Skip to content

प्रत्येक पती – पत्नीमध्ये एकमेकांना समजून घेण्याचे हे विशेष गुण असावेत.

प्रत्येक पती – पत्नीमध्ये एकमेकांना समजून घेण्याचे हे विशेष गुण असावेत.


गीतांजली जगदाळे

(समुपदेशक)


नात्यात जेवढी प्रेम आणि विश्वासाची गरज असते , तेवढीच समजून घेण्याचीदेखील गरज असते. समजून घेतलं नाही तर नुसतं प्रेम नातं टिकवू शकत नाही. कोणताच माणूस परफेक्ट नसतो. प्रत्येकाच्यात काही गुण तर काही दोष आढळतात. परफेक्ट पार्टनर शोधायचा म्हणलं तर एकटच राहायची पाळी येईल. पण आपल्या नात्यासाठी, आपल्या माणसांसाठी आपण काही गुणांचा अवलंब नक्कीच करू शकतो .

आपल्या पार्टनरला समजून घेणे म्हणजे नक्की काय करणे? त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे हे समजून घेणे , त्यांचा त्या बोलण्यामागे असलेला हेतू त्यांना न विचारता लक्षात येणे. पण ही काही जादू नव्हे जी एका रात्रीत आपल्याला येईल , त्यासाठी सहवास हा उत्तम पर्याय. एका ठराविक कालावधीने आपल्या पार्टनरची विचारप्रक्रिया , हेतू, स्वभाव , आवडीनिवडी हे सगळच लक्षात येऊ लागत. पण तरीदेखील या सगळ्या प्रोसेस मध्ये काही खास efforts घ्यायची गरज असते.

जेवढं तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगले ओळखू लागताल , त्यांचा स्वभाव , विचार , द्रूष्टीकोन स्वीकारताल , तुमच्यात गैरसमज होण्याचं प्रमाण तेवढंच कमी होईल. याने तुमचं म्हणणं व्यवस्थित पोचायला मदत होते. आपल्या पार्टनरला समजून घेणे का महत्वाचे आहे?

कोणतंही लग्न अथवा नातं निरोगी , आनंदी आणि समाधानी असण्यासाठी त्यातल्या व्यक्तींनी एकमेकांना समजून घेण्याची गरज असते. आपल्या पार्टनरला आपल्याकडून असलेल्या अपेक्षा माहित असणं गरजेचं असतं.

कोणत्याही नात्यात आपल्याला समजून घेतल्याची , आपलं ऐकून घेतलं जातं याची आणि आपल्या माणसाला आपली किंमत असल्याची भावना दोन्ही व्यक्तीच्या मनात असणे फार महत्वाचं असत. जसजसा अधिकाधिक वेळ त्या व्यक्तींचा एकेमकांसोबत जातो तसतशी समजून घेण्याची प्रोसेस अधिक चांगली होत जाते , पण त्यासाठी दोघांना ही consciously प्रयत्न करण्याची गरज असते.

१. स्वतःला समजून घ्या –
सगळ्यात आधी स्वतःचे आचारविचार , अपेक्षा , विचारप्रक्रिया , मते या सगळ्याचा विचार करा.आपल्या गोष्टी आपल्याला नीट समजल्याने आजूबाजूची परिस्थिती समजायला ही मदत होते. आपल्या बद्दल सगळं माहित असल्याने आपल्या पार्टनरचा behavior , त्याच्या भावना आपल्याशी किती मिळत्याजुळत्या आहेत हे समजायला सुरुवात होते.

२. पार्टनरला आपली प्रायोरिटी बनवा –
आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी असतात. त्यात आपल्या पार्टनरला स्थान देणे महत्वाचे असते. आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टींसाठीच आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपल्या पार्टनरला आपली प्रायोरिटी बनवणे , वेळ देणे , संवाद साधणे याने एक चांगला bond तयार होतो आणि अपोमतच आपल्यातली understanding वाढते. समजून घेणे ही एक लॉंग प्रोसेस आहे त्यासाठी patience आणि प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.

3. Body language notice करायला सुरुवात करा – माणसाच्या body language वरून न बोलताही बऱ्याच गोष्टी कळतात . कपाळावर पडणाऱ्या आठ्या , अचानक घेतलेला मोठा श्वास , पडलेले खांदे इ . हे सगळं आपल्याला माणसाच्या मनस्थितीबद्दल काही ना काही सांगून जातं . आपल्या partner च्या बॉडी language च निरीक्षण केले असता हळूहळू त्यांना समजायला ही तुम्हाला मदत होईल .

