Skip to content

आपल्याला जोडीदार बदलण्याचा चॉईस मिळाला तर काय होईल…

आपल्याला जोडीदार बदलण्याचा चॉईस मिळाला तर काय होईल…


टीम आपलं मानसशास्त्र


असे म्हणतात की लग्नाच्या गाठी या स्वर्गात ब्रह्मदेव बांधतात. जिथे ज्याचे तीळ तांदूळ लिहिले असतात तेच नशिबात असते.

पण आता सध्याची परिस्थिती बघता लाखोंच्या मधला पगार आणि रंग रूप हे जोडी ठरवतात असे वाटते. कित्येक वेळा लग्न ही एकमेकांच्या सोबत बोलून भेटून ठरविली गेली तरी ही कधी कधी काही ठिकाणी माशी ही शिंकतेच.

कधी जोडीदाराच्या आवडी निवडी भिन्न असतात. कधी कोणी मुख दुर्बल , अबोल असते. तर कोणी प्रचंड वायफळ बडबड करणारे असते. तर कोणी खूप उत्साही तर जोडीदार अरसिक आणि बिलकुल उत्साही नसतो. अगदी शारीरिक संबंध ही जोडीदाराला खूप आवड ..नावीन्य , विविधता , रसिकता तर दुसरा अरसिक , आवड नसणारा./ नसणारी .

एकमेकांचे खूप जमते असे नाही तरी पटवून घेणारे तर काही थोडे जरी मनाविरुद्ध झाले तरी पटवून न घेणारे. सतत वाद विवाद , भांडण .एक शांत असेल तरी दुसरा काही ना काही कारण काढून सतत अशांती निर्माण करणारा.

बरेचवेळा अशी प्रतिक्रिया असते की , मीच काय ते समजून घेणारी / घेणारा मिळाले / मिळालो. नाही तर दुसरे // दुसरी कोणी तुझ्या सोबत टिकले नसते. असे सतत बोलले जाते. आणि कधी तरी मनात मग असे विचार येवू लागतात की, आपल्याला जोडीदार बदलण्याचा चॉईस मिळाला तर काय होईल…

कल्पना आणि वास्तविकता यात कायमच खूप तफावत असते. बरेचवेळा आपल्याला वाटत असते की , आपल्याला जोडीदार बदलण्याचा चॉईस मिळाला तर आपले जीवन सुखी होईल , या जोडीदारा मधले सगळे दोष जातील. आणि आपल्याला पाहिजे तसा जोडीदार बदलून आपण आनंदात आणि सुखात राहू. त्रासातून मुक्त होवू दोघेही असे विचार येत राहतात.

खरेच जर आयुष्यात आपल्याला जोडीदार बदलण्याचा चॉईस मिळाला तर त्याचे फायदे ही होतील आणि तोटेही.

फायदे काय बरं :

१. योग्य जोडीदार निवडी करिता मदत होईल.
सगळ्यात आपल्याला आपल्या जोडीदाराचे गुण दोष चांगले समजले असतात. ते बदलता येत नाहीत. म्हणून असा जोडीदार शोधला जाईल ज्या दोषांचे खूप मानसिक त्रास होतात. जसे एखादा जोडीदार काळजी घेत नसेल , आर्थिक दृष्ट्या stable नसेल, सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडत असेल, काही शारीरिक दृष्ट्या दोष असतील, शारीरिक संबंध चांगले प्रस्थापित करू शकत नसेल, शिक्षण नसेल, नोकरी नसेल आणि आर्थिक परिस्थिती ही नाही. शारीरिक संबंध ही चांगले नसतील , तरी ही adjust करून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याची कशात साथ ही नसेल. तर अशा वेळेस नवीन जोडीदार निवडताना त्यात काय नसावे आणि काय असावे याचा पाच पोच आलेला असतो.

आपल्याला नक्की कसा जोडीदार हवा आहे याचे ठाम मत तयार झालेले असते. तसा जोडीदार शोधण्यास मदत होते. आणि जर असा मिळाला तर खरेच नव्याने खूप आवडीने आणि उत्साहाने संसार केला जातो. जगण्याविषयी सकारात्मकता निर्माण होते.

