Skip to content

एकमेकांना नापसंत असणारे नवरा-बायको आणि त्यांच्यातील शारीरिक संबंध.

एकमेकांना नापसंत असणारे नवरा-बायको आणि त्यांच्यातील शारीरिक संबंध.


टीम आपलं मानसशास्त्र


आपल्या भारतीय संस्कृती मध्ये लग्न, विवाह हा एक संस्कार मानला गेला आहे.

बरेचवेळा arrange marriage मध्ये नवरा बायकोची पसंती राहते बाजूला पण घरातले पसंती देवून सगळे व्यवहार ही पूर्ण करतात. उपवर मुलगा मुलगी यांना काहीच मते मांडता येत नाहीत. त्यांच्या निवडी चे ही कुठे प्रश्न येत नाहीत. किंवा जर एकमेक नापसंत असतील तरी वडीलधारी मंडळी लग्न लावून रिकामी होतात. त्यांना वाटते लग्न केले की एकमेक सोबत संसार करणारच.

पण त्यांच्या हे लक्षात येतं नाही की मुलाला आणि मुलीला त्यांची पसंती , आवड निवड ही असते. किंवा कधी एक दोन वेळा बघणे , बोलणे यातून आयुष्य भरसाठी लग्नाच्या बंधनात बांधले जाते आणि एकमेकांना हळूहळू समजू लागल्यावर काही लोकांचे जमते ही. पण काही नवरा बायकोची एकमेकांच्या विषयी नापसंती च वाढते.

एकमेकांना नापसंत असणारे नवरा-बायको तरीही कायम एकत्र राहतात कारण काय तर आपला समाज, नातेवाईक आणि कायद्याच्या कटकटी अजूनही तेवढे प्रगत नाहीत. परदेशात कसे नाही जुळले , नाही पसंत पडले , सुरुवातीला चांगली असणारी नाती नंतर काही कारणाने बिघडली तरी एकमेकांच्या सहकार्याने आणि संमतीने एकमेकांच्या पासून आनंदाने दूर होणारी , विभक्त होणारी दाम्पत्य आहेत.

कारण जर एकमेकांची नापसंती असेल, आवडी निवडी वेगळ्या असतील , तर मनाविरुद्ध एकत्र राहण्यापेक्षा एकमेकांना त्यांचे आयुष्य मुक्तपणे जगू देतात. पण आपल्या इथे मात्र अनेक बंधने लादली असतात. त्यामुळे एकमेकांची नापसंती असेल तरी adjust करत, sacrifise करत आयुष्यभर adjust करत घालवायची.

एकमेकांना नापसंत असणारे नवरा-बायको आणि त्यांच्यातील शारीरिक संबंध.हा तर अजून गंभीर विषय आहे. इच्छा नसताना , आवड नसताना , नापसंत असताना ही केवळ एकत्र राहतात म्हणून शारीरिक संबंध प्रस्थापित केले जातात. त्यात कुठेही आवड , आपलेपणा नसतो.

केवळ कायदा आणि नातलग यांना दाखविणे . आणि या व्यतिरिक्त मानसशास्त्रीय दृष्टया विचार करता जसे अन्न , पाणी , भूक , झोप या आत्यंतिक महत्वाच्या आणि गरजेच्या मूलभूत गरजा आहेत तसे सेक्स ..किंवा शारीरिक संबंध ही एक मूलभूत गरज मानली गेली आहे. आणि ती ही या गरजांच्या सारखी पूर्ण केली जाते. मग भुकेच्या क्षणी जसे पटकन खाण्यासाठी काही ही चालते. तसे शारीरिक गरज पूर्ण करण्याकरिता ही .आणि याच गरजा पूर्ण करत असताना त्यातून नैसर्गिक गोष्टी होत असतात जसे मुलांचे जन्म.

आणि बरेचवेळा मुलांचे जन्म झाले की अशा एकमेकांना नापसंत असणारे नवरा-बायको यांच्यामध्ये असणारे शारीरिक संबंध ही संपुष्टात येतात कधी मुलांची कारणे काढून किंवा त्यांच्यात व्यस्त असे दर्शवून .

तर एकमेकांना नापसंत असणारे काही नवरा बायको मात्र आयुष्यभर मनाविरुद्ध हे शारीरिक संबंध ठेवत असतात.

तर काही मात्र आयुष्यात नापसंती च असणार हे स्वीकारून आहे त्यात जे मिळते त्या शारीरिक संबंधात समाधान मानणारे असतात.

तर एकमेकांना नापसंत असणारे नवरा-बायको काही काही जण मात्र कधीच तडजोड करत नाहीत. एका घरात राहत असूनही त्या नवरा बायको मध्ये काहीही शारीरिक संबंध निर्माण होत नाहीत. केवळ कर्तव्य म्हणून आणि घरतल्या मोठ्यांच्या निर्णयाविरुद्ध काहीही करू शकत नसल्याने , कायद्याच्या कटकटी नकोत म्हणून एका घरात राहून ही आयुष्यभर ब्रह्मचारी असल्यासारखे जीवन व्यतीत करणारी जोडपी ही आहेत.

तर काही जोडपी आशावादी आहेत. आजचे वास्तव स्वीकारले आहे ते म्हणजे नापसंती. परंतु उद्या मात्र काही चांगले घडेल या आशावादी विचारातून एकमेकांच्या सोबत सकारात्मक व्यवहार करणारे आणि शारीरिक संबंध अधिकाधिक चांगले निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे ही आहेत.

प्रत्येक नवरा बायकोचे हे वर्तन भिन्न असते. त्यांच्या आजूबाजूचे वातावरण, एकमेकांच्या सोबत येणारे अनुभव यातून त्यांचे विचार पुढे जात असतात. वैचारिक प्रगल्भता आणि त्यातून कृती ही घडत असते.

काही जण आपल्या वर्तनाचा इतरांना त्रास होवू नये याची काळजी घेतात. तर काही वेळेस हेच दांपत्य छोट्या छोट्या गोष्टी