Skip to content

एखाद्या गोष्टीचा शेवट ही कायम एका नवीन आशावादाची सुरुवात असते.

एखाद्या गोष्टीचा शेवट ही कायम एका नवीन आशावादाची सुरुवात असते.


हर्षदा पिंपळे


उदाहरण म्हणून रसिकाची गोष्ट पाहूयात.

पदवीधर झाल्यावर पुढच्या शिक्षणासाठी रसिकाला परदेशात जाण्याची संधी मिळाली.आलेल्या प्रत्येक चांगल्या संधीचं सोनं करायच असतं हे रसिकाला लहानपणापासून चांगलच माहीत होतं. त्यामुळे परदेशातील या संधीचही काहीतरी चांगलं करून दाखवायच असं तिने ठरवलं.सगळी तयारी झाली होती.तिही तशी आनंदातच होती.मस्तपैकी हवाई सफर करता येणार,नवीन शहर पाहता येणार म्हणून रसिकाची अवस्था “I’m over the moon” अशीच झाली होती.विमानतळावर पोहोचेपर्यंत तिला चैन पडत नव्हती.आणि एकदाचं विमानतळ आलं.फ्लाईटला अजून एक तास बाकी होता.पण अचानक त्या आनंदामध्ये तिला केव्हा गहिवरून आलं कळालच नाही.

सगळं तयार असताना अचानक “बाबा,मला नाही जायचं परदेशात शिकायला. मला इथेच रहायच आहे. मी तुमच्याशिवाय तिकडे कशी राहणार ?सगळं नवीन नवीन असेल तिथे.माझं लक्ष अभ्यासात कमी आणि घराकडे जास्त असेल.बाबाssss . “असं रसिका बोलायला लागली.यावर रसिकाच्या बाबांनी तिला खूप सुंदररित्या समजावून सांगितलं.”रसिका बाळा,तुला परदेशात जायची खरच इच्छा नसेल तर नाही गेलीस तरी काही हरकत नाही. तुझं पुढचं शिक्षण इथे झालं तरी चांगलच आहे.तु तुझा निर्णय बदलला म्हणून आम्ही काही तुला रागवणार नाही.शेवटी मुलांचा कम्फर्ट आमच्यासाठी महत्त्वाचा असतो गं.बघ,निर्णय तुझा आहे.हवं तर थोडा वेळ घे.आजची फ्लाईट गेली तर जाऊदे.आपल्याकडे अजून वेळ आहे.” रसिकाचे बाबा म्हणाले.

“पण बाबा मलाच कळत नाहीये काय करू…?म्हणजे एकीकडे ही चांगली संधी आणि एकीकडे माझा घरातून न निघणारा पाय…..माझी द्वीधावस्था झाली आहे.” रसिका म्हणाली.”हे बघ,बाळा बाहेर जायचं असेल तर घराचा उंबरा ओलांडावा लागेल.नवी सुरुवात करायची असेल, स्वप्नांना गवसणी घालायची असेल तर काही गोष्टी सोडाव्या लागतात.बघ,बाहेर जाणार असशील तर बिंधास्त जा.बाहेरचं नवं जग पाहून ये.नवीन माणसांना जाणून घे.आयुष्याचा एक नवा अध्याय अनुभवायला सुरुवात कर.आणि काही लागलच तर हा तुझा हक्काचा बाबा तुझ्यासोबत आहे.कायम !” बाबा म्हणाले.

तिला बाबांच म्हणणं पटलं.काहीच वेळात फ्लाईट सुटणार होती.तिने बाबांना मिठी मारली आणि बाबांचा हात अलगदपणे सोडला.आणि ती फ्लाईटमध्ये चढली.पाणावलेल्या डोळ्यांनी तिने मायदेशाचा निरोप घेतला.एका नव्या शहरातून नव्या आठवणींची मैफिल सजवायला मार्गस्थ झाली.

रसिकाच्या गोष्टीप्रमाणे आपल्या आयुष्यात असंख्य गोष्टी अशा असतात ज्यांचा शेवट होतो.पण मग अशावेळेस आपण नेमकं काय करतो…? आणि नेमकं आपण काय करायला हवं…? हे आपण पाहूयात.

