Skip to content

‘मी कसं वागावं’ याची केलेली जबरदस्ती लग्नानंतर कोणत्याही स्त्रीला आवडत नाही.

‘मी कसं वागावं’ याची केलेली जबरदस्ती लग्नानंतर कोणत्याही स्त्रीला आवडत नाही.


सुशांत शालन धनाजी काळे


‘मी कस वागावं’ यानुसार स्त्रीला विवाहानंतर जबरदस्ती केली जाते. आपला भारत देश हा पुरुषप्रधान संस्कृतीचा आहे. आपल्या देशावर पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा असल्याने विवाहापूर्वी तसेच विवाहानंतर मुलीने,स्त्रीने कसे वागावे याचे सर्व अधिकार पुरुषाकडेच असलेले पाहिले आहेत. विवाहापूर्वी पुरुष कसा वागतो आणि विवाहानंतर पुरुष कसा वागायला हवा हे कुणीच पाहत नाही. परंतु ज्यावेळी स्त्रियांची बाजू मांडली जाते तेव्हा त्या बाबीला कमी महत्व दिल जात आहे.

लग्नानंतर प्रत्येक स्त्रीला वाटत की,माझ्यावर माझ्या पतीचा,सासू सासरे नातेवाईकांनी मी कस वागायला हवं याची जबरदस्ती असू नये. विवाहापूर्वी मुलींना शैक्षणिक,सामाजिक ठिकाणी किती स्वतंत्र दिले जाते हे आजही माहित नाही. ते असत तर तिने कस वागावं हा प्रश्नच उदयाला आला नसता. बऱ्याचदा विवाहाआधी असलेली गरिबी, काबाडकष्ट,काहींचे तर शिक्षण घेत पार्ट टाईम जॉब अशी दुहेरी मेहनत करणाऱ्या मुली या समाजात आहेत. लग्न करण्यासाठी चांगलं सासर मिळावं जेणेकरून तिथं स्वच्छंदी राहता येईल. पण आपण म्हणतो तस होतच नाही. मग अगदी ते जीन्स घालण्यापासून ते स्लिव्हजलेस ब्लाऊज घालण्यापासूनचा विरोध कोणत्याही स्त्रीला आवडणार नाही ;पण अशी कपडे घालणाऱ्या स्त्रियांचे राहणीमान संस्कृतीबाह्य आहे अशी काही लोकांची मानसिकता तयार झाली आहे.

स्वच्छंदी राहण,मुक्त बागडण हे नैसर्गिक किंवा साहजिकपणे कोणत्याही स्त्रीला आवडू शकते. परंतु घराणेशाही, त्यांचे ठराविक ठरलेले नियम हेच नियम त्या घराच्या सूनेस देखील आपोआप लागू होतात. मग ते काहीही असू शकतात. बऱ्याचदा एखाद्या मुलीचे शिक्षण झाले असले तरीही तिला नोकरीसाठी पाठवले जात नाही. नवीन विवाह झाल्यावर त्या जोडप्यांची व्यवस्थित ओळख व्हावी एक घट्ट नातं तयार व्हाव.

परंतु सासरची लोक मूलबाळ यासाठी लगेच मागणी करतात त्यासाठी तिची मानसिकता नसतानाही जबरदस्ती केली जाते हे कोणत्याच स्त्रीला आवडेल अस नाही. ज्या नात्यात शंका असेल ते नात टिकू शकत नाही. स्त्रियांनाही तेच वाटत की नात्यात शंका नसावी जबरदस्ती नसावी याचं कारण म्हणजे विश्वास. विश्वास असलेल्या नात्यात कधीच कोणत्या स्त्रीवर जबरदस्ती होत नाही. तरीही जर तिच्यावर ‘तिन कस वागावं ‘ हे जर कुणी ठरवणार असेल तर साहजिकच आहे कोणत्याच स्त्रीला ते आवडणार नाही.