4. त्यांच्या बालपणाबद्दल प्रश्न विचारा . बालपणाच्या अनुभवांचा माणसाच्या जडणघडणीत , व्यक्तिमत्वात फार मोठा हात असतो . एखादा माणूस ठरावीक पद्धतीनेच का विचार करतो ? याच उत्तरही त्याच्या बालपणात दडलेलं असू शकत .त्यांनी केलेल्या त्यांच्या बालपणाच्या वर्णनावरून , गोष्टींवरून त्यांची personality अशी का आहे , त्यांच्या दृष्टिकोन असा का आहे हे कळेल .

Partner मध्ये असलेल्या गुणांचं कौतुक करा , त्यांना appreciate करा . जेव्हा आपण मोकळेपणाने समोरच्या व्यक्तीचं कौतुक करतो , त्यांना appreciate करतो तेव्हा ती व्यक्तीदेखील हळूहळू त्यांच्या बऱ्याच अशा गोष्टी सांगायला सुरुवात करते, ज्याने तुम्हांला ती व्यक्ती अजून चांगल्या रीतीने समजू लागते . Appreciation हे नात्यातलं सुख – समाधान शाबूत ठेवत असते . आणि जेव्हा लोक आनंद आणि समाधान अनुभवतात तेव्हा ती त्या नात्यात अजून मोकळेपणाने , प्रामाणिकपणाने वावरू लागतात . आपल्या पार्टनरला आपली किंमत आहे , आपण जसे आहोत तसे त्याने स्वीकारले आहे असे वाटून लपवाछपवीची गरज वाटत नाही , आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी सांगायला ते तयार होतात .

5.आपल्या पार्टनर ची संवादाची पद्धत जाणून घ्या . प्रत्येक माणसाची संवाद साधण्याची वेगळी पद्धत असते. काही माणसे आपल्याला जे वाटत ते स्पष्ट बोलून दाखवतात तर काही माणसे indirectly ते मांडतात . काही लोकांना स्वतः बद्दल बोलताना awkward feel होतं , तेव्हा ते काही body language मधूनही express होत असतात . आपल्या partner ची संवाद पद्धत समजायचं प्रयत्न करा .

6.भांडणाने प्रेम वाढतं ‘ , हे पहिलं डोक्यातून काढून टाका -. भांडणात आपण बऱ्याचदा अशा गोष्टी बोलून जातो ज्याने समोरचा माणूस दुखावला जातो . भांडण निवळत , पण मनाला झालेल्या जखमा काही लवकर बऱ्या होत नाहीत . त्यामुळे प्रेम वाढण्यापेक्षा दुरावा मात्र नक्कीच येतो . एकमेकांच्या मताशी सहमत नसणे , त्यावरून वाद होणे हे खूप स्वाभाविक आहे . पण या गोष्टी handle करायला योग्य approach असायला हवा .

आपण आता खूप रागात आहोत , असं वाटलं तर तिथून निघून जाणं जास्त चांगलं . शांत झाल्यावर त्या गोष्टींचा नीट विचार करणं शक्य होतं आणि कोण चूक , कोण बरोबर यापेक्षा प्रॉब्लेम कसा solve करता येईल याकडे लक्ष द्यावं . तुमच्या partner ला त्याच्या गरजा आणि स्वप्नांबद्दल विचारा , समोरच्या माणसाला काय आवडतं ? त्याला कशाची गरज आहे , हे guess करण्यापेक्षा त्याच्याकडून जाणून घ्या .

7. संकटाच्या परिस्थितीत त्यांना सपोर्ट करा – माणूस म्हंटलं की चुका होणारच . कधी – कधी या चुकांमुळे आपण स्वतः वर संकट ओढावून घेतो . आपल्या partner च्या बाबतीत असे घडले असता , त्याला दोष देण्यापेक्षा त्याला त्या परिस्थितीतून मार्ग काढायला मदत करा , support द्या . काही वेळा चुका दाखवण्यापेक्षा आधाराची गरज जास्त असते . याने तुमचं bonding चांगल होऊन परिस्थिती टळल्यानंतर तुम्ही झालेल्या चुकांबद्दल तुमच्या partner ला शांतपणे समजावू शकता , आणि तेव्हा प्रसंगावधान राखल्याने त्याचा तुमच्याबद्दल विश्वास आणि आदर वाढून तो ही तुमचं म्हणणं नीट ऐकेन .


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!