मुसाफिर
एकदा आम्ही एका कॅफे मध्ये गेलेलो.
तिथला एक वेटर आम्हाला वाढत असताना त्याच्याकडून चुकून माझ्या एका मित्राच्या पांढऱ्या शर्टवर साॅस सांडला. एका क्षणासाठी दोघेही स्तब्धपणे त्या डागाकडे बघत राहिले.
वेटर घाबरून म्हणाला, “मला माफ करा सर, तुम्ही माझ्याबरोबर वाॅशरूममध्ये या, मी तुम्हाला हा डाग साफ करून देतो. घाबरून त्याला घाम फुटला होता.
माझा मित्र ह्यावर हसत म्हणला, “ठीक आहे, होते असे कधीकधी, मला फक्त वॉशरूम कुठे आहे ते सांग, मी करतो हा डाग साफ.”
मित्र मागे वळून परत वेटरला हसत म्हणला, “काळजी नको करु, मी टीप द्यायचा विचार बदलणार नाहीये.
त्यावर वेटरही हसला.
खूप दिवस होऊन सुद्धा धोब्याने कपडे दिले नाहीत म्हणून आम्ही त्याच्याकडे गेलो. धोब्याने कपडे दिले आणि घाबरत घाबरत एक शर्ट जळलाय सांगत आम्हाला दाखवला.
मित्र त्या ५०-६० वर्षाच्या धोब्याच्या थकलेल्या आणि सुरकुतलेल्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला, “काही हरकत नाही काका, त्या निमिताने तुम्ही मला एक नवीन शर्ट घेण्याचे कारण दिले.” त्याने हसून त्याचा हात धरला व घाबरलेल्या त्या धोब्याला धीर आला.
बरेच दिवस झाले आमच्या बिल्डिंगचे वाॅचमन आले नाहीत म्हणून माझा मित्र त्यांच्या घरी गेला. तिथे गेल्यावर त्याला कळले की ते आजारी होते आणि त्यांच्या मुलीचे लग्न अगदी तोंडावर आले होते.
तो पूर्ण दिवस तिथेच राहिला आणि त्यांच्या मुलाला लग्नाच्या तयारीसाठी त्याने मदत केली. लग्नाच्या दिवशीसुद्धा पाहुण्यांचे अगत्य आणि मानपान करण्यासाठी तो सज्ज होता.
सहानुभती म्हणजे इतरांच्या वेदनांची जाणीव होऊन त्यात एकरूप होत, त्यांना आनंद देण्याची कला आहे.
कोणाचा तरी दिवस चांगला बनवण्याचा तो एक प्रत्यत्न आहे.
अत्यंत महत्त्वाची, पण तरीही कमी लेखली जाणारी एकमेव गोष्ट म्हणजे सहानुभूती
आपले व्यकतिमत्त्व खुलून दाखवणारा असा हा गुण अंगी बाळगणे सहज शक्य आहे.
त्यासाठी पैसा लागत नाही आणि श्रम ही लागत नाही.
बघा तर मग, आजपासून कुठे सहानुभूतीने वागण्याची संधी मिळते का ते?
खुप सुंदर सर पण आजच्या मुलाल आणि तरूनान नम्रता व सहानुभुती हीभाषय समजत नाही,