Skip to content

मनातल्या गोष्टी वेगळ्या क्रमाने घडू शकतात हे शांतपणे स्वीकारणे म्हणजे संयम.

मनातल्या गोष्टी वेगळ्या क्रमाने घडू शकतात हे शांतपणे स्वीकारणे म्हणजे संयम.


हर्षदा पिंपळे


“नाही, मला ते आत्ता या क्षणालाच व्हायला हवय.मला बाकी काही नकोय.मला ते म्हणजे तेच आत्ता हवय.हे असच होतय -तसच होतय.असं कधी होणार?तसं कधी होणार?काहीच मला हवय तसं होत नाहीये. कधी होणार माझ्या मनासारखं?” सारा अक्षरशः कोणत्यातरी गोष्टीसाठी त्यादिवशी खूप हट्टी झाली होती. ती ऐकायलाच तयार नव्हती. तिला बाबांनी खूपदा समजावलं पण ती काही तिचा हट्टीपणा सोडायला तयारच नव्हती.

शेवटी बाबा वैतागून तिला ओरडलेच.”किती हं हट्टीपणा?जरा म्हणून तुझ्याकडे संयम नाही. अशाने कसं होणार पुढे ?आयुष्यात प्रत्येक गोष्टीसाठी संयम लागतो बाळा,संयम ठेवायला शिक.गोष्टी हव्या तशा घडत असतात थोडा संयम गरजेचा असतो सारा बेटा.”बाबा म्हणाले.”अहो,पण बाबा अजून किती वेळ थांबू…?मला नाही जमत हे असं.” सारा म्हणाली.”अगं,अजून किती वेळ म्हणजे? तु तर बाळा काहीच संयम ठेवला नाहीये.

हा तर तुझा हट्टीपणा आहे गं… संयम आणि हट्टीपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत गं.आणि बस् झालं आता.मी तुझं काहीही ऐकणार नाहीये.लवकर आवर आणि बाकीच्या गोष्टी राहिल्या आहेत त्या पूर्ण कर.” बाबा साराला म्हणाले.साराचा नाईलाज होता.साराने शेवटी बाबांच ऐकलं.

तर ही सारा आणि आपण काही वेगळे नक्कीच नाही.आपणही सारासारखच कधी कधी वागत असतो.नको तिथे आपण हट्टीपणा कळत असतो. जरा म्हणून संयम नावाची गोष्ट आपल्याकडे नसते. “आत्ता म्हणजे आत्ता.”,”असं म्हणजे असच” असा हा आपला स्वभाव काही केल्या बदलत नाही. मुळातच संयमाने एखादी गोष्ट घडू शकते यावर आपण विश्वासच ठेवत नाही.कारण,खरं तर संयम म्हणजे काय? हेच आपल्याला कळत नाही. मनातील गोष्टी वेगवेगळ्या क्रमानेही घडू शकतात यावर आपण विश्वासच ठेवत नाही.खरं तर प्रत्येक गोष्टीची एक वेळ ही ठरलेली असते.

आणि आपण ते सहसा स्वीकारत नाही.एखादी गोष्ट आज झाली नाही तर ती ऊद्या होऊ शकते असा आपण विचार करत नाही. याउलट ती गोष्ट आज का झाली नाही यावरच चर्चा करत बसतो.चिंता करत बसतो.वेगवेगळे तर्क वितर्क लावून आपण मोकळेही होतो.पण हे कितपत योग्य आहे?
सातत्याने आपण प्रत्येक बाबतीत असच करायचं का? तर नाही.

मित्रांनो, यापेक्षा मनातील गोष्टी कधी कधी वेगळ्या क्रमानेही घडू शकतात यावर आपण विश्वास ठेवायला हवा.आणि ते शांतपणे स्वीकारून पुढेही जायला हवं. स्वतःच्या संयमाची परिक्षा तेव्हाच तर कळते.आपण किती संयमी आहोत आणि किती नाही याची जाणीवही आपल्याला होते.आपण असा वेगळा प्रयत्नच करून नाही पाहिला तर आपल्याला आपल्यातील क्षमतांची जाणीव तरी कशी होणार?आज हवी असलेली गोष्ट मिळाली नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा उद्या तीच गोष्ट मिळेल असं म्हणून हसत हसत संयम ठेवायला काय हरकत आहे? बिंधास्त समोर असलेलं वास्तव स्विकारायला शिका.

मनाला त्यासाठी आतून तयार करा.कारण आज वास्तव स्वीकारू शकलात तर उद्या तुम्ही कोणत्याही गोष्टीला सहज सामोरं जाऊ शकता.मित्रांनो, संयम आयुष्यात जगायला शिकवतो.संयम का गरजेचा असतो हे तो संयमच दाखवून देत असतो.त्यामुळे गोष्ट कोणतीही असो,सहज स्वीकारा.मनाविरुद्ध घडत असतच कधीतरी म्हणून आपण संयमाने वागणं सोडायचं नसतं.तिथे संयम सोडला तर सगळं संपलं.आयुष्यातील नवीन होप्ससुद्धा अशावेळेस मरगळून पडतात.म्हणजे आशेचा किरण दिसण्याआधीच आपण त्याला पुसून टाकतो.मग नंतर काहीच मनासारखं होत नाही म्हणून रडत बसतो.

आजुबाजूलाही अनेक गोष्टी घडत असतात. त्यांच निरीक्षण करायला शिका.आपल्यासारखीच असंख्य लोकं अवतीभवती असतात. त्यांच्याकडे पहा.ते गोष्टी कोणत्या प्रकारे स्वीकारतात..? याचं निरीक्षण करा.त्यांच्याकडे संयम असेल तर आपल्याकडे का नाही याचा विचार नक्की करा.त्यांच्या आयुष्यात संयम ठेवल्यानेही गोष्टी व्यवस्थित घडत असतील तर आपल्याही आयुष्यात तसं काही घडू शकतं असा विश्वास नक्की ठेवून पहा.संयम ही आयुष्यातील खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी सगळ्यांकडे असतेच असं नाही. परंतु ती सगळ्यांकडे असणं आवश्यक आहे. म्हणून वेळ,काळ काही असो,परिस्थितीबद्दल acceptance ठेवा.संयमाने वागा.आयुष्यात नक्कीच सगळ्या हव्या असणाऱ्या गोष्टी वेगवेगळ्या क्रमाने का होईना पूर्ण होतील.

कुठल्याही परिस्थितीत संयम आणि शांतता बाळगा.कारण,अनेकदा संयमाअभावी आपण अनेक गोष्टी गमावून बसतो.

So…keep patience..keep smile..keep calm and go ahead.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मनातल्या गोष्टी वेगळ्या क्रमाने घडू शकतात हे शांतपणे स्वीकारणे म्हणजे संयम.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!