प्रॉब्लेम्स. त्यांना फक्त सांभाळायला शिका.नातं जपायचं असेल तर दोघांमध्ये ती जपण्याची क्षमता हवी. ती क्षमतेला नात्यांची ताकद बनवायला विसरु नका.
येणाऱ्या समस्यांचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा त्यावरच काहीतरी सकारात्मक मार्ग काढा.दोघांनी समजून घेतलं तरच हा होणारा गुंता सुटू शकतो याचाही विचार करून पहा.खटके तर उडणारच मग त्यावर अजून चिडायचं की शांतपणे त्याच गोष्टीला आवरायचं याचा विचार करा.
इतके दिवस आपण नात्याला दिलेल्या वेळेची किंमत अशाप्रकारे मोजायची का ? कालपर्यंत जे होतं ते सगळं टाइमपास म्हणून होतं का ? नात्यामध्ये केलेली इनव्हेस्टमेंट,शारीरिक, भावनिक जवळीक सगळं खोटं होतं का ? असचं करायचं म्हणून केलं होतं का ?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधून जरा शांतपणे जाणीवपूर्वक विचार करा.या समस्यांकडे साध्या सर्दी तापासारखं पाहून समजूतदारपणाची, जाणीवेची फुंकर घाला.समस्या सुटायला अनेक मार्ग मोकळे होतील. माहीत आहे, बोलणं,लिहीणं सोपं आहे.परंतु प्रयत्न करणही काही अवघड नाहीये.म्हणून प्रयत्न करा.एकमेकांवर विश्वास ठेवा.
एकाने संशय घेतला म्हणून दुसऱ्याने प्रत्येकवेळी पेटून उठण्याची गरज नाहीये. एकमेकांना वेळ देऊन, सगळं क्लिअर करून गोष्टी सॉर्ट आऊट नक्कीच होऊ शकतात. म्हणून वेळ द्या. स्पेस द्या. समजून घ्या.कधी कधी एकमेकांच्या कलाने घ्या. तरच नातं टिकू शकतं.
मित्रांनो,या सगळ्या समस्यांपुढे आपलं नातं इतकं तकलादू असतं का हो ? या नात्याची किंमत खरच इतकी क्षुल्लक असते का ?
नीट विचार करा आणि सगळा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करा.तुटायला आलेलं सावरलं जाईल.कदाचित ! वैवाहिक नातं आपण सुंदर नक्कीच बनवू शकतो.फक्त प्रत्येक गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघता यायला हवं.एकमेकांमध्ये तितकं understanding असायला हवं. एकमेकांमध्ये कोणत्याही कठीण काळात नातं जपण्याची क्षमता असायला हवी. नाती समृद्ध करणारी जाणीव असायला हवी.
मित्रांनो,वैवाहिक नातं फुलवलं तर फुलत जातं.बहरत जातं.सुखाचा सुगंध शेवटपर्यंत पसरवत राहतं.म्हणून नातं फुलवायला शिका.जपायला शिका.
आपण जोडलेलं नातं आपण नाही जपायचं तर कुणी जपायचं ?
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Need counselling for troubles in my married life