विवाहापूर्वी बऱ्याचशा बाबी वेगळ्या असतात आणि विवाहानंतरही बऱ्याचशा बाबी वेगळ्या असतात. यामुळे लग्नानंतर त्या स्त्रीला सासरच्या लोकांनी सांगावे, समजून घ्यावे असे प्रत्येक विवाह झालेल्या स्त्रीला वाटत असते. माहेर म्हणजे स्त्रीसाठी एक कम्फर्ट झोन असतो. सासर हे नवीन असल्याने तिथल्या काही बाबी तिला माहिती नसतात. लग्न झालं मुलगी सासरी गेली म्हणजे सासरच्या लोकांनी मालकी हक्क स्वीकारला अस होत नाही.

तिन मुलाला कधी जन्म द्यायचा म्हणजे यात तिची इच्छा आणि तिच्या आयुष्याचे नियोजन तिचा संसार हे सर्व तिझाच अधिकार आहे. म्हणून साहजिक आहे की विवाहानंतर स्त्रीला तिच्या निर्णयाशिवाय जबरदस्ती केली तर मुळीच आवडणार नाही.

रांधा वाढा उष्टी काढा म्हणजे पुरुषाने यात मदत केली म्हणजे स्त्री सुखी असते एवढं नाही. तर पुरुष याचसह स्त्रीच्या किती अंतःकरणात जाऊन पोहोचतो हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. सासर हे नवीन नवरीला नवीनच असते. यामुळे येथे तिला सर्व बाबींचा अंदाज यावा आणि यासाठी वेळ लागतो. कोणत्याही गोष्टी झटपट होत नाही. काही गोष्टी झटपट केल्या तर त्या बाबी स्त्रीला जबरदस्ती वाटते.

जबरदस्तीतून केलेल्या कामाचा मालकी हक्क सासरच्या मंडळींकडे असतो. त्यात ती फक्त मोलकरणी,स्वयंपाक करणारी गृहिणी म्हणूनच ओळखली जाते. तिला यापलीकडे जाऊन आपली ओळख करायची असते. पण तस होत नाही. यामुळेच तिला जबरदस्तीच वाटणार. तीच जगणं,तीच भोगन, चांगल – वाईट हे तिलाच कळत असत. मग तिझ्याच आयुष्यावर इतर कुणीतरी जबरदस्ती कशी कोण करेल? हा देखील मुद्दा त्याठिकाणी उपस्थित होतो.

आपण भारतात स्त्री पुरुष समानता मानतो. मग पुरुषांवर का कुणी जबरदस्ती करत नाही. मुलगा जरीही दारू प्यायला तरीही घराण्याची इज्जत जायला हवी परंतु मुलगा या नावाखाली पुरुषप्रधान संस्कृतीचे तूनतूने वाजवले जात आहे. हेच स्त्रीला खपवून घ्यावे लागते. मोबाईल वापरणे, सोशल मीडियाचा वापर करणे यावरही बंदी घातली जाते. ज्यापद्धतीने इतर बाहेर होणारी विवाहानंतरची प्रेमप्रकरण या ठिकाणी विश्वासच ही बाब मॅटर करते.

तसेच पुरुषांप्रमाणे तिची आर्थिक,लैंगिक बाब देखील या ठिकाणी पुरुषाने समजून घेणं गरजेचं आहे. स्त्रीलाच का काचेच भांड म्हणतात? पुरुषांना का म्हणत नाही असा कधी कुणाला प्रश्न पडला नाही. एवढेच नाही तर चारित्र्य म्हंटल की स्त्री ही बाब पुढे येते, घटस्फोट म्हटल की स्त्री आणि आब्रू ही बाब पुढे येते. तरीही समाजान तिनच कस वागावं हे का ठरवावं अस प्रत्येक स्त्रीला वाटत असत. परंतु ही बाब कुणाच्याच लक्षात येतच नाही.

आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो. हीच जबरदस्ती लग्नानंतर स्त्रियांच्या आयुष्यात पुरुषांच्या तुलनेत अधिक दीसते.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “‘मी कसं वागावं’ याची केलेली जबरदस्ती लग्नानंतर कोणत्याही स्त्रीला आवडत नाही.”

  1. हो मात्र नवऱ्याने आपल्या इच्छेनुसार च वागावे अशी स्त्रीची हुकमी इच्छा असते

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!