Skip to content

उध्वस्त होत असलेला संसार सावरण्यासाठी काही प्रॅक्टिकल विचार करुया.

उध्वस्त होत असलेला संसार सावरण्यासाठी काही प्रॅक्टिकल विचार करुया.


हर्षदा पिंपळे

संसार कधी टिकतो तर उध्वस्त होतो तर कधी कधी तो उध्वस्त होण्याच्या मार्गावर असतो.परंतु तो उध्वस्त होताना त्याला सावरणही तितकच महत्त्वाचं असतं.संसार उध्वस्त होत असताना अनेकदा एकच गोष्ट धरून आपण बाकी गोष्टींचा विचार करत नाही.’Think, out of the box’ हे समीकरण आपण विचारतच घेत नाही. बऱ्याचदा भावनिक विचार करताना बेसिक प्रॅक्टिकल गोष्टीच आपण विसरतो.तर अशा काही गोष्टी नक्कीच लक्षात घ्यायला हव्यात जेणेकरून उध्वस्त होणारा संसार सावरण्यासाठी सहाय्य होईल. तर पाहूयात अशा काही प्रॅक्टिकल गोष्टी/विचार…..

१)सुसंवाद –

सुसंवाद हा एक भावनिक विचार किंवा मार्ग वाटत असला तरीही तो तितकाच प्रॅक्टिकल आहे.सुसंवादाला नात्यांचा आत्मा म्हणतात तसच आपण इथे सुसंवादाला किंवा संवादाला नात्यांचा बेस अर्थात पाया असं संबोधूया.संसार उध्वस्त होण्यामागे कधी कधी संवादाचा अभावही कारणीभूत ठरतो.म्हणून उध्वस्त होत असलेला संसार सावरण्यासाठी सुसंवादाला प्रथम प्राधान्य देणं आवश्यक आहे.

२)चर्चा करून आणि शांतपणे प्रश्न सोडविणे –

उध्वस्त होत असलेला संसार विनाकारण तरी उध्वस्त होत नसणार. त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार यात शंका नाही. त्यामुळेच जे काही वाद असतील, गैरसमज झाले असतील,शंका असतील त्या चर्चा करून शांतपणे त्यावर मार्ग काढला पाहिजे.कारण घाईघाईत अनेक धागेदोरे हातून निसटत असतात आणि ते आपल्या लक्षातही येत नाही. त्यामुळेच घाई न करता व्यवस्थितपणे चर्चा करून शांतपणे प्रश्न सोडविणे.

३)वर्तन/Behaviour –

संसार उध्वस्त होण्यास आपलं बिहेव्हिअरदेखील तितकच जबाबदार असतं.कित्येक संसार हे जोडीदाराचं वर्तन चांगलं नसल्यामुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसतात.म्हणूनच प्रत्येक जोडीदाराने स्वतःच्या वर्तनावरही तितकीच मेहनत घेणं आवश्यक आहे. आपलं आपल्या जोडीदारासोबत नक्की कसं वागणं आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. काय चुकतय आणि काय नाही? याचा प्राथमिक अंदाज घ्यायला हवा. आपलं वर्तन अयोग्य, असभ्य असेल तर त्याला वेळीच लगाम घालायला हवा.तरच संसार वाचण्याचे चान्सेस वाढू शकतात.

४)सोशल मिडीयाचा अतिवापर-

सध्याच्या काळातील नात्यांमध्ये दुरावा निर्माण करणारी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया होय.दोघांपैकी एकामध्ये जरी सोशल मीडियाचा किडा अतिप्रमाणात वळवळत असेल तर ते संसारासाठी योग्य नाही. कारण सोशल मीडियाचा अतिवापर हा अनेकदा संसारासाठी घातक ठरू शकतो.त्यानंतर प्रत्येकालाच वैयक्तिक आयुष्य हे सोशल व्हावं असं वाटत नाही.यामुळे एकमेकांमध्ये खटके उडू शकतात. म्हणूनच सोशल मीडीयाचा अतिरिक्त वापर करणं वेळीच थांबवा.आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर पोस्टर करणं किती आवश्यक आहे आणि किती नाही याचाही विचार करून पहा.

५)मुलं असतील तर त्यांच्या भविष्यावर होणारा परिणाम-

संसार अचानक उध्वस्त होतोय असं वाटत असेल तर आधी असलेल्या मुलांचा विचार करणं इथे खूप महत्त्वाचं ठरू शकतं.कारण,एका उध्वस्त संसारामुळे मुलांच्या मानसिकतेवर ,त्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो हा सरळ विचार लक्षात घ्यायला हवा.आपल्यामुळे मुलांच भविष्य अंधारात राहता कामा नये याची काळजी प्रत्येक जोडप्याने घ्यायला हवी.

६)जबाबदारी स्वीकारणे-

संसार म्हंटल की जबाबदारी सुद्धा असतेच.तर संसारातील जबाबदाऱ्या सतत टाळत राहिलात तर संसार कितपत टिकू शकेन काही सांगता येत नाही.त्यामुळे शक्यतो घेतलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी शक्य होईल तितके प्रयत्न करा.कोणतीही जबाबदारी अर्धवट सोडून जाऊ नका.

७)मानसिकतेवर होणारे परिणाम –

संसार उध्वस्त झाला तर काय काय होऊ शकतं याचा विचार करणं आवश्यक आहे.खरं तर फार विचार करण्याची गरज नाही. साधं सरळ सोपं आहे…. की,संसार उध्वस्त झाला तर भयंकर दुःख,पश्चाताप अशा गोष्टी होणार.तर मग हा परिणाम केवळ एकावरच नाही तर संपूर्ण कुटूंबावर होत असतो हे बेसिक लक्षात घ्या.यामध्ये स्वतःबरोबर सगळ्यांची मानसिकता ढासळत असते हेही लक्षात घ्या.आणि यामुळे आपला अमूल्य वेळ हा वाया जाणार असतो याचाही विचार नक्की करा.

वरील विचार नक्की लक्षात घ्या.आणि पटतय का ते नक्की सांगा.किंवा तुम्हाला काही अन्य प्रॅक्टिकल विचार माहीत असतील तर तेही नक्कीच शेअर करायला विसरू नका.आणि हो,कधी कधी प्रॅक्टिकल व्हायलाही विसरू नका.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!