तुम्ही एकमेकांच्या कसे जवळ येता यावरून तुमचा रोमान्स ठरत असतो.
टीम आपलं मानसशास्त्र
शारीरिक संबंध हे खूप सुखकारक , समाधानकारक , ओढ लावणारे , शांतता देणारे असतील तर ते हवेहवेसे वाटतात. त्यात गोडी निर्माण होते. आपण एकमेकांच्या कसे जवळ येतो यावरून आपला रोमान्स ठरत असतो.
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारा जवळ जाता तेव्हा खूप छान फ्रेश मूड ने , छान आवरून गेलात , मग आकर्षक कपडे , आकर्षक रंगसंगती, हलकासा मेकअप, एखादा छान आकर्षित करणारा सुवासित परफ्यूम , deo असेल, केशरचना आकर्षक , शिवाय तिथले वातावरण एकदम फ्रेश , प्रसन्न करणारे असेल , नीटनेटके बेडशीट, वस्तू जागच्या जागी लावलेल्या, साधे पण सुंदर पडदे असतील , प्रकाश योजना , शुद्ध आणि ताजी हवा येण्याकरीता योजना , आणि रूम मध्ये छान सुगंधित वातावरण , मग रूम freshner असेल .तर त्यातून वातावरण ही एकदम ताजे तवाने राहते. आणि मनसोबत शरीर ही उत्साही होते.
या खेरीज एकमेकांची आपुलकीने चौकशी, दिवसभरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी मोकळेपणाने बोलल्याने मनावरचा ताण ही हलका होतो. मग फेश आणि सकस , पौष्टिक पेय , आहार यातून शरीर ही एकदम उत्साही राहते.
तेलकट , मसालेदार , जळजळीत पदार्थ किंवा बाहेरचे मैद्याचे पदार्थ , चमचमीत पदार्थ खाताना छान वाटते पण खाल्ल्यावर त्याचा त्रास होतो. त्यामुळे अस्वस्थता वाढते आणि शारीरिक जवळीक करताना ही त्रास होतो.
आपण एकमेकांच्या कसे जवळ येतो यावरून आपला रोमान्स ठरत असतो. नाराजीने , नाखुशिने , जवळ आलो , आता जोडीदारची इच्छा आहे म्हणून कसेही जवळ गेलो ..घरचे घामट , तेलकट कपडे , स्वतः चा ही अवतार असेल , दिवसभर स्वैपाक घर आणि इतर कामातून , ऑफिस कामातून दमून तसेच आपले शारीरिक गरज भगवयची म्हणून जवळ गेले तर त्यात रोमान्स आणि अजून आनंद मिळविता येत नाही.
याउलट तुम्ही एकमेकांच्या जवळ खूप मस्त मूड , हसत , चेष्टा मस्करी करत , काही नावीन्य ठेवून , प्रसन्न , सुगंधित वातावरणात , छोटासा मंद पण सुवास दरवळणारा मोगरा , जाई , जुई किंवा चाफा , प्रेमाचे प्रतीक असलेला गुलाब केसात माळला ,
एकमेकांचा हळुवार स्पर्श , मोकळेपणाने बोलत साधलेली जवळीक , कधी एखादा हलका फुलका विनोद तर कधी थोडास शारीरिक जवळीकता साधताना त्या संदर्भात बोलणे , रोमांचित करणारी कविता. शेर शायरी यातून एकमेकात एक बाँड निर्माण होतो. मग हळूच मारलेली एखादी मिठी, कमरेला घातलेला घट्ट विळखा असेल. अगदी मग बायको स्वैपाक किंवा कामात बिझी असेल आणि मागून अचानक तिला मारलेली मिठी .. एखादी तिची आवडती गोष्ट तिला दिली surprise म्हणुन किंवा बायकोने तसे केले तर दोघांना ही ते वातावरण रोमांचित करते.
बरेचवेळा शारीरिक संबंध यापेक्षा ही हा रोमान्स जास्त महत्वाचा असतो. याचे कारण तुम्ही एकमेकाला कसे खुलविता . एकमेकांच्या आवडी निवडी समजून त्या गोष्टी कशा करता हे महत्वाचे असते.
शारीरिक गरज भागवायची म्हणून आले पटापटा उरकले असे नसते. त्यात कोणालाच आनंद मिळत नाही.
रुचकर आणि परिपूर्ण जेवण कसे असते. त्यात मीठ , लिंबू , चटणी , लोणचे , भाज्या , गरम गरम चविष्ट वरण भात त्यावर साजूक तुपाची धार , कुरडई , पापड , मस्त गरम मवू सुत पोळी, एखादा गोड पदार्थ , मग छान असा पोटात गारवा आणणारा दही भात , ताक यातून जेवणाची लज्जत वाढते. आणि जेवणातून समाधान मिळतें . बरेचवेळा पोट भरते पण मन भरत नाही.
तसेच आहे तुम्ही एकमेकांच्या जवळ येताना विविधता , नावीन्य यांची जोड दिली तर तो रोमान्स तुमच्यातल्या शारीरिक संबंधांवर सकारात्मक परिणाम करत असतात. रोमान्स जेवढं छान , तेवढे शारीरिक संबंध सर्वोच्च सुखाच्या पातळीवर घेवून जाणारे. आणि ओढ लावणारे असतात.
त्याचमुळे एकमेकांना कोणत्या क्षणी काय पाहिजे हे समजून जाणून घेवून, एकमेकांच्या आवडी निवडी , गरजा समजून घेवून जेव्हा एकमेकांच्या जवळ येतो त्यावरून तो रोमान्स आणि पुढचे शारीरिक संबंध कसे ते ठरत असते.
एकमेकांच्या जवळ येताना मोकळेपणे जवळ येणे गरजेचे, मनातून भीती , मी कसे करू , कोण काय म्हणेल , हे असे कोणी करते का असे विचार पूर्णपणे काढून टाकून आपलेपणा , आतुरता , नावीन्य आणि संपूर्ण समर्पण वृत्ती असू द्या. एखाद्या गोष्ट ची किळस वाटली तर ती गोष्ट छान केली जाणार नाही. किंवा एखादा दुःखद अनुभव , त्रास झाला असेल तरी मनमोकळेपणे आणि सर्वस्व झोकून त्याचा आनंद घेतला जाणार नाही. त्यामुळे मन स्वच्छ ठेवा. त्यातला आनंद शोधा. आणि काही त्रास असतील तर त्यावर वैद्यकीय उपचार जरूर करा.
आयुष्य सुंदर आहे. आणि केवळ भूक मग पोटाची असेल किंवा शरीराची भागवायची म्हणून तसे प्रयत्न करू नका. तर त्यातला आनंद मिळविण्याकरिता , तृप्ती मिळविण्याकरिता प्रयत्न करा.
आपण एकमेकांच्या कसे जवळ येतो यावरून आपला रोमान्स ठरत असतो.आणि त्यातूनच पुढचे शारीरिक संबंध हे समाधानी आणि तृप्त करणारे आहेत का ते ठरत असते. जोर जबरदस्तीने या गोष्टी पासून आनंद नाही मिळणारं . त्यामुळे एकमेकांच्या कलकलाने घेणे गरजेचे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
