Skip to content

मनातला संशय खराच आहे असं मानून आज अनेक संसार उध्वस्त होत आहेत.

मनातला संशय खराच आहे असं मानून आज अनेक संसार उध्वस्त होत आहेत.


टीम आपलं मानसशास्त्र


कोणतेही नाते हे विश्वास ,, आदर , प्रेम , आपुलकी, ओढ , एकमेकांचे वर्तन यावर आधारित असते. या सगळ्या गोष्टी जेवढ्या जास्त प्रमाणात तेवढे नाते ही खूप चांगले असते. नवरा बायकोच्या नात्यातले किंवा संसारातले जीवघेणे विष म्हणजे संशय. ज्या नवरा बायकोच्या नात्यात संशयाचे भूत येते तेव्हा त्यांच्या सुखी संसाराला ग्रहणच लागते.

संशयाचे भूत एकदा मनात शिरले की घरातले सुख, समाधान , शांती नष्ट होते. आणि त्यातूनच बरेचवेळा संसार उद्ध्वस्त होतात. नवरा बायको हे एकमेकांवर कोणत्या कारणाने संशय घेतात बरं ? आणि ते खरेच आहेत असे मानतात. :

१. सभोवतालचे वातावरण :- विश्वासा चा अभाव : – :

जोडीदार आपल्याशी जरी एकनिष्ठ असेल तरी सभोवताली अशी काही घटना घडली की आपण ही आपल्या जोडीदारावर संशय घेवू लागतो. आणि मनात पक्का ग्रह होत जातो की हे असेच आहे.

अगदी कोणी काही बोलले की आपण त्याचा शहानिशा न करता आपल्या जोडीदारावर अविश्वास दाखवत असतो. आणि समोरच्या व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवतो. आणि दररोजच्या जीवनात घडणाऱ्या छोट्या मोठ्या घटना, जोडीदारावर जास्त लक्ष ठेवून संशय घेवू लागतो. आणि मग हळूहळू तो संशय इतका वाढतो की तेच खरे असा विश्वास निर्माण होतो.

२. पूर्व ग्रहित दृष्टिकोन : – past experience:

जोडीदार कतीही प्रामाणिक असला तरी पूर्व ग्रहित दृष्टिकोन किंवा past experience. यामुळें विचार , मन दूषित होवून अविश्वास निर्माण होत असतो आणि तसे संशय घेतले जातात.

३. एकमेकांच्या सोबतचे वर्तन : –

रोजचे अनुभव , रोजचे एकमेकांच्या सोबतचे वर्तन यातून वर्तनाचे दृढीकरण होत असते. आपल्या जोडीदारावर आपला पूर्ण विश्वास असेल तर संशय मनात येत नाही. एकमेकांच्या सोबत वर्तन कसे असावे ? तर याचे उत्तर आहे चांगले वर्तन असणे गरजेचे आहे..

सतत एकमेकांशी वाद घालत असतील, सतत अविश्वास दाखवून अपमान करत असतील , सतत टोमणे मारत राहतात.यातून एकमेकांच्या मध्ये दुरावा निर्माण होतो . असुरक्षित वाटू लागते. त्यातून ही संशय बळावतो. त्यातून अजूनच अंतर निर्माण होते. आणि नावापुरते नाते उरते . अशावेळी एकमेकांच्या physical गरजा ही हव्यातशा पूर्ण होत नाहीत. अजूनच संशय वाढत जातो. अशावेळी बरेचवेळा घटस्फोट , विभक्त होणे . किंवा एका घरात राहून ही एकमेकांच्या मध्ये काही ही संबंध उरत नाहीत.

४. लग्नाआधी चां मित्र परिवार : –

प्रत्येकाला आपले मित्र मैत्रिणी असतात. काही खूप जवळचे असतात. लग्नानंतर शक्यतो जोडीदाराने आपल्या जोडीदाराला आपल्या मित्र मैत्रिणींची ओळख करून द्यावी. आपल्या मैत्री मध्ये जोडीदाराला ही समाविष्ट करून घ्यावे. अन्यथा बरेचवेळा त्यावरून ही संशय घेतला जातो. आणि नात्यात एक अढी निर्माण होते.

५. आधीचे प्रियकर प्रेयसी यांच्या विषयी ही असेल तर मोकळेपणाने सांगावे. म्हणजे पुढे जावून एकमेकांच्या मनात संशय निर्माण होत नाही आणि त्यातून ही संसारात कटुता निर्माण होते. दुरावा येतो. अचानक काही समजले तर अविश्वास निर्माण होतो.