Say Hello , to a new adventure !

आयुष्यातील प्रत्येक सकाळ-संध्याकाळ आपल्याला रोज काहीतरी नवीन शिकवत असते.रोजच येणारा सुर्य रोज नवा नवा भासतो.पण रोज सकाळी येणारा सुर्य संध्याकाळी मात्र रोज न चुकता त्याच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे निघून जातो.पण मग तो निघून जातो तेव्हा कुठे तो दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला शुभ सकाळ म्हणायला हजर असतो.तो गेलाच नसता तर रोजची सकाळ नवी भासलीच नसती.संध्याकाळचा सूर्यास्त म्हणजे प्रत्येकाला हवहवसं वाटणारं सुख !

जर सूर्यास्त झालाच नसता तर अविस्मरणीय अशी संध्याकाळ आपल्याला अनुभवायला मिळाली असती का ? एखाद्या रोपट्याचं कालांतराने डवरलेल्या वृक्षामध्ये रूपांतर होतं.एखाद्या फुलाचं फळात रूपांतर होतं.इतकच नाही तर आपला बाल्यावस्था ते प्रौढावस्था हा एक प्रवास असाच आहे.या प्रत्येक गोष्टीला एक सुरुवात आहे आणि शेवटही आहे.आणि ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणं आवश्यक असतं त्याप्रमाणेच एखाद्या गोष्टीचा शेवट करणही तितकच आवश्यक असतं.

एखाद्या गोष्टीला निरोप देणं गरजेचच असतं.कारण एखाद्या शेवटानंतरच नवी सुरुवात होत असते.सगळच राखून ठेवून चालत नाही.काही गोष्टींना पूर्ण विराम दिल्याशिवाय पुढे जाता येत नाही.माहीत आहे, एखाद्या गोष्टीची सुरुवात होताना जेवढं छान वाटतं तेवढं छान त्याच गोष्टीचा शेवट होताना वाटत नाही. एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात त्या गोष्टीविषयी असंख्य प्रश्न असतात. हृदयाची धडधड वाढलेली असते.आणि तितकाच नवा उत्साह आणि उत्सुकतादेखील असते.पण जेव्हा शेवट येतो तेव्हा मात्र सगळं विरूद्ध घडत असतं.आपल्याला हा शेवट नकोनकोसा वाटतो.मन अक्षरशः त्यावेळी रडत असतं.कुठेतरी मनात ‘त्या गोष्टीचा शेवट होणार, हे शब्द खूप सलत असतात.एखाद्या गोष्टीचा शेवट होतोय किंवा झालाय यावर आपण विश्वास ठेवायला तयारच होत नाही.मग त्या वस्तू असोत,माणसं असोत वा कोणते क्षण !

या गोष्टींचा कधीकधी शेवट हा होतोच.पण हा शेवट नेहमीच आपल्याला नव्या क्षितीजाला “Hello” करण्यासाठी झालेला असतो.त्यामुळे निरोप किंवा शेवट हा शेवट नसतोच ती तर एक नवी सुरुवात असते आयुष्याची.त्यामुळे एखाद्या गोष्टीचा शेवट होत असेल तर हिरमुसून जाण्यात आपण वेळ घालवणं कंट्रोल करायला हवं.हिरमुसून जाण्यापेक्षा नव्या गोष्टींना साद घालण्यासाठी तयारी करायला हवी. मनाला नव्या सुरुवातीसाठी तयार करायला हवं.तरच एखादी नवी सुरुवात छान होऊ शकते. आणि मुळातच सुरुवात होऊ शकते. नाहीतर शेवटच नाही झाला तर सुरुवात तरी कशी होणार ?

So..एखाद्या गोष्टीचा शेवट ही नवीन गोष्टीची सुरुवात असते हे लक्षात घेऊन आयुष्यातील सगळे (सुख-दुःखाचे)क्षण हसतहसत वेचायचा प्रयत्न करा.

कायम एकच लक्षात ठेवा…

“Every End Is A New Beginning.”


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!