पैशाने विकत घेता येणार नाही अशी कोणतीही गोष्ट जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका.
अपर्णा कुलकर्णी
विक्रांत बारामतीमधील सगळ्यात श्रीमंत आणि यशस्वी बिझनेसमन. त्याची ऐट आणि रुबाब बघून भले भले आश्चर्यचकित होत होते. आज विक्रंतला बेस्ट बिस्नेसमन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला त्याचीच पार्टी होती. पार्टीत सगळेच दिग्गज बिसनेस मन उपस्थित होते.
सगळेच विक्रांतच्या येण्याची वाट बघत असतानाच टाळ्यांच्या कडकडाटात विक्रांत सगळ्यांसमोर येऊन उभा राहिला. २७-२८ वर्षांचा तरुण, अगदीच रुबाबदार आणि देखणा विक्रांत सगळ्यांच्या नजरेत भरला आणि बघता बघता पार्टीला रंग चढला. सगळेच खात, पित, नाचत पार्टी एन्जॉय करत होते. तेवढ्यात एका मुलीचा धक्का विक्रंतला लागला आणि तिच्या हातातील ड्रिंक विक्रांतच्या अंगावर पडले.
विक्रांतचा खूपच महागडा कोट खराब झाला होता त्याने त्या मुलीला ओरडण्यासाठी तिच्याकडे पहिले आणि तो तिच्याकडे बघतच राहिला. सडपातळ, उंच, लांबसडक पण दाट केस, कमनीय आणि तितकाच आकर्षक बांधा, डोळे बारीक पण खूप बोलके, चेहऱ्यावर अगदी निरागस भाव, लाल गुलाबी गाल आणि गुलाबाच्या पाकळी सारखे नाजूक ओठ. तो आ वासून तिच्याकडे बघतच राहिला. ती मुलगी मात्र बारीक चेहरा करून विक्रांत ची माफी मागत होती पण विक्रांत तिच्या ओठांची होणारी हालचाल बघण्यात गुंग होता. शेवटी त्याचा मित्र त्याला भानावर आणत म्हणाला,ही वेदिका, हिचा छोटा केतरिगचा व्यवसाय आहे. आज या पार्टीसाठी केतरिंगची व्यवस्था ती बघत आहे. तेंव्हा विक्रांत भानावर आला पण तेवढ्यात वेदिका निघून गेली होती.
पार्टी संपून दोन दिवस झाले होते तरीही विक्रांत वेदिकामधे हरवून गेला होता. एकदा ऑफिसमध्ये जाताना रस्त्यावर त्याला वेदिका उभी दिसली आणि गाडी पार्क करून तो सरळ तिच्यापुढे जाऊन उभा राहिला. त्याने हात पुढे करत स्वतःची ओळख करून दिली तेंव्हा तिच्या हातांचा नाजूक स्पर्श त्याला झाला आणि अंगावर गोड शहारा आला त्याच्या. त्याने तिथेच गुडघ्यावर बसून सरळ वेदिकाला लग्नाची मागणी घातली पण वेदिकाने नम्रपणे नकार दिला आणि निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत विक्रांत म्हणाला, मला जे हवंय ते आजवर मी मिळवूनच शांत झालो आहे मग तू तर माज प्रेम आहेस. तुला मिळवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.
दोनच दिवसात विक्रांतने वेदिकाची सगळी माहिती मिळवली आणि तिच्या वडिलांच्या दबावाला बळी पडून विक्रांतने वेदिकाशी लग्न केलेही. लग्नाच्या पहिल्या रात्री तो वेदिका जवळ गेला आणि म्हणाला, वेदिका माज तुझ्यावर प्रेम आहे आणि मला जे हवंय ते मी मिलवतोच आणि बघ आज तू माझी झालीस. वेदिकाने रागाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, तू तुझी पावर वापरून बळजबरीने माझ्याशी लग्न केलेस. आता माझ्या शरीरावर पण ताबा मिळवशील पण माझ्या नजरेत तुझ्यासाठी तुला कधीच प्रेम आणि आपुलकी दिसणार नाही.
