मानसिक दृष्ट्या गरीब असलेले व्यक्ती कधीही श्रीमंत आयुष्य जगू शकत नाही.
पुजा सातपुते
असं म्हणतात शारीरिक वेदना औषदाने बरं करू शकतो पण मानसिक आजार नाही. तसं आता मानसिक आजारांवर ही औषद आहे म्हणा पण वेदना कुठल्याही असोत जर मानसिक दृष्ट्या तुम्ही सुदृढ नसाल तर तुम्ही आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकत नाही.
आपल्या आयुष्यात आपण खूप सारी स्वप्न बघतो पण आपल्या पैकी किती जणं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाऊलं उचलतात, ध्येय बनवतात कि मला माझं स्वप्न पूर्ण करायचच आहे. खरं म्हणावं तर खूप कमी लोकं कारण आपल्या कडे खूप सारे रिसन्स असतात. अरे काय करणार सध्या मी जॉबलेस आहे, सध्या मी डिप्रेशन मध्ये आहे, सध्या घरचं वातावरण बरोबर नाही आहे आणि असे बरेच एक्सयूसेस. प्रॉब्लेम्स असतात मान्य आहे पण किती दिवस तेच तेच रिसन्स देत बसायचं.
आपण हे एक्सयूसेस तेव्हाच देतो जेव्हा आपल्याला स्वतःवर कॉन्फिडन्स नसतो. आपण जर कुठलीही गोष्ट करायची ठरवली तर आपल्याला आपोआप मार्ग सुचत जातात. यालाच लॉ ऑफ अट्ट्रॅकशन म्हणतात. याचं बेसिक कन्सेप्ट आहे आस्क (विचारणं), बिलीव (विश्वास ठेवणं), गेट (अचिव्ह करणं).
आपल्या मनावर खूप अवलंबून असतं. जिवंत राहण्यासाठी आपल्याला जसा पोषक आहार महत्वाचा आहे, तसच मेंदूलाही पोषक विचारांची गरज असते. तुम्ही काय विचार करता, कुठल्या सिचूवेशन ला कसं हॅन्डल करता, कसं कुठली गोष्ट अचिव्ह करण्याचा प्रयत्न करता हे खूप महत्वाचा आहे. तुम्ही जर विचार केलात कि मला श्रीमंत बनायचं आहे पण नको त्या गोष्टींवर पैसे खर्च करत राहिलात तर तुमचा मेंदू कन्फयुज होईल आणि श्रीमंती तुम्ही कधीच अट्ट्रॅक्ट करू शकणार नाही.
कुठलंही स्वप्न अचिव्ह करायचं असेल तर मानसिक दृष्ट्या प्रबळ असणं खूप महत्वाचं आहे आणि स्वतःच्या मनावर ताबा ठेवणं ही खूप गरजेचं आहे कारण मानसिक दृष्ट्या गरीब असलेले व्यक्ती कधीही श्रीमंत आयुष्य जगू शकत नाही. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी अट्ट्रॅक्ट करायच्या असतील तर पहिले तुम्हाला तुमची मनसिकता बदलावी लागेल, आळस सोडावा लागेल, तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल.
जर तुम्ही फक्त तुमच्या प्रॉब्लेम्सचा विचार करत बसलात आणि त्यावर काही तोडगा नाही काढला तर ते प्रॉब्लेम्स कधीच संपणार नाही. तुमच्या आयुष्यात तुम्ही बदल आणू शकणार नाही. कुठलीही गोष्ट अट्ट्रॅक्ट करण्यासाठी प्रयत्न करावे करावे लागतात. तुम्ही जर प्रयत्न करण्या पूर्वीच हार मानली तर निसर्ग तुमची मदत कसा करू शकेल?
एक साध एक्साम्पल बघा, परीक्षेला जाताना तुम्ही देवाकडे चांगले मार्क्स मागता, आता जर तुम्ही अभ्यास व्यवस्तीत केला असेल तर तुम्हाला चांगलेच मार्क मिळणार पण अभ्यास न करता तुम्ही देवाकडे मागितलं कि तुम्हाला चांगले मार्क्स पाहिजेत तर निसर्ग कन्फयुज होणार कारण तुमच्या वागण्याचं आणि तुमच्या बोलण्याचं काहीच कॉम्बिनेशन जमत नाही आहे.
लॉ ऑफ अट्ट्रॅकशनला माहित नसतं काय चांगलं आणि काय वाईट. ते आपल्या वागणुकीवर आणि आपल्या प्रयत्नावर डिपेंड आहे. तुमच्या मागण्यात आणि तुमच्या वागण्यात जर काही सम्या नसेल तर तुमचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही.
तुम्ही मागितलंत कि मला आनंदी राहायचं आहे, मला खूप पैसे कमवायचे आहेत तर निसर्ग तुमच्या समोर खूप सारे मार्ग निर्माण करणार. अश्या लोकांना तुमच्या संपर्कात आणणार ज्याने तुम्ही आनंदी राहाल, असे ऑपशन्स समोर ठेवणार ज्याने तुमचा पैसा साठायला मदत होईल पण जर तुम्ही विपरीत वागलात, म्हणजे जी चांगली लोकं आहेत त्यांना जर वाईट वागणूक दिलीत, सेविंग्स चे ऑपशन्स असताना जर पैसे उडवत बसले तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही.
म्हणून स्वतःला मानसिक दृष्ट्या श्रीमंत बनवा तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल. चांगले विचार करा, प्रयत्न करा, मार्ग आपोआपच सापडणार. आपलं आयुष्य आपण कसं जगतो हे आपल्या मानसिकतेवर खूप अवलंबून आहे. जर नेगेटिव्ह विचार केला तर नेगेटिव्ह गोष्टीच होणार पण पॉसिटीव्ह विचाराने स्वतःमध्ये बदल आणाल तर तुमची स्वप्न तुम्हाला पूर्ण करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. स्वतःची मनसिकता बदला आणि आयुष्यातल्या सुंदर क्षणांचा आनंद घ्या.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
