चांगल्या क्षणांचा योग्य वेळीच आनंद घेतला पाहिजे, कारण ते फार काळ टिकत नाहीत.
पुजा सातपुते
चांगले लोकं, चांगले क्षण, चांगल्या गोष्टी या खूप नशिबाने मिळत असतात. पण कधी कधी आपण त्याचं महत्व विसरतो आणि त्या गोष्टींना ग्रांटेड घ्यायला लागतो.
म्हणतात ना, चांगल्या व्यक्तींना कधीच गमावू नये, चांगल्या क्षणांचा योग्य वेळीच आनंद घ्यावा, कारण ते फार काळ टिकत नसतं. निसर्गाने माणसाला तर्क शक्ती दिली आहे. या जगात मनुष्यच एक असा प्राणी आहे जो विचार करू शकतो, चांगलं काय किव्हा वाईट काय यातला फरक समजू शकतो.
निसर्ग प्रत्येक वेळीस आपली मदत करत असतो. योग्य तो मार्ग दाखवत असतो. योग्य ती माणसं, योग्य त्या गोष्टी देत असतो पण आपण आपल्या कर्माने ती घालवत राहतो. ती गोष्ट आपल्या हतातनं गेली कि उगीच आपल्या नशिबाला व परिस्थितीला दोष देत बसतो. म्हणतात ना दैव देतं आणि कर्म नेतं.
सहज पणे चांगल्या गोष्टी कडे दुर्लक्ष करून आपण नको नको ती स्वप्न बघतो. पण आपण हे विसरून गेलेलो असतो कि आज आपल्या कडे जे आहे ते कधीतरी आपलं स्वप्न होतं, ज्या साठी आपण स्ट्रगल केलेला होता, आज जे आपल्या कडे आहे ते कोणाचं तरी स्वप्न आहे, ज्या साठी ते स्ट्रगल करत आहेत.
आपण चांगल्या वेळेचा, चांगल्या क्षणाच्या शोधात इतके बिझी होतो कि आपण हे विसरून जातो कि आपल्याकडच्या प्रत्ये्यक क्षणाला चांगल्यात रूपांतर करणं हे आपल्या हातात आहे. आपल्याकडे जे आहे त्यात खुश राहणं, आपली जी स्वप्न आहेत ती हळू का होईना पूर्ण करणं हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे.
योग्य वेळ, योग्य क्षण हा कधीच आपोआप येत नाही, तो आपल्याला बनवावा लागतो. कधी कधी आपण खूप विचार करत बसतो, आता हे होऊ दे मग मी ते करीन, हे झालं कि आनंद साजरा करीन, एवढा पैसा जमला तर मी पुढे जाईन. हे सर्व विचार करून आपण कितीतरी संधी सोडत राहतो या ब्राह्मत कि कधीतरी येतील चांगले क्षण आणि मग आपल्या मनासारखं नाही झालं तर मग डिप्रेशन यायला लागतं, आत्मविश्वास कमी होतो, चिडचिडेपणा वाढतो, नकळत आपल्या जवळच्या लोकांच्या भावना दुखवत राहतो, सतत उदासीनता, नेगेटिव्ह विचार मनात घोळत राहतात.
यालाच म्हणतात हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणं. चांगल्या क्षणांची वाट बघण्यात आपण आपला वर्तमान पूर्णपणे खराब करतो, त्या भविष्याच्या चिंतेत ज्याची काही गारेंटी नाही. जर आपण वर्तमानात जगायला शिकलो तरच आपलं भविष्य परिपूर्ण बनू शकेल.
आता आपल्या हातात जे आहे त्याचा आनंद घ्या, आपल्या खास व्यक्तींना आणि गोष्टींना जपा, भविष्याची सोय करा, चिंता नाही. जर कुठलंही काम नेगेटिव्ह विचाराने किव्हा टेन्शन ने केलं तर त्याचा पॉसिटीव्ह इफेक्ट हा कधीच होणार नाही. भविष्याची नुसती चिंता करत बसले तर भविष्य तर राहिलं बाजूला, वर्तमानही खराब होऊन जाईल.
तुमचा मौल्यवान वेळ विचार करण्यात नाही तर कृतीत घालवा, ऐक्सक्युसेस देण्यापेक्षा तुमच्या विकनेस वर काम करा. जर तुम्ही वर्तमानात राहिला शिकलात तरच भविष्याची तडजोड करता येईल. आता आपल्या कडचा चांगला वेळ, चांगले क्षण न घालवता त्याचा आनंद घ्या, कारण ते फार काळ टिकत नाहीत. वेळ ही खूप महत्वाची गोष्ट आहे, ती आपण कुठे, कोणावर आणि कशावर खर्च करतोय याचं भान ठेवा.
चांगल्या क्षणांच्या शोधात फिरण्या पेक्षा जो क्षण, जी वेळ तुमच्याकडे आहे त्याला चांगलं बनवा, भविष्यासाठी तरतुत करा. बुद्धीने, पद्धतशीर विचाराने, शांतपणाने आणि पॉसिटीव्ह अटीट्युड ने. बघा तर मग तुम्हाला भविष्याची जास्त चिंता सतावणारच नाही. तुमच्याकडून जर तोडगा निघत नसेल तर जे कोणी तुमचे खास आहेत, त्यांचा सल्ला घ्या, ते नक्कीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील.
आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदर ठेवणं हे आपल्या हातात आहे. चांगल्या क्षणाच्या शोधात आपला मौल्यवान वेळ वाया नका घालवू. जे क्षण आहेत त्याला चांगलं बनवून, त्याचा योग्य वेळीच अनंद घ्या, कारण ते फार काळ टिकत नसतं.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