वेदिकाचे शब्द ऐकून विक्रांत खूप चिडला आणि म्हणाला, माझ्याशी लग्न करायला हजारो मुली मरत असतात तरीही मला तू आवडलीस. काय कमी आहे माझ्यात ?? पैसा, गाडी, बंगला सगळच तर आहे तरीही तू इतका तिरस्कार का करते माझा ?? कारण मला मिळवणं ही तुझी जिद्द होती प्रेम नाही. तू मला मिळवून तुझी जिद्द पूर्ण केली पण माझ्या प्रेमासाठी तू आयुष्यभर तरफडशिल हीच तुझी शिक्षा.
दिवस जात होते पण वेदिका म्हणाल्या प्रमाणे, तिच्या नजरेत तिरस्कार शिवाय काहीच दिसत नव्हते विक्रांतला. तिचे हे वागणे बघून विक्रांत मात्र आतून खूपच दुःखी होत होता. वेदिका खूप मेहनती आणि कष्टाळू मुलगी होती. लग्न झाले इतके श्रीमंत सासर मिळाले म्हणून बसून खावे असे तिला अजिबात वाटले नव्हते.
उलट विक्रांत च्या तोडीस तोड व्यवसाय तिने वाढवला होता ते ही खूपच कमी कालावधीत. वेदिकाला व्यवसायाची जाण आणि समज तर होतीच पण लोकांना बरोबर घेऊन काम कसे करावे हे ही तिला चांगलेच माहीत होते. नेमके हेच विक्रांतला जमले नव्हते. सगळा स्टाफ त्याच्याशी घाबरून वागत होता, त्याचे सगळ्यांशी जेवढ्यास तेवढे संबंध होते, सगळ्यांशी अंतर ठेवून नेहमी श्रीमंतीचा माज ठेवून तो वागत होता तर याउलट वेदिकाचा स्वभाव होता.
एकदा कामाच्या व्यापामुळे वेदिका चक्कर येऊन पडली तर सगळा स्टाफ दिवसभर तिची काळजी घेत होता. हे बघून विक्रांतला त्याची चूक लक्षात येत होती. वेदिकाचे बाकी लोकांशी प्रेमळ वागणे आणि त्याच्याशी असलेले वागणे यातील फरक त्याच्या लक्षात यायला फार उशीर झाला नव्हता. त्याने सगळे वेदिकाशी बोलायचे ठरवले होते. आज वेदिका जरा जास्तच थकली होती आणि रूममधे आल्या बरोबर सोफ्यावर आडवी पडली होती.
विक्रांत तिच्या शेजारी गुडघ्यावर येऊन बसला आणि त्याने अगदी प्रेमाने वेदिका च्या डोक्यावरून हात फिरवला. वेदिकाने डोळे उघडून पाहिले आणि ताडकन उठून बसली ती. विक्रांत पण तिच्या शेजारी बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला, मी चुकलो वेदिका. चुकलो नाही तर गुन्हेगार आहे मी तुझा. माझ्या श्रीमंतीचा, संपत्तीचा अफाट माज आणि गर्व होता मला.
आजवर कोणतीच गोष्ट मला मिळाली नाही असे झाले नव्हते कारण पैशांची पॉवर होती माझ्याकडे. त्यामुळे हवी ती गोष्ट मिळवणे हा स्वभाव झाला होता माझा. पण तू एक स्वतंत्र विचारांची व्यक्तिमत्वाची माणूस आहेस आणि तुझ्याशी लग्न करून बळजबरीने तुझ्यावर हक्क गाजवत होतो हे लक्षातच आले नाही माझ्या.
पैसा हीच खरी संपत्ती आणि श्रीमंती असेच मला वाटत होते पण तू मला जाणीव करून दिलीस की, पैशाने विकत घेता येणार नाही अशी कोणतीही गोष्ट जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत स्वतःला श्रीमंत समजू नका. कठीण प्रसंगी आपली माणसे जवळ असणे, प्रेम जवळ असणे, आपल्या आयुष्यातील तत्वे या सगळ्यांनी माणूस खरा श्रीमंत होतो पैशांनी नव्हे. आज वेदिकाला त्याच्या डोळ्यात पश्र्चाताप दिसून येत होता त्यामुळे तिनेही साशृत नयनांनी त्याचा हात थोपटत त्याला धीर दिला.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
