Skip to content

आपले पुढचे प्लॅनिंग या १० प्रकारच्या व्यक्तीपर्यंत अजिबात पोहोचू देऊ नका.

आपले पुढचे प्लॅनिंग या १० प्रकारच्या व्यक्तीपर्यंत अजिबात पोहोचू देऊ नका.


हर्षदा पिंपळे


आयुष्यात महत्वाच काय आहे तर ‘नियोजन’.नियोजन नसेल आयुष्यातील कितीतरी गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या जात नाही. नियोजन चुकलं की आयुष्यच चुकल्यासारखं वाटतं.त्यामुळे आयुष्यात नियोजन हे खूप महत्वाच आहे.प्रत्येकाच कोणतं ना कोणतं नियोजन असतं.करिअर करायच झालं तर नियोजन महत्वाच आहे. करिअर , लग्न-समारंभ , आयुष्यातील महत्वपूर्ण निर्णय घेताना विचारपूर्वक केलेलं नियोजन महत्वाच असतं.पण आपल्या आयुष्यातील गोष्टींच नियोजन करताना आपण ते नियोजन कुणाला सांगायला हवं आणि कुणाला नाही हेच आपल्याला कळत नाही. बऱ्याचदा आपण आपलं सगळं नियोजन सगळ्यांसमोर सांगून टाकतो.आणि नंतर मात्र आपल्या ठरलेल्या नियोजनामध्ये कित्येक अडथळे निर्माण होताना दिसतात. तर म्हणूनच नियोजन कोणत्याही बाबतीत असो आपण ते प्रत्येकासमोर उघडपणे सांगत फिरणं टाळायला हवं.आणि आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात त्यांच्यासमोर तर आपण अगदी जाणीवपूर्वक आपलं नियोजन उघड करणं टाळलं पाहिजे.

तर अशा कोणत्या व्यक्ती आहेत ते आपण पाहूयात.

१)नकारात्मक विचार वृत्ती – नियोजन करताना कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक असतं.त्यामुळे आपलं नियोजन कधीही नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींना सांगू नका.प्रत्येकवेळी ते नकारघंटा वाजवत राहतील आणि त्याचा परिणाम निश्चितच तुमच्या नियोजनावर होऊ शकतो. म्हणून अशा नकारात्मक विचार करणाऱ्या, सतत नकारघंटा वाजवणाऱ्या व्यक्तींना तुमचं नियोजन सांगणं टाळा.

२)खूप प्रमाणात बोलणे – आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात. कुणी फार बोलकं तर कुणी अगदीच मितभाषी असतं.कुणी इतकं बडबड करतं की त्यांच्या पोटात काहीच राहत नाही.एक गोष्ट ते अगदी वाऱ्यासारखी सहज पसरवतात. त्यामुळे जास्त बडबड करणाऱ्या व्यक्तींपर्यंत तुमचं नियोजन पोहोचू देऊ नका.

३)समजून न घेणाऱ्या व्यक्ती– ज्या व्यक्ती कधीच समजून घेत नाही.नेहमीच असमजूतदारपणा दाखवतात अशा व्यक्तींना तुमचं नियोजन सांगू नका.

४)चिडचिड्या आणि रागीट व्यक्ती– चिडचिड्या आणि रागीट व्यक्तींसमोर सहसा नियोजनाबाबत बोलणं टाळा.कारण अशा व्यक्ती रागाच्या भरात तुमचं नियोजन सर्वांसमोर आणू शकतात. त्यामुळे तुमचं नियोजन हे तुमच्यासाठी मर्यादित राहण्याची शक्यता फार कमी असते.

५)स्वार्थी वृत्ती – आयुष्यात निःस्वार्थी लोकं असतात तशीच काही स्वार्थी वृत्तीचीही लोकं असतात.जे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार असतात. अगदी दुसऱ्यांच्या नियोजनात अडथळे निर्माण करायलाही या स्वार्थी व्यक्ती मागे पुढे पाहत नाही. म्हणून अशा स्वार्थी लोकांपासून जरा सावधगिरी बाळगलेली केव्हाही चांगलीच.

६)तुमच्या क्षमतांवर शंका घेणाऱ्या व्यक्ती– अशा व्यक्ती असतात ज्या कायमच तुमच्यावर अविश्वास दाखवतात. तुमच्या क्षमतांवर नेहमीच शंका घेतात. तुम्ही काहीतरी करू शकता यावर त्यांचा विश्वास नसतो.अशा व्यक्तींना तुमच्या नियोजनाचा कणभरही अंदाज येऊ देऊ नका.

७)गोंधळलेल्या व्यक्ती– ज्या व्यक्ती सातत्याने गोंधळलेल्या असतात. त्या व्यक्तीपर्यंत कोणतही नियोजन पोहोचू देऊ नका. कारण गोंधळलेली व्यक्ती अनेकदा आपल्याला गोंधळात टाकू शकते.आणि गोंधळलेल्या अवस्थेत नियोजनही गोंधळण्याची शक्यता असते.

८)निरूत्साही /निराशावादी व्यक्ती– निराशावादी, निरूत्साही लोकांपुढे नियोजनाची कोणतीही वाच्यता करू नका. यामुळे तुमचा उत्साह, आशा मावळण्याची शक्यता असते.

९)मनात पूर्वग्रह निर्माण करणारे – काही लोकं मुद्दामून आपल्या मनात एखाद्या गोष्टीविषयी चुकीच्या शंका निर्माण करतात. आणि त्यामुळे त्या शंकांचा परिणाम निश्चितच कोणत्याही नियोजनावर होऊ शकतो.

१०)डीमोटीवेट करणाऱ्या व्यक्ती– काही जणांना दुसऱ्याची प्रगती झालेली, दुसऱ्याच्या आयुष्यात येणारं सुख हे बघवत नाही.त्यामुळे अशा व्यक्ती सातत्याने प्रगती करणाऱ्या माणसाला डीमोटीवेट करण्याचा प्रयत्न करत असतात. सतत प्रगतीच्या दिशेने जाणाऱ्या माणसाला ही माणसं कायम मागे ओढत असतात.

अशा काही व्यक्तींपर्यंत तुमचं नियोजन पोहोचू देऊ नका.यामुळे कितीतरी गोष्टींमध्ये अडथळे येऊ शकतात. तुमचं प्लॅनिंग हे अर्धवट राहू शकतं.करिअर असो,रिलेशन असो किंवा एखादं आर्थिक बचतीच नियोजन असो,कोणत्याही पद्धतीच प्लॅनिंग हे मर्यादित लोकांपुढेच बोला.सगळ्यांसमोर नियोजन डीस्क्लोज्ड् करणं जाणीवपूर्वक टाळायचा प्रयत्न करा.

आयुष्यातील काही नियोजन शांततेत पार पाडा.यशस्वी वाटचालीच नियोजन सांगण्यापेक्षा यशाचा आनंद साजरा करण्याला प्राधान्य द्या.

विचार करा आणि निर्णय घ्या.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!