६. ऑफिस मध्ये स्त्री पुरुष सहकारी एकत्र काम करत असतात. बरेचवेळा ऑफिस मध्ये कामानिमित्त जास्त वेळ थांबावे लागते. तर कधी घरी आल्यावर ही फोन , काम सुरू असते. कधी एकमेकांच्या सोबत बाहेर जेवण , चहा होत असतो.

आपल्या सोबत काम करणारे ही जोडीदाराला माहिती असावेत. वेळोवेळी घरी कळवत राहावे. उशीर होणार असेल . बाहेर जाणार असतील. किंवा काही वेळेस कामानिमित्त out of station जावे लागते तेव्हा सोबत कोण आहे , कुठे जाणार, कधी येणार हे जोडीदाराला माहिती असेल तर संशय निर्माण होत नाही. मात्र जर माहिती नसेल आणि कुठून काही समजले तर मात्र संशय निर्माण होतो.

आणि वारंवार घडत जाणाऱ्या घटना मग बारकाईने मनात घर करून बसतात. संशयाचे पिशाच डोक्यावर बसते. नात्यात बिघाड निर्माण होवू लागतो. काही केले तरी पूर्वी सारखी चांगली नाती परत निर्माण होवु शकत नाहीत.

७. सध्या वापरात असलेले सोशल मीडिया , व्हॉटसॲप सारखे ॲप :

सतत मोबाईल वर असणे , ऑनलाईन असणे , जोडीदाराने पाठविलेल्या मेसेज ला लवकर reply न देणे , किंवा मेसेज बघितला न जाणे , मग कोणासोबत बोलत असेल , chat करत असेल असे संशय मनात येतात. मोबाईल ला पासवर्ड का ठेवला असे ही विचार मनात येवून काही तरी आपल्यापासून लपवायचे आहे असा विचार मनात येवून ही संशय निर्माण होतो. आणि चांगली नाती बिघडत जातात.

जोडीदार हे एकमेकांच्या सोबत सुखी , आनंदी च असावेत , जोडीदार एकमेकांना समर्पित आहेत हे कायम लक्षात ठेवावे. आणि एकमेकांचे वर्तन एकमेकांशी चांगले , आपुलकीचे , प्रेमाचे असावे. पण जर कधी काही कारणाने एकमेकांच्या मध्ये संशय निर्माण झाला तर तो त्याचक्षणी दूर करावा. बरेचवेळा तो दूर करून ही मनात कुठेतरी तो registered झाला असतो. आणि अधून मधून तो डोके वर काढतो. असुरक्षितता निर्माण होते. त्यातून एकमेकांच्या मध्ये अंतर , दुरावा निर्माण होतो. काही वेळेस टोकाचे वाद निर्माण होतात. कधी ते थांबतात तर कधी ते थांबत नाहीत. एकमेकांना मानसिक असुरक्षितता वाटते , मानसिक ताण वाढतो आणि मानसिक त्रास ही होत असतो. काही कालांतराने तो मानसिक त्रास सहन होत नाही. आणि संसार उध्वस्त होतात. कधी कायमचा दुरावा येतो.

याला कारणे ही तशी आहेत. पूर्वी सारखे वडीलधाऱ्या मंडळींचा धाक, दरारा नाही, स्वतंत्र विचार , विभक्त कुटुंब पद्धती , यातून घरामध्ये कोणा एकाच्या मतने पुढे जात नाहीत. सगळ्यांचे विविध विचार . आचार. जरी दोघेच असतील पती पत्नी तरी त्यांच्यात एकमत नसणे , संवाद नसणे , आपुलकी नसणे यातून संशय बळावतो. आणि एकमेकांच्या वर नजर ठेवली जाते. वारंवार तशा घटना घडत गेल्या तर मनातला संशय खराच आहे असं मानून आज अनेक संसार उध्वस्त होत आहेत.

जोडीदाराची वेळीच काळजी घ्या. सर्व गोष्टी मोकळेपणाने बोलत जा. एकमेकांना विचारुन निर्णय घ्या. विश्वासात घ्या . तर ही संशयाची भुते मनावर राज्य करणार नाहीत आणि हस्ते खेळते संसार उद्ध्वस्त होणार नाहीत.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “मनातला संशय खराच आहे असं मानून आज अनेक संसार उध्वस्त होत आहेत.”

  1. अगदी बरोबर बिनचूक माहिती दिली आहे

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!