Skip to content

आपल्याला इतरांनी स्वीकारण्याची गरज नाही, आपण स्वतःला स्वीकारणे आवश्यक आहे.

आपल्याला इतरांनी स्वीकारण्याची गरज नाही, आपण स्वतःला स्वीकारणे आवश्यक आहे.


हर्षदा पिंपळे


[“Learning to accept yourself is more important than making people accept you. It’s how you see yourself that really matters.” -unknown ]

इंग्रजी भाषेतील हा सुंदर विचार कुणी लिहलाय काही कल्पना नाही. परंतु जे लिहलय ते अगदी शंभर टक्के अचूक आहे. सुंदर आहे. आणि आपला या लेखामागचा उद्देशच हा आहे.आयुष्यात acceptance किती महत्त्वाचा असतो ते accept केल्याशिवाय कळत नाही.

मित्रांनो,

आपण स्वतःला किती ओळखतो ? आपण आपल्या स्वतःला पूर्णपणे ओळखलं आहे का?आपल्या क्षमता, आपली पात्रता आपल्याला माहीत आहे का?आपले गुण-दोष आपल्याला माहीत आहेत का?आपण स्वतःवर प्रेम करतो का ?आपण आपल्याला आपण जसे आहोत तसेच स्वीकारले आहे का ?

या सहा प्रश्नांची उत्तरं शोधायला गेली तर ती स्वतःपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे दुसरं कुणीही देऊ शकत नाही.एकदा जाणीवपूर्वक विचार करून हे प्रश्न स्वतःला जरूर विचारा.काही मिळतय का अवश्य पहा.आणि मला खात्री आहे की हे प्रश्न तुम्हाला नक्कीच आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहायला भाग पाडतील.

थोडं थोडकं आयुष्य आपण नेमकं कुणासाठी जगतो ? दुसऱ्यासाठी आपलं स्वतःचं आयुष्य व्यथित करायला तेवढं धैर्य, तेवढा मोठेपणा लागतो.आणि तो कितीतरी लोकांमध्ये असतो देखील. मान्य आहे की दुसऱ्यांसाठी जगणं काही वाईट नाही. परंतु या सगळ्यामध्ये आपण आपल्याच स्वतःच्या आयुष्याकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. कधी अनावधानाने तर कधी अगदी ठरवून!

आपली जगण्याची धडपड ही केवळ लोकांसाठी असते.इतरांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून आपण आपल्याच जीवाशी खेळ खेळत राहतो.इतरांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून आपण काय काय नाही करत..? इतरांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून आपण असंख्य गोष्टी करायला तयार होतो.तेही एखादी गोष्ट झेपण्या पलिकडे असेल तरीही ! कशासाठी करायची इतकी धडपड ? इतरांनी आपल्याला स्वीकारावं हा अट्टाहास कशासाठी मित्रांनो? आणि इतकी धडपड करून किती जण तुम्हाला स्वीकारतात ?

लक्षात ठेवा,प्रत्येकाच्या डिमान्डनुसार आपण वागू शकत नाही.कारण आपण एक डिमान्ड पूर्ण केली तर दुसरी डिमांड सहजपणे वाढते.यामुळे आपल्याकडून लोकं एकामागोमाग एक अपेक्षा करायला लागतात.आपण अपेक्षा पूर्ण केल्यानंतरही समोरचा आपल्याला स्वीकारेल याची काय शाश्वती ? म्हणूनच आपल्याला इतरांनी स्वीकारण्याची गरज नाही तर आपण स्वतःला स्वीकारण्याची आवश्यकता आहे.

आपण आपल्या स्वतःलाच स्वीकारलं नाही तर सगळं जगणच अवघड होऊन बसेल.आपण आपल्याला पूर्णतः स्वीकारतच नाही. आपल्यातील गुण-दोष आपण स्वीकारायला हवे. आपल्या क्षमतांची जाणीव आपल्याला असते.त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून स्वतःला आहे तसं स्वीकारणं आपल्याला जमायला हवं.

कितीही करून इतर लोकं स्वीकारतील की नाही याची काही शाश्वती नाही म्हणून त्याच गोष्टी स्वतःसाठी केल्या तर स्वतःला स्वीकारणही सोपं जाईल.आणि कुणीच स्वीकारत नाही याचं दुःखही होणार नाही.जोपर्यंत आपण स्वतःला स्वीकारू शकत नाही तोपर्यंत कितीतरी गोष्टी तशाच पडून राहतील.”मी अशीच आहे किंवा मी असाच आहे.”असं आपण अनेकदा बोलतो.पण खरच आपण असेच असतो का..? नेहमी इतरांना काय वाटेल याच विचारात गुरफटत चाललेले आपण कधीतरी स्वतःचा विचार करतो का..? आपण आपल्याला काय हवं आणि काय नको..? याचा विचार करतो का?

“त्याला माझा स्वभाव आवडत नाही, त्याला माझे असे कपडे आवडत नाही.माझी भाषा,माझं बोलणं आवडत नाही. माझ्या गोष्टी पटत नाही.” असं आपण वारंवार स्वतःला सांगतो आणि इतरांनी आपल्याला स्वीकारावं यासाठी धडपड करतो. पण स्वतःला मात्र स्वीकारत नाही.आणि इथेच तर आपली चुक होते.खरं तर अशावेळेस आपण स्वतःला काहीच महत्त्व देत नाही.

आपण आपलं अस्तित्व विसरून जातो.नेहमीच इतरांनी आपल्याला स्वीकारावं म्हणून आपण आपल्या कितीतरी गोष्टी गमवत असतो हे आपल्या लक्षात येत नाही.आपण कितीतरी संधी गमावत असतो,कितीतरी गोष्टी हातातून निसटून देत असतो हे आपण खरच विसरतो.

आपणही काहीतरी बेटर डिझर्व्ह करू शकतो याचा आपण विचारच करत नाही.आपण जसे आहोत तसे आहोत हे आपणच स्वीकारणं गरजेचं आहे.काही गोष्टी स्वतःवर सोडायच्या असतात.म्हणून आधी स्वतःला स्वीकारायला शिका.स्वतःसाठी म्हणून काही बदल करायला शिका.त्याने स्वतःमध्येच एक विश्वास निर्माण होऊन स्वीकारण्याची वृत्ती वाढीस लागेल.स्वतःला स्वीकारणं must आहे.हे लक्षात घेऊन स्वतःला स्वीकारायला सुरुवात करा.

कुणीतरी म्हंटल्याप्रमाणे-

“Maybe it’s a good time to start
accepting yourself the way you are.
Maybe you’re already really awesome.”


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

9 thoughts on “आपल्याला इतरांनी स्वीकारण्याची गरज नाही, आपण स्वतःला स्वीकारणे आवश्यक आहे.”

  1. खूप छान वाटला धन्यवाद प्रेरणा नक्की मिळेल

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!