तुम्हाला सुद्धा कुठल्याच गोष्टीत काहीच positive दिसत नाही, तर हा लेख वाचा.
मेराज बागवान
Positive राहा, Positive राहा, असे अनेकदा बोलले जाते.परिस्थिती कशी ही असो, कोणतीही असो ,अगदी काहीही झाले तरी तुम्ही positive च राहिले पाहिजे असे अनेकजण म्हणतात. अगदी खरे आहे हे.पण तरी देखील काही जण असेही आहेत,त्यांना कुठल्याच गोष्टीत काहीच positive दिसत नाही. अशा लोकांनी ही कथा जरूर वाचावी.
‘विवेक’ अगदी गरीब कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा.घरची परिस्थिती अत्यंत नाजूक.आई-वडील इतरांच्या शेतात कामाला जात असत. दोन बहिणी होत्या. त्यातील एक जन्मतः अपंग.विवेक ही सगळी प्रतिकूल परिस्थिती पाहत पाहतच मोठा झाला.हातावर पोट असणारे हे कुटुंब होते.रोज कमवायचे आणि मग खायचे हा नित्यक्रम.बहिणींची शिक्षणे तर आर्थिक परिस्थितीमुळे राहूनच गेली.विवेक का मात्र शिक्षणाची प्रचंड आवड.त्यामुळे तो १० वी खूप चांगल्या गुणांनी पास झाला.
पण पुन्हा नवे संकट उभे ठाकले. अचानक विवेक च्या वडिलांना पक्षाघात झाला आणि ते कायमचे एकाजागी पडून राहिले.आई काबाड कष्ट करीत होती.एका बहिणीचे नात्यातील एका मुलाबरोबर लग्न लावून दिले.पण दुर्दैवाने तेही असफल झाले.आणि तिला पुन्हा माहेरचा रस्ता गाठावा लागला.दुसरी बहीण अपंग असल्याने फारशी काही करीत नव्हती.ही सगळी परिस्थिती पाहून विवेक खूप उदास झाला होता.हतबल झाला होता.परिस्थितीला शरण गेला होता.काय करावे हे त्याला सुचत नव्हते.कोणी आधार द्यायला नव्हते. कोणी विचारत देखील नव्हते.
आणि ह्याच स्थितीत विवेक ची अचानक ‘शोभा’ शी भेट झाली.शोभा विवेक पेक्षा मोठी होती.छान वरिष्ठ पदावर नोकरीस होती.विवेक एकदा एका झाडाखाली खूप शांत बसला होता.जवळच बस स्टॉप होता.शोभा ची गाडी आज नव्हती.त्यामुळे ती बस साठी थांबली होती.अचानक तिची नजर विवेक कडे गेली. तिचा स्वभाव तसा बोलका होता.आणि ती खुप सामाजिक देखील होती.त्यामुळे ती विवेक शी बोलू लागली.
‘”अरे तू इथे असा का इतका उदास बसला आहेस. मी काही मदत करू का?”
“काही नाही.असच.” आणि विवेक च्या डोळ्यात अश्रू तरळू लागले.
शोभा ला राहवलेच नाही .आणि ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागली.
विवेक या पूर्वी असा कोणाशीच कधीच बोलला नव्हता.त्यामुळेच कदाचित तो बोलता होऊ लागला.
“ताई,मला काय करावे काहीच सुचत नाहीये.” आणि त्याने आपली सर्व कथा शोभा ला संगीतली.तो खूप मोकळा झाला. आणि त्याचे मन देखील हलके झाले.
शोभा त्याला सांगू लागली, “विवेक तुझ्यासारखी परिस्थिती अनेकांची आहे. तू एकटाच नाही असा. तू खूप हुशार आहेस. कष्टाळू आहेस. तू काहीही करू शकतोस.ठरवले तर आकाशाला गवसणी घालू शकतोस.ह्या परिस्थितीलाच तू तुझे शस्त्र बनव आणि लढ.एक खूप चांगले कॉलेज आहे. मी तुला नंबर देते.तिथे जा आणि पुढील शिक्षण सुरू कर.हा माझा नंबर पण ठेव. काही अडचण आल्यास बिनधास्त फोन कर.
शोभा च्या बोलण्याने विवेक उठून जागा झाला.तो कामाला लागला.कॉलेज मध्ये प्रवेश मिळवला.कमवा शिकवा योजनेत काम करून घर-शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती हळू हळू बदलू लागली.विवेक ने अहोरात्र मेहनत करून स्वतःची कंपनी उघडली आणि आज तिथे १०० कर्मचारी काम करीत आहेत.विवेक ने स्वतःलाच फक्त उभे केले नाही तर त्याच्यासारखे अनेक विवेक उभे केले.रोजगार उपलब्ध करून दिला.आणि आज त्याचे कुटुंब सुखी, समाधानी आयुष्य जगत आहे.
शोभाचा विवेक आयुष्यभर ऋणी आहे.त्याच्या आयुष्यात कोणतीही चांगली घटना घडली की तो प्रथम तिलाच सांगतो.आज विवेक खूप आत्मविश्वासाने जीवन जगत आहे.
तर ही झाली, विवेक ची गोष्ट.शोभा एक निमित्त होती, खरा विवेक जागा करणारी.मात्र तिचे ते शब्द विवेक ने खूप मनावर घेतले आणि तो त्याचे आयुष्य पुन्हा नव्याने जगू लागला.इतक्या नकारात्मक परिस्थितीत देखील सकारात्मता खेचत आणत त्याने आयुष्याची लढाई जिंकली.
तर अशी जादू आहे सकारात्मकतेची.आज अनेकजण असे आहेत, जे विवेक सारखी प्रतिकूल परिस्थिती जगत आहेत.आणि त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट कधीच काहीच positive दिसत नाही.ते नेहमी नकारात्मक च विचार करतात.आणि आयुष्यात आता काहीच राहिले नाही असे म्हणत बसतात.
समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतात.पण तरी देखील प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता भरून चालत नाही.काही कटू अनुभव येतात, विश्वासघात होतात, नातेसंबंध तुटतात.म्हणून प्रत्येक वेळी आयुष्यात असेच घडणार असे नसते.आयुष्यात वेगवेळ्या फेज येतात.आणि त्या प्रत्येक फेज मध्ये आपल्याला आयुष्य जगायचे असते.मार्ग तर असतोच असतो, फक्त positivity ठेवून तो शोधावा लागतो.
‘माझे नशीबच फुटके’,’माझ्याच बाबतीत का’,’मीच काय गुन्हा केला आहे’,’हे प्रत्येकवेळी माझ्याच बाबतीत का घडते’ असे म्हणून काहीच होत नाही.जसा विवेक का शोभा च्या स्वरूपात एक नवीन दिशा मिळाली तसेच प्रत्येकाला नियती एक संधी देत असते.शांत डोक्याने विचार करून ती संधी ओळखता आली पाहिजे आणि त्या संधीचे सोने करता आले पाहिजे. मात्र यासाठी कष्ट, जिद्द हवी. आणि कमालीचा संयम हवा.
भावनांचे नियंत्रण करणे जमले की योग्य ते निर्णय घेणे सोपे होते.जे घडणार आहे ते कसेही घडते. म्हणून आपण सतत दोष देत बसण्यापेक्षा , किंवा इतरांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतः पावले उचलली पाहिजेत.कोणीच आपल्या आयुष्यासाठी जबाबदार नसते.आपण स्वतः आपल्या आयुष्यासाठी जबाबदार असतो.
जे तुमचे आहे, तुमच्यासाठी बनवले गेलेले आहे, ते तुमच्याकडून कोणीही , कधीच हिरावून घेऊ शकत नाही.ते तमच्याकडे कसेही करून , उशिरा का होईना येतच असते. फक्त कुठपर्यंत चालायचे आणि कुठे थांबायचे हे समजले पाहिजे.
आता आपण ठरवायचे की , प्रत्येक गोष्टीत negativity पाहायची की positivity….?
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
