सतत भास होत असतील तर याचा वैवाहिक आयुष्यावर हे दुष्परिणाम होतात.
टीम आपलं मानसशास्त्र
मानसशास्त्रीय दृष्टया सतत भास होणे , आवाज ऐकू येणे , कोणी आहे , कोणी तरी येते असे delusions आणि hallucinations म्हणजे schizophrenia ची मानसिक रुग्णाची चिन्हे. त्यामुळे जर कधी भास होत असतील तर वेळीच उपाययोजना करावी. मेंदूतील रासायनिक बदल घडून येतात त्यामुळे असे भास , भ्रम होतात. पण त्यावर ही उपययोजना करता येते.
बरेचवेळा पती पत्नी हे एकमेकांना गृहीत धरत असतात. काही वेळेस पती सतत एकमेकांच्या कडून अपेक्षा ठेवत असतात. त्यात मग मनासारखे घडले नाही तरी मग चिडचिड , ताण , तणाव हा दोघात वाढत असतो. कधी जोरात बोलले तर एकमेकांच्या मध्ये मोठे वाद होतात. मग ते टाळण्यासाठी बरेचवेळा तोंडातल्या तोंडात पुटपुटले जाते.
हळूहळू उगीच च काही झाले तरी आपला जोडीदार आपल्याच वरून काही तरी पुटपुटत आहे. जरी जोडीदाराचे त्याचे त्याचे काही सुरू असेल तरी त्याला बघून तो आपल्यालाच उद्देशून काही बोलायचे आहे असे भ्रम किंवा भास होवू लागतात.
बरेचवेळा आपल्याच मनात काही तरी विचार येत असतात. ते भरकटत असतात आणि त्यावर जोडीदार काही तरी चिडून बडबड करत आहे. किंवा तोंडातल्या तोंडात पुटपुटत आहे. किंवा इतर कोणाशी बोलताना , फोनवर बोलताना आपल्याच विषयी काही सांगत आहे असे भास होत असतात.
सतत भास होत असतील तर याचा वैवाहिक आयुष्यावर काय दुष्परिणाम होतात हे बघुया.
१. एकमेकांवर सतत शंका घेतली जाते. : जोडीदार कोणाशी बोलत असेल तरी आपल्याविषयी बोलत आहे . आपली तक्रार करत आहे असेच भासते. उलट जोडीदार कौतुकाने बोलत असेल तरी उलटे च अर्थ काढले जातात.
यातून एकमेकांवर सतत शंका घेतली जाते. आणि एकदा का शंका मनात घुसली की दोघांच्या नात्यात अंतर येत जाते.
२. मनाची एकाग्रता भंग होते. : एकदा का भास झाले की मग काम करताना ही तेच भास होत राहतात. तेच विचार मनावर राज्य करतात. आणि मनाची एकाग्रता भंग होते. कामात ,मग घरकाम असेल , ऑफिस काम , छोट्या मोठ्या गोष्टीत ही मनाची एकाग्रता भंग होते. आणि कोणती च कामे नीट होत नाहीत त्यामुळे चिडचिड होते.
कामे वेळेत पूर्ण होत नाहीत म्हणुन टेन्शन येते. आणि त्यातून परत एकमेकाला कारणीभूत धरून एकमेकात वाद होतात.
३. बरेचवेळा जोडीदाराच्या एकनिष्ठते विषयी ही भास किंवा भ्रम होतात. : जोडीदार कोणाशी मोकळेपणाने बोलत असेल , मित्र मैत्रीणीना भेटत असेल . बाहेर जात असेल , उशिरा येत असेल तरी मनातून असे भास होतात की आपल्या जोडीदाराचे कोणाशी तरी काही संबंध आहेत.
कधी चुकून बघण्यात आले की जोडीदार कोणाशी अगदी हस्तांदोलन करून बोलत आहे तरी बरेचवेळा असे भास होतात की तो नेहमीच असे करतो. आणि उगीच च मग एकनिष्टते विषयी शंका येते.
४. घरच्यांच्या सोबत जरी जोडीदार चांगले नाते टिकवून असेल , बोलत असेल तरी आपल्या विरुद्ध काही रचत आहे असे भास होतात. त्यातून सगळ्यांच्या वर अविश्वास निर्माण होतो. आहे ती चांगली नाती ही बिघडत जातात. वैवाहिक संबंध बिघडत जातात. शारीरिक संबंध मध्ये ही तेवढा मोकलेपणा राहत नाही.