२. आधी केलेल्या चुका बदलता येतील.अनुभव आल्याने त्या गोष्टी मध्ये सुधारणा केली जाईल : जोडीदारासोबत केलेल्या चुका किंवा नावडत्या गोष्टी या नवीन coice मुळे बदलता येतील. आधी असलेले अनुभव यातून कसे वागावे आणि कसे वागू नये याचा उपयोग पुढील नाती निर्माण करताना होईल.

३. ज्या गोष्टी करायच्या राहिल्या आहेत त्या करण्याची संधी लाभेल. : समजा पूर्वीचा जोडीदार अरसिक असेल आणि आता चा रसिक तर त्या दृष्टीने सकारात्मक गोष्टी घडतील, आधी एखाद्याला सहल , प्रवास , भटकंती , सिनेमा किंवा नवरा बायको जास्तीत जास्त एकत्र असणे आवडत नसेल आणि त्याचा त्रास होत असेल. कसलीच आवड नाही म्हणून सतत नाराजी निर्माण होत असेल नात्यात तर नव्या जोडीदाराला मात्र हे सगळे आवडत असेल आणि ते केले गेले तर मन आनंदी , उत्साही राहील. तसेच आहे शारीरिक जवळीक , शारीरिक संबंध हे नियमित होत नसतील तरी नात्यात तणाव वाढतो.

त्यामुळे नवीन जोडीदार जर असा शारीरिक जवळीक करणारा , दोघांच्यात खूप छान शारीरिक संबंध असतील तर सकारात्मक गोष्टी घडतात. नाते अजून जास्त फुलत जाते.. सुख , शांती वाढते.

४. मनासारखा जोडीदार निवडीची परत एक चांगली संधी मिळेल आणि जीवन सुखी , आनंदी , उत्साही , सकारात्मक दृष्टीने जगता येईल.

तोटे :

१. दुरून डोंगर साजरे : बरेचवेळा व्यक्ती या जवळ आल्या संपर्कात आल्या तरच त्यांच्या विषयी चांगले समजते. त्यांची चांगली ओळख होते.
मात्र जोडीदार बदलण्याचा चॉईस ही मिळाला आणि तो दुरून खूप उत्साही आणि आपल्या योग्यतेचा वाटला. पण प्रत्यक्षात जेव्हा एकत्र संसार सुरू होईल तेव्हा त्याच्यातल्या ही उणिवा जाणवू लागल्या तर आडातून उठून पोहऱ्यात पडल्यासारखे .किंवा इकडे आड तिकडे विहीर असेच होईल. आणि त्यातून. परत पश्चात्ताप च होईल.

२. परत परत संधी मिळत नसते त्यामुळे तुमच्यात काही कमतरता आहे असेच सर्वांना वाटेल. समजा दुसरा जोडीदार निवडला आणि त्याच्यात ही काही कमतरता असतील.दोघांचे सुरुवातीला वाटले पटेल पण नंतर पटले नाही. जमले नाही. आवडी निवडी , संस्कृती , विचार भिन्न असतील तर ती नवी नाती ही नको असे होत.

अशावेळी जर परत जोडीदार बदलण्याचा निर्णय घेतला किंवा विभक्त होण्याचा निर्णय घेतला तर सर्वस्वी दोषीच ठरवले जाते. आणि तुमच्यात च काही उणीवा , कमतरता आहेत असे ठाम शिक्का मोर्तब केले जाते.

३. फसवणूक :आधीच्या जोडीदारासोबत चे प्रश्न , त्याचे त्रास सुरुवातीला समजून घेवून उगीच दया दाखवून , फसवून लग्न केले आणि केवळ त्यातून स्वार्थ साधण्याचे प्रयत्न करणारे ही असतात. त्यामुळे कुठे फसवणूक तरी होत नाही ना याची काळजी घेतली गेली पाहिजे.

४. Comparision सुरू होते. ;: आठवणी येतात.. काही गोष्टी नव्याने सुरू करताना आधीची आणि आता असलेल्या जोडीदाराची तुलना सुरू होते. अरे ही गोष्ट आधीच्या जोडीदााबरोबर जास्त एन्जॉय केली होती. किंवा जरी तसाच परत अनुभव घेतला तर आधी पहिल्यांदा घेतलेल्या अनुभवाच्या आठवणी लक्षात येतात.मग कटू असो किंवा चांगल्या. पण त्याचा परिणाम present situation वर होतो आणि तुम्ही ती गोष्ट एन्जॉय करण्याकडे तुमचे लक्षच राहत नाही.

किंवा मग जर खूप मस्त एन्जॉय करत असाल तरी पूर्वी हीच गोष्ट करताना किती त्रास झाला होता कसा वाईट अनुभव होता हे विचार अगदी सहज मनात येवून ही जातात. कदाचित अजून जास्त एन्जॉय करण्यासाठी ही त्याचा वापर केला जावू शकतो. पण comparision होतेच. आणि ती गोष्ट आधी जोडीदाराने खूप छान केली असेल आणि आता तेवढी छान करत नसेल तर अरे अधीचेच चांगले होते असे तुलनात्मक विचार येवून त्रास ही होवू शकतो.

सर्वगुणसंपन्न कोणीच नसते. आयुष्य आणि लग्न ही कुठे ना कुठे थोडी फार तडजोड असते. दोन भिन्न कुटुंब आणि भिन्न व्यक्तिमत्त्व एकत्र येताना प्रत्येकाच्या आवडी निवडी भिन्न असतात. विचार भिन्न असतात. परिस्थिती भिन्न असते. मग आर्थिक असेल किंवा मानसिक परिस्थिती वेगळी असते. कोणाला. काही घरचे काम टेन्शन असेल तर त्याचा परिणाम नात्यावर ही होतो. पण दोघांच्या मध्ये कायमच सगळ्या गोष्टीत तडजोड करावी लागत असेल तर जोडीदार बदलण्याचा चॉईस मिळाला तर मात्र हे वरदान ठरेल. आणि जर जोडीदार निवडीचा चॉईस चुकला तर मात्र आयुष्याचे नुकसान होईल. आगीतून उठून फुफाट्यात पडतो आहे असे वाटेल.

पण ज्या जोडीदाराच्या मध्ये वाद विवाद आहेत कायम , शारीरिक संबंध चांगले नाहीत . काही दोष , अभाव आहेत. न्यूनता आहे . कोणी आरोग्य दृष्ट्या असमर्थ आहे. कोणाचा शारीरिक व्याधी कधीच बरे होणारे नाही .जसे अनेक वर्ष कोमा मध्ये असेल , किंवा काही शारीरिक दोष ज्यामुळे संबंध चांगले होत नसतील अशा जोड्याना जोडीदार बदलण्याचा चॉईस मिळाला तर त्यांचे जीवन बदलून जाईल. त्यांना हे फायदेशीर ठरेल.वरदान ठरेल.

पण जर वारंवार जोडीदार बदलावा वाटत राहिले तर काय होईल ? शारीरिक काही व्याधी निर्माण होतील का ? जसे संसर्गजन्य काही रोग होतील का याची भीती ही निर्माण होतेच. आणि आपल्याला कुठे ना कुठे न्यूनगंड येण्याची शक्यता ही असते.

आयुष्यात चढ उतार हे असतातच. अगदी सुरुवातीच्या काळात आपल्याला कोणत्याच गोष्टीची सवय नसते , अनुभव नसतात आपल्याला नक्की काय पाहिजे हे माहिती नसते. जसे एका नोकरीत मिळालेल्या अनुभवाचा पुढची अजून चांगली नोकरी मिळविण्यासाठी उपयोग होतो. अनुभव वाढतो त्यामुळे चांगल्या संधी उपलब्ध होतात. तसे लग्नाच्या बाबत , जोडीदार निवडी बाबत ही नक्कीच होत असावे.

फक्त आपण भारतासारख्या देशात राहतो जिथे समाज , संस्कृती,रीती रीवाज , संस्कार , कायदा , वडीलधारी यांचा अजून पगडा आहे त्यांना हा जोडीदार बदलण्याचा चॉईस फारसा पटणार नाही. त्यांचा कायम रोष आणि विरोध पत्करावा लागतो. आणि जीवन अजून अवघड होते.

