आनंदी आणि सुंदर विचारांचा पाठपुरावा केला की शरीरावर तारुण्य आणि सौंदर्याचे वस्रावरण चढते.
मयुरी महाजन
आपण बरेचदा असे ऐकतो, की किती सुंदर विचार आहेत ,आपण विचारांना सुंदरतेची उपमा देतो, परंतु विचारांची ती सुंदरता आपल्या शरीर आणि मनावरती इतक्या छान पद्धतीने काम करत असते ,त्याची आपल्याला कधी कल्पना सुद्धा नसते,
निम्म्याहुन अधिक खेळ हा विचारांचा आहे ,कारण की कुठलीही गोष्ट कृतीतून घडण्याआधी ती विचारांमध्ये घडते, ज्याच्याकडे काही नाही, आज सर्व संपलं आहे, अशी व्यक्ती जेव्हा शून्यातून आपलं विश्व निर्माण करते, व आपल्याला या परिस्थितीतून बाहेर पडायचे आहे, असा निश्चय करते, काम कुठलेही असू द्या, पण त्यात आवड असेल, तर क्या बात है….
सुनीताताई अशाच एक व्यक्ती आज रोजी 40 शी चे घर ओलांडून गेल्या, परंतु आवड आणि विचार, कला ,माती पासून निरनिराळ्या वस्तू बनवण्याची, मग त्यात माठ, रांजण, दिवे, पणत्या, वृंदावन, झाडे लावण्याची फुलदाणी ,अशा असंख्य वस्तूंना आपल्या कलेच्या जोरावरती आकाराला आणणाऱ्या व त्याला अप्रतिम अशी रंगसंगती देणाऱ्या सुनीताताई नेहमी आनंदी, हसतमुख तर असतातच, परंतु त्यांच्या विचारांच्या संगतीत जेव्हा आपण शिरतो ,तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जाणवणारे तेज, विचारांची गाठलेली ही उंची, आपल्याला त्यांच्या सौंदर्याची व चाळीशी उलटल्यावरही त्यांच्यात असलेले तारुण प्रकर्षाने जाणवते,
शरीराचे वय झालेलं असलं ,तरी मनाचे तारुण्य अजून ज्याच्याकडे आहे, त्याला युवा तरुण म्हणावं, असं स्वामी विवेकानंद सांगतात, आनंद आणि सुंदर विचार याची सांगड आपल्याला जमली ना, बाकी गोष्टी आपोआप घडत जातात ,जे विचार मनाला आनंद देतात, त्यासोबत ते सुंदरही असतात ,
बघा आपण जरी कधी जाणीवपूर्वक आपले हावभाव बघितले असतील, तर आपल्याला हे लक्षात येते ,की जेव्हा आपण आनंदित असतो, तेव्हा आपले विचार व आनंदाच्या त्या लहरी आपल्याला एका चांगल्या भावनेबरोबरच ,आपल्या सौंदर्यातही वाढ करणाऱ्या ठरतात, आणि जेव्हा आपण आनंदी होऊन एखादं काम करतो, तेव्हा ते काम सुद्धा व्यवस्थित छानपणे पार पडते, आपल्या विचारांमध्ये असलेली सुंदरता आपल्या जगण्याचा दृष्टिकोन ठरवते, व जगण्याचा हाच दृष्टीकोन आपल्याला आनंदाकडे घेऊन जाणारा असतो,
शरिराचे तारूण्य टिकवण्यासाठी आज मार्केटमध्ये असंख्य प्रोडक्ट उपलब्ध आहेत, परंतु त्यामुळे तारुण्य खरच टिकतं की फक्त त्याचा आभास म्हणून लोक ते खरेदी करतात ,हाच खरा प्रश्न आहे, परंतु यात एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजते ,की आपले तारुण्य अबाधित राहावे, यासाठी धडपड तरी किती??? तसेच आपले सौंदर्य ,आपण छान दिसावं असं कुणाला वाटत नसेल, प्रत्येकालाच आपण छान दिसावं असं वाटत, परंतु दुसऱ्यांनी आपल्याला स्वीकारावं यासाठी कधी सौंदर्याची बाजी लावू नका, आपण आपल्या स्वतःला सर्वात आधी स्वीकारावं, सौंदर्य अलंकार आहे ,तो अलंकार आपण कसा चढवायचा, हे आपल्या विचारांनी खुलून दिसणार असते ,ते आपलं खरं सौंदर्य असते ,
कारण की बघा जेव्हा कुठली व्यक्ती आपले विचार बोलते, तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातलं तेज, बोलण्याची लकब, आवाजातील स्पष्ट वक्तेपणा, कणखर आवाज ,व तितक्याच नम्रतेची अदब, वाचून अंगावर शहारे खुलतात ,जेव्हा आपण अशा व्यक्तीला भेटतो , तेव्हा जाणवते ,अरे काय ते चेहऱ्यावरचे स्मित हास्य, काय तो चेहरा, ही वाढत्या वयाची तमा म्हणावी की तारुण्य असा प्रश्न पडतो,
ज्याचे विचार सुंदर असतात, तो आपोआपच सुंदर होत जातो, त्याच्यावर शरीराचे तारुण्य व सौंदर्याचे वस्त्रावरण आपोआप चढत जाते ,कारण अशा व्यक्ती आनंदी आणि सुंदर विचारांचा पाठपुरावा करणारी असतात…..
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

लेख खूपच सुंदर आहे