शिरीन आणि मिहिर दोघेही लग्नानंतर खूप आनंदात , सुखात होते. Arrange marriage असल्याने हळूहळू एकमेकांचे स्वभाव , आवडी निवडी , नातेवाईक , मित्र मैत्रिणी यांची माहिती होवू लागली होती.
शिरीन ही जॉब करत होती एका चांगल्या कंपनी मध्ये होती. मिहिर HR admin होता कंपनीत . शिरीन एकदा कंपनी मधून कामासाठी लवकर निघाली ऑफिस मधली एक मैत्रीण आणि ती सोबत जात होत्या आणि नेमके एका मॉल बाहेर मिहिर आणि त्याची मैत्रीण जीत शिरीनला दिसले. मिहिर ने जीतच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि तो बोलत होता. त्याचे बाकी कुठेही लक्ष नव्हते.
संध्याकाळी घरी आल्यावर नेहमीप्रमाणे शिरीन ने मिहिर ला मस्त गरम गरम चहा दिला आणि आजचा दिवस कसा होता विचारले. बिझी होता एवढेच म्हणाला मिहिर. तिने फार काही खोलात जावून विचारले ही नाही. जीत विषयी बाकी बोलणे नाही झाले.
त्यानंतर परत एकदा शिरीन आणि तिची मैत्रीण ऑफिस कामासाठी जात असताना तिचे सहजच लक्ष त्या मॉल कडे गेले आणि त्याच्या आजूबाजूला नजर फिरली .. मिहिर सारखाच शर्ट घातलेला ती तरुण बघून तो मिहिर आहे असाच भास झाला. आणि हो तिची खात्री पटू लागली की तो मिहिर च आहे . तो मागे वळणार तेव्हढ्यात शिरीन ची गाडी एकदम पुढे गेली आणि ती खात्री पटवू शकली नाही की तो मिहिर होता.
पण आता जेव्हा कधी ती त्या रस्त्याने जावू लागली की तिला नेहमी मिहिर चा आणि जीत चा भास होवू लागला. आणि मिहिर ला उशीर जर झाला तर मग उगीच ते भास आठवून त्याची विचारपूस , चौकशीच म्हणा सुरू झाली. मिहिरला ही हा बदल जाणवू लागला आणि त्रासदायक होवू लागला.
एकदा तर शिरीन ने मिहिर आल्या आल्या त्याच्यावर फायारींग सुरू केले तू नेहमीच भेटतो जीत ला. तुमच्यात काही सुरूच आहे. असे म्हणून ते भास खरेच आहेत असे समजून ती वाद घालून , भांडून मी आता इथे राहणार नाही असे म्हणून घर सोडून निघून गेली. कोणतेही विचार नाहीत. ते भास सत्य आहे का याची खात्री ही केली नाही.
जीत आणि मिहिर शेवटी शिरीन ला भेटण्यासाठी गेले.
मिहिर म्हणाला अग तुझा गैरसमज झाला मी एकदाच भेटलो होतो तिला आणि ते ही तिला भेटायला मुलगा येणार होता तेव्हा तिच्या सोबत तिचे कोणी पाहिजे बोलायला म्हणून.तिचे लग्न ही ठरले त्याच्या सोबत. आणि तेव्हा जीत ने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला ही सोबत आणले होते. ते बघितल्यावर त्याचा शर्ट बघितल्यावर दुसऱ्यांदा जेव्हा शिरीन ने बघितले तो मिहिर चा भास झाला तो मिहिर नव्हता तर जीत चा होणारा नवरा तिच्या सोबत होता.
संसारात असे छोटे मोठे गैरसमज , अविश्वास , संशय , शंका अशा गोष्टी घडत असतात. या केवळ असे सतत भास होत असतात त्यातून घडत असतात आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे संपूर्ण कुटुंब विस्कळीत होते. कधी कायमचे अंतर येते. मुले असतील तर मुलांच्या जबाबदाऱ्या कोण घेणार असेही प्रश्न आणि गंभीर समस्या निर्माण होतात.शिवाय मग आर्थिक गोष्टींचे ही balancing बिघडते. तेही केले नाही तर अजूनच शंका घेतल्या जातात. शारीरिक संबंध ही बिघडतात.
सतत भास होत असतील तर वेळीच तज्ञांचा सल्ला आणि उपाययोजना करणे जरुरी आहे.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