परदेशात पटले नाही, जमले नाही, आवडी निवड , रहाणीमान भिन्न असेल, अगदी सुरुवातीला चांगले पटत असते पण नंतर एकमेकांच्या सहवासात अजून नक्की आपल्याला काय पाहिजे हे समजत जाते आणि त्यातून काही बिनासत गेले तरी , मुलांच्या जन्मानंतर ही विभक्त होवून नवीन जोडीदार शोधला जातो. जोडीदार बदलण्याचा चॉईस राहतो. कारण तिथे खूप बंधने नाहीत. समाज आणि कायदा याने ही तेवढी बंधने नाहीत की एकशीच कायम बांधील राहिले पाहिजे. जरी तुमचे पटो अगर न पटो मन मारून एकत्र जगलेच पाहिजे.

लग्न केले म्हणजे मनाविरुद्ध ही गोष्टी स्वीकारल्या आणि केल्याचं पाहिजे हे कमप्लशंन आहे. जबरदस्ती आहे. तसे परदेशात विचार स्वातंत्र्य आहे. लग्नानंतर पटले नाही तरी किंवा अजून कोणी आवडले म्हणून ही एकमेकांना सोडून ते नवीन जोडीदार स्वीकारण्याची मोकळीक आणि मानसिकता त्यांची आहे. तशी तिथल्या लोकांची बंधने ही नाहीत. की मारून मुटकून आहे त्याच्या सोबत लग्न आयुष्यभर पार पाडायचे असे विचार सरणी नाही. जगणे बंदिस्त नाही तर प्रत्येकाला मोकळेपणे जगण्याची विचार करण्याची संधी मिळते.

आता भारतात ही अनेक बदल घडू लागले आहेत. लिव्ह इन रिेशनशिपमध्ये आवड निवड समजून घेण्याचा , पटले तर एकत्र नाही तर अजून दुसरे शोधण्याचा चॉईस आहे. लग्न झाल्यावर ही अजून काही ठिकाणीच कायम तेच नाते टिकविण्याचा प्रयत्न केला जातो. तर काही ठिकाणी वैचारिक स्वातंत्र्य ही मिळत आहे. त्यातून जोडीदार बदलण्याचा निर्णय ही घेतला जातो आहे.

बरेचवेळा पुरुषांना नावीन्य हवे असते. म्हणून नवनवीन स्त्रियांकडे ते आकर्षित होतात. आणि संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण स्त्रिया बऱ्याच प्रमाणात अजून तेवढ्या मोकळ्या नाहीत. त्यांना एक जोडीदार म्हणजे सर्वस्व दिले असे वाटते त्यातून दुसऱ्या कोणाशी संबंध ही नकोत असे वाटते.

अर्थात आता बरेच स्वातंत्र्य आणि सुधारणा झाल्या आहेत. स्त्रिया ही पुरुषांच्या बरोबरीने कमावत्या आहेत , शिक्षण घेतलेल्या स्वतंत्र विचारसरणीच्या आहेत. तुलना करू लागल्या आहेत. त्यातून पटले तर ठीक नाही तर सरळ विभक्त होवून दुसरे जोडीदार स्वीकारणाऱ्या ही आहेत. शिवाय मोठ्या मोठ्या कंपनी मध्ये सतत सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांच्या सहवासातून त्यांच्या विषयी आकर्षण निर्माण होवून जोडीदार बदलणारे स्त्री पुरुष ही आहेत.

जसे फायदे तसे तोटे ही आहेत. पण एक मात्र आहे. भारतात जोडीदार बदलाचा coice मिळाले तरी मुले झाल्यावर मुलांच्या जबाबदारी सह स्वीकारणारे कमी आहेत. आणि त्यात ही पुरुष एकटे मुलांची जबाबदारी घेणारे असतील तर ते नव्याने लग्न करताना मुले नसलेली घटस्फोटित किंवा अविवाहित स्त्री निवडी करिता जास्त पसंत करतात. किंवा स्वतः ची मुले आहेत त्यांना नीट सांभाळावे याकरिता मुले होवू न देण्याची नवीन जोडीदाराला अट ठेवतात. ती तडजोड करावी लागते.

काही गोष्टींचे आयुष्यभराचे त्रास कमी होण्यासाठी आपल्याला जोडीदार बदलण्याचा चॉईस मिळाला तर आयुष्याचे भले होईल. या उलट नवीन जोडीदाराची निवड चुकली तर मात्र त्रास अजून वाढेल.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!