Skip to content

एक सवय लावा…जीवनात कितीही उलथापालथ होवो, पण चेहऱ्यावरची स्माईल सोडायची नाही.

एक सवय लावा…जीवनात कितीही उलथापालथ होवो, पण चेहऱ्यावरची स्माईल सोडायची नाही.


हर्षदा पिंपळे


आठ वर्ष रिलेशनशिप मध्ये असलेल्या प्रिया आणि निलेशच ब्रेकप झालं.प्रियाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी निलेशने स्वतःचा विचार न करता खूप गोष्टी केल्या.नोकरी करता करता थोडा वेळ काढून पुण्यावरून तो मालाडला तिला आठवड्यातून भेटायलाही जायचा.आठ वर्ष म्हणजे खरं तर खूप काळ झाला.या आठ वर्षात निलेशने स्वतःला खूप बदललं होतं.प्रियासाठी आणि प्रियामुळे त्याने काही चेंजेस स्वतःत घडवून आणले होते.पण आठ वर्षानंतर निलेशला खूप मोठा धक्का बसला. प्रिया केवळ आपला वापर करतेय आणि गेले आठ वर्षही प्रियाने आपला केवळ वापरच केला हे त्याला कळालं.एक दिवस निलेशने मुद्दाम प्रियाला मदतीसाठी फोन केला.परंतु प्रिया धडधडीतपणे त्याच्याशी खोटं बोलून कित्येकदा भेटणं टाळत होती.

शेवटी त्याला कळालं की प्रियाने आपला वापर फक्त पैशासाठी केला.आठ वर्ष जिच्या प्रेमात आपण पुरते बुडाले होतो तिने आपल्याला एवढा मोठा धक्का द्यावा…? खरं तर या सगळ्यानंतर निलेशची अवस्था फार वाईट झाली होती. चेहऱ्यावर सतत खळखळत असणारं त्याचं हसू शांत झालं होतं. दोन वर्ष तो पूर्ण डिप्रेशनमध्ये होता.त्याच्यावर ट्रिटमेंट चालू होती. मित्रांनाही निलेशचे हाल बघवत नव्हते. कालांतराने निलेश बरा झाला होता. आपल्या आयुष्यातील त्या आठ वर्षांचा त्याला प्रचंड पश्चाताप होत होता.बिचारा निलेश खरच खूप खिन्न दिसत होता.तिच्यामुळे नंतरची दोन वर्षही आपली अक्षरशः वाया गेली याचं प्रचंड दुःख निलेशला स्वस्थ बसू देत नव्हतं.

तो हसणं विसरला होता खरं…पण मित्रांनी त्याच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणलं.त्यांनी निलेशला एका स्माईलमुळे काय होऊ शकतं आणि काय नाही हे समजावून सांगितलं.एक स्माईल आपल्याला किती ऊर्जा देऊ शकते हे याची मित्रांनी त्याला जाणीव करून दिली.
तो हसला,पुन्हा नव्याने जगायला शिकला..!

“Because of your smile, you make life more beautiful.”
[ Thich Nhat Hanh.]

एका स्माईलमध्ये खरच इतकी ताकद असते .मित्रांनो,एक स्माईल तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते.त्यामुळे स्माईल ही आपली एक सवय असायला हवी.इतर वाईट सवयींपेक्षा स्माईल करणं ही एक चांगली सवय नक्कीच असू शकते.अशा चांगल्या सवयी आपण अंगीकारायला हव्यात.इतका छान असा चेहरा निसर्गाने आपल्याला दिला आहे तर त्याची ठेवणही छान ठेवायला हवी नं..?

मलुल चेहरा सुंदर दिसतो की हसरा चेहरा सुंदर दिसतो याचा विचार नक्की करा.हसरा चेहरा खरच खूप सुंदर दिसतो.पण आपलं हे हसू काही बारमाही टिकत नाही. दिवसातून बारा वेळा तरी आपल्या चेहऱ्यावरचं हसू कुठेतरी निघून गेलेलं असतं.जणू काही सातत्याने हिरमुसायची आपल्याला सवयच
जडलेली असते.

मित्रांनो, आयुष्यात कितीही काहीही झालं तरी हसणं आपण विसरता कामा नये.कारण एका स्माईलमध्ये खरच खूप ताकद असते.एक स्माईल आयुष्य अधिकाधिक सुंदर करू शकते.आयुष्यात चांगलं वाईट घडत असतं.आज ना उद्या कधीतरी ते घडणारच असतं.पण यामध्ये स्माईल करणं आपण का विसरतो..?जगात कितीही उलथापालथ झाली तरी आपली स्माईल जिवंत हवी.कारण आपल्या स्माईलमुळे चार लोकांना नवसंजीवनी मिळत असते.चार लोकांना जगण्यासाठी यामुळेच तर बळ मिळतं.त्यामुळे कितीही संकटं येऊद्या,काहीही होऊद्या पण चेहऱ्यावर असलेली स्माईल कधीच हरवू देऊ नका.

ब्रेकप झालं,भांडण झालं,मनाविरुद्ध काही झालं तरीही स्माईल करत रहा.कुणामुळे आपण आपलं हसू का हरवायच..?स्माईल करून बिंधास्त पुढे जायला शिकायचं.तरच आयुष्यात पुढे जाल.नाहीतर रडत राहिलात तर एकाच जागी मलुल चेहरा घेऊन बसाल.म्हणून नेहमी स्माईल करा.एक स्माईल तुमचं,आणि इतरांचही आयुष्य नक्कीच सुंदर करू शकते.

आणि या स्माईलचे काही फायदेही आहेत बरं !

जसं की,

*ताणतणाव कमी होणे.
*सकारात्मक ऊर्जा मिळणे.
*शारीरिक आणि मानसिक आरोग्य योग्य प्रकारे टिकून राहण्यास मदत होणे.
*आत्मिक शांती प्राप्त होणे.
*आनंदी वातावरण निर्मिती.

असे अनेक फायदे एका स्माईलमुळे शक्य आहेत. म्हणून कोणत्याही परिस्थितीत स्माईल करणं सोडू नका.आयुष्यात शांती ,आनंद हवा असेल तर नक्कीच स्माईल करणं आवश्यक आहे.शेवटी एकच सांगेन की,

[Peace begins with a smile.” — Mother Teresa.]

So..Keep smiling !


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “एक सवय लावा…जीवनात कितीही उलथापालथ होवो, पण चेहऱ्यावरची स्माईल सोडायची नाही.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!