Skip to content

प्रामाणिक आयुष्य जगुनही माझ्या मिस्टरांनी माझा विश्वासघात केला…

प्रामाणिक आयुष्य जगुनही माझ्या मिस्टरांनी माझा विश्वासघात केला…


अपर्णा कुलकर्णी


सुजाता मकरंदच्या ऑफिसमधून तडक बाहेर पडली. तिचा राग आज अनावर झाला होता. काय करू आणि काय नको अशी तिची अवस्था झाली होती. खरतर कुठेतरी जाऊन जीव द्यावा असेच तिला वाटत होते. ट्रॅफिक ने भरलेल्या रस्त्यावर सुजाता कसलाही विचार न करता भरभर चालत होती. तिची पाऊले कुठे वळत आहेत याचेही भान नव्हते तिला. समोरून गाडी हॉर्न वाजवत होती पण तो आवाज काही सुजातापर्यंत पोहचत नव्हता.

आता ती गाडी तिला येऊन धडकणार तितक्यात कोणीतरी सुजाताला बाजूला केले आणि दोघी रस्त्यावर पडल्या. सुजाताला वाचविणारी ती व्यक्ती सुजाताची घट्ट मैत्रीण निर्मला होती. तिने सुजाताची अवस्था पहिली आणि म्हणाली, काय सुजाता काय अवस्था करून घेतली आहेस ?? आणि भर रस्त्यात अशी वेड्यासारखी कुठे जात होतीस, किती आवाज दिले मी तुला आणि माझा नाही पण हॉर्नचा आवाज ही ऐकु नाही आला तुला ?? उठ पटकन म्हणून हात देऊन तिने सुजाताला उठवले पण सुजाता मात्र निर्विकार चेहऱ्याने सगळ ऐकत होती. जसं काही तिला आता झालेल्या प्रसंगाचा काहीच फरक पडला नव्हता. उन्हातान्हात कधीची चालत होती काय माहित त्यामुळे तिला चक्कर आली आणि ती पुन्हा कोसळली.

बऱ्याच वेळाने सुजाता शुद्धीवर आली. तिने डोळे उघडुन पाहिले तर समोर निर्मला उभी होती. ती शुद्धीवर आल्यावर निर्मलाने तिला जुस दिले आणि रस्त्यावर चक्कर येऊन पडल्याने मी तुला इथे घेऊन आले असे सांगितले. सुजाता बळेच जुस प्यायली. तिची अशी अवस्था पाहून सुजाताला कसलातरी धक्का बसला आहे हे निर्मलाने ओळखले होते. निर्मला सुजाता जवळ बसून म्हणाली, अशी एकटक बघत बसू नकोस, काय झालंय ते सांग मला.

सुजाताने एकदा निर्मलाकडे पाहिले आणि तिला घट्ट मिठी मारून खूप रडू लागली. बऱ्याच वेळाने सुजाता शांत झाली आणि म्हणाली, मकरंद सोबत लग्न झालं त्याच रात्री मी त्यांना माझ्या भूतकाळाबद्दल म्हणजेच अक्षय बद्दल सगळं सांगितले होते. कारण मला आमच्या नात्यात लपवा छापवी नको होती आणि नव्या नात्याची सुरुवात अगदी प्रमाणिकपने करायची होती. तुला तर सगळच माहिती होत निर्मला, अक्षय माझ्यावर किती प्रेम करत होता ते. त्याने मला लग्नाची मागणी घातली तेंव्हा सगळ्यात जास्त आनंद तर तुलाच झाला होता.

पण मला बाबांच्या मर्जिविरुद्ध काहीच करायचे नव्हते आणि म्हणूनच त्यांनी आणलेल्या स्थळा सोबत म्हणजेच मकरंद सोबत मी लग्न केले आणि त्याच दिवशी त्यांनी मला तुझा काही पास्ट असेल तर सांग म्हणाले म्हणून मी सांगितले की अक्षय नावाचा मुलगा माझ्यावर प्रेम करत होता, लग्नाची मागणी घातली होती पण मी नकार दिला.

त्यांनंतर मी कधीच अक्षय सोबत कसलाच कॉन्टॅक्ट ठेवला नाही आणि त्यानेही तसा प्रयत्न कधी केला नाही. माझे लग्न आणि नाते मी मनापासून स्वीकारले होते. मकरंद आणि माझ्यात बऱ्याच वेळा वाद होत होते पण ते होणारच म्हणून मी फार विचार केला नाही. चूक त्यांची असली तरीही वाद वाढायला नको म्हणून पटकन सॉरी म्हणुन मोकळी होत होते.

मी पण जॉब करत होते. त्यात मकरंद हिशोबाला खूप काटेकोर असल्यामुळे मी नेहमीच रुपया ना रुपयाचा हिशोब त्याला देत होते. त्याला आवडेल अशाच गोष्टी मी नेहमी करत होते.

ऑफिस मधील घडामोडी, आमचा स्टाफ सगळेच मकरंदला चांगलेच ओळखत होते. कारण त्याचे अधून मधून येणे जाणे होतेच माझ्या ऑफिसमध्ये. घरी आल्यावर पण ऑफिसमधील सगळ्या गोष्टी मी त्याच्याशी बोलत होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक छोटी मोठी गोष्ट त्याला माहित होती आणि मीच ती त्याला सांगत होते. त्याला आवडेल त्या पद्धतीने राहण्याचा, वागण्याचा नेहमीच प्रयत्न करत होते मी. त्याला कधीच कोणत्याच गोष्टीची तक्रार करण्याची संधी मी दिली नाही.

आज तो फाईल विसरला म्हणून तीच द्यायला मी त्याच्या ऑफिसमध्ये गेले तर तो त्याच्या सेक्रेटरी सोबत अश्लील चाळे करताना मी त्याला पाहिले. त्याला त्या बद्दल विचारले तर आधी खोट बोलला आणि नंतर मला म्हणाला, मी कोणाशी कसे वागायचे, कसे संबंध ठेवायचे हे तू मला सांगण्याची गरज नाही. हे माज ऑफिस आहे इथे मला तमाशा नकोय, तू जा इथून.

मी कुठे कमी पडले ग निर्मला, त्याची बायको होण्यात ?? सगळी कर्तव्ये बजावण्यात ?? तरीही त्याने अस का वागावं ?? तू मकरंद सोबत लग्नाचा निर्णय घेऊनच चूक केली होती सुजाता निर्मला म्हणाली. त्यावर सुजाता शांत झाली आणि म्हणाली, मी प्रमाणिक आयुष्य जगुनही माझ्या नवऱ्याने माझा विश्वासघात केला त्याचेच जास्त वाईट वाटते मला.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!