Skip to content

माझी अवस्था तू समजुन घेतलीच पाहिजे, या तत्त्वावरच अनेक जोडपी टिकून आहेत.

माझी अवस्था तू समजुन घेतलीच पाहिजे, या तत्त्वावरच अनेक जोडपी टिकून आहेत.


टीम आपलं मानसशास्त्र


लग्न हा एक दुवा किंवा दोन भिन्न लिंगी व्यक्ती एकत्र येण्याची समाज आणि कायदा यांनी केलेली योजना , त्यांना एकरूप होण्यास दिलेली संधी.

लग्न झाले म्हणजे व्यक्तिमत्त्व बदलते का ? नाही ना ? ज्याचा त्याचा असा स्वभाव असतो , आवडी निवडी भिन्न असतात. मुलगी माहेरून सासरी येते. तिथे सगळ्यांचे स्वभाव भिन्न असतात. खाण्या पिण्याच्या सवयी भिन्न असतात.

दोघेही नोकरी करणारे असतील .तर घरचे सगळे सांभाळून नोकरी करताना होणारी स्त्रीची धावपळ यात ती अपेक्षा करत असते की , जोडीदाराने तिला समजून घेतलेच पाहिजे. याचे कारण की ती जोडीदाराच्या भरवशावर , विश्वासावर ती तिच्या लोकांना सोडून इकडे राहायला आलेली असते. त्यामुळे तिची नक्कीच अपेक्षा असते की आपल्या जोडीदाराने कायमच आपल्याला समजून घेतले पाहिजे. ती ज्या अवस्थेतून जात असते ती समजून घेतली च पाहिजे अशी अपेक्षा असते.

त्याचप्रमाणे नवरा ही अपेक्षा करीत असतो की त्याला ही तिने समजून घ्यावे. बायको ची बाजू घेताना घरातल्यांना ही त्याला सांभाळावे लागते. त्यामुळे त्याची अवस्था खूप अवघड असते. त्यामुळे बायकोने ही सामंजस्याने घ्यावे असे त्याला वाटत असते.

आणि आजकाल माझी अवस्था तू समजुन घेतलीच पाहिजे, या तत्त्वावरच अनेक जोडपी टिकून आहेत. याची कारणे ही अशी आहेत की , आजकाल मुली ही खूप चांगल्या शिक्षित आहेत. भरपूर पगार असलेल्या नोकरी करतात. घरचा support ही चांगला असतो. बहुदा एकुलत्या एक असल्याने लाडाच्या असतात. कामाची ही बरेचवेळा सवय नसते. Adjust करून घेण्याची सवय नसते. आणि थोडे काही मनाविरुद्ध झाले किंवा कोणी काही बोलले तरी मग ते जोडीदाराला सांगून हे बरोबर नाही . मला अशी सवय नाही. मी का ऐकून घ्यायचे कोणाचे अशा तक्रारी ही केल्या जातात आणि तू माझी अवस्था समजून घेतलीच पाहिजे असे तत्व असते.

दोघांपैकी कोणी एकमेकांच्या अवस्था समजून घेण्यास कमी पडले किंवा थोडे दुर्लक्ष केले तरी लगेच टोकाची भूमिका घेणारे ही आहेत.

समजून घेतले नाही तर अगदी स्पष्ट सांगणारे ही आहेत की मला जमणार नाही पुढे जाणे. किंवा एकत्र कुटुंबात प्रोब्लेम येत असेल तर माझी अवस्था समजून घे. मला वेगळे राहायचं आहे. जमणार नसेल तर मग आपल्या नात्याविषयी विचार करावा लागेल इतक्या टोकाची भूमिका घेतली जाते.

म्हणजे बरेचवेळा माझी अवस्था तू समजुन घेतलीच पाहिजे, या तत्त्वावरच अनेक जोडपी टिकून आहेत. अन्यथा बेफिकीर वृत्ती आहे . वेगळे होण्याची मानसिकता आहे . त्यात काही गैर वाटत नाही. केवळ स्वतः चा convience बघण्याचा दृष्टिकोन आहे. पूर्वी सारखे adjust करून तिथेच राहणे आजकाल एकमेकांना पटत नाही.

आणि आजकाल विभक्त कुटुंब पद्धती जास्ती करून पाहण्यात येते त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती मध्ये कोणी राहण्यास तयार होत नाही. अशी वेळ आलिंतर मला अशी सवय नाही. असे म्हणून माझी अवस्था समजून घे असे म्हणून विभक्त होण्याकडे कल असतो.

तर याउलट घरात सगळ्यांच्या करिता सगळ्या गोष्टी करणारी स्त्री , असेल किंवा पुरुष . कधी तरी कायम जबाबदाऱ्या पेलून थकतात. दमतात. आणि एक वेळ अशी येते की माझी अवस्था तरी समजून घे . नसेल तर आता मला काहीच टिकवायचे नाही. माझे मला आयुष्य जगायचे आहे अशा टोकाच्या भूमिकेत शिरतात.

मी ही कधि समजून घेईन , adjust करेन ,पटवून घेईन ही भूमिका कुठेच नाही. तर जोडीदाराने आपली अवस्था कायम समजून घेतली पाहिजे या तत्त्वावर च अनेक जोडपी टिकून आहेत. सुसर बाई तुझी पाठ मऊ असे म्हणून पटवून घेणारे जोडीदार आहेत.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “माझी अवस्था तू समजुन घेतलीच पाहिजे, या तत्त्वावरच अनेक जोडपी टिकून आहेत.”

  1. अगदी उत्तम प्रकारे लिखाण केलेले आहे….आणि तुमच्या लेखनातून प्रेरणा मिळत असते…

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!