मेंदूतील बिनकामाची जागा रिकामी केली तरच नवीन गोष्टींसाठी जागा होते.
पुजा सातपुते
आपल्याला जन्माला घालताना निसर्ग आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देऊन पाठवतो. आपल्या जवळ तेव्हा आपलं स्वतःचं असं काहीच नसतं. आपला मेंदू हा पूर्णपणे रिकामा असतो. हळू हळू इतरांच्या सानीध्यात राहून, नवीन गोष्टी आपण शिकत असतो. कधी चांगल्या तर कधी वाईट. मग कुठली गोष्ट आपण आत्मसाद करायची व कुठली नाही हे आपण आपल्या आयुष्यात कशाला जास्त महत्व देतो त्यावर अवलंबून असतं.
जन्माला आल्यावर आपल्या डोक्यात काहीच नसतं. आपल्या आई वडिलांकडे बघून, मोठ्यांलोकांच्या चांगल्या गोष्टी ऐकून आपण आपला मेंदू घडवत असतो. पुढे शाळेत गेल्यावर आपल्या टीचर्स कडून चांगलं शिक्षण घेतो, आपल्या मित्र मैत्रिणींनकडून कळत नकळत चांगल्या वाईट गोष्टी शिकत असतो.
हे सर्व करत असताना आपण आपल्या भोवती एक प्रकारची बाउंडरी निर्माण करतो आणि जी गोष्ट आपल्याला आवडते तीच करत राहतो. पण कधी कधी आपण आपल्यासाठी काय चांगलं आहे हे विसरून जातो. आत्ता बघा ना आपल्याला माहित आहे जास्तं टीव्ही बघण्याने, किव्हा मोबाईल वापरल्याने, त्या वर गेम्स खेळल्याने , वाईट व्यसन केल्याने आपल्याला त्रास होतो तरी सुद्धा ती गोष्ट आपण सोडत नाही. कारण आपण आपल्या मेंदूत त्या साठी एक जागा निर्माण करून ठेवलेली असते.
आपण आपल्या डोक्यात इतक्या साऱ्या गोष्टी साठवून ठेवल्या आहेत कि त्यामुळे आपलं चांगल्या गोष्टी कडे सहज दुर्लक्ष होतं. जरी चांगल्या विचाराने काही करायला गेलो आणि आपण फेल झालो तर डिप्रेशन येतं. मग हवे नको ते विचार येतात. नकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि आपण आपल्या मेंदूत बिनकामाच्या गोष्टी जपून ठेवतो. तो/ ती माझ्याशी भांडला /भांडली, तो/ ती मला असं बोलला / बोलली, मी नापास झालो/ झाले आणि बरच काही.
कोणा बरोबर भांडण झाल्यावर आपण राग, द्वेश याने आपला मेंदू भरतो व मग आपली चीड चीड होते. त्याचा आपल्या कामावर परिणाम दिसून येतो. जे जवळचे आहेत त्यांच्यावर राग निघतो. आपले संबंध बिघडतात,आपण स्वतःच्या व आपल्या जवळच्या लोकांच्या भावनांचा विचार करत नाही आणि त्यात स्वतःचं नुकसान करून घेतो.
त्या पेक्षा मेंदूतील बिनकामाची जागा रिकामी केली तर नवीन गोष्टी साठी नक्कीच जागा होऊ शकते. प्रत्येक गोष्टीचं सुब्स्टिटयूट हे असतं. आपल्याला ते शोधावं लागतं. जसं रागाचं सुब्स्टिटयूट शांतपणा. आपण माणूस आहोत आणि आपण रिऍक्ट करणारच. ते साहजिक आहे. पण जर आपल्या रागामुळे नाती बिघडत असतील, त्याचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत असेल तर नक्कीच त्या वर विचार करायला हवा.
आपल्या आयुष्यात अघटित घडलं तर थोडावेळ घ्या, एक तिसरी व्यक्ती बनून निरीक्षण करा, आपलं किव्हा समोरच्याचं काय चुकलं आहे त्याचा विचार करा, नक्कीच तुम्हाला उत्तर सापडणार. तसंच जर आपल्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर थोडा ब्रेक घ्या. स्वतःचा विकनेस शोधा, कुठल्या गोष्टी मुळे आपली प्रगती होत नाही आहे त्याचा विचार करा, स्वतःमध्ये पॉसिटीव्ह बदल आणा आणि नव्याने परत प्रयत्न करा. नक्कीच तुम्ही यशस्वी होणार.
आपला मौल्यवान वेळ नुसता विचार करण्यात घालवू नका तर प्रॅक्टिकल करा. नवीन गोष्टी शिका, वाचन करा, नवीन जागी फिरायला जा, आपली हॉबी जोपासा, वाईट गोष्टींकडे वळू नका, आत्ता आपल्यासाठी काय महत्वाचा आहे त्याचा विचार करा, नवीन नवीन स्वप्न बघा, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, नाही झाली तर निराश होऊ नका, थोडा वेळ द्या, तयारी करा आणि नवीन रित्या कम बॅक करा.
आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते सुंदर ठेवणं हे आपल्या हातात आहे . मेंदूतील बिनकामाची जागा रिकामी केली तरच पॉसिटीव्ह गोष्टींसाठी जागा तयार करू शकतो . म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर! जर चांगल्या मनाने आपण कुठलीही गोष्ट केली तर निसर्ग सुद्धा आपली मदत नक्कीच करतो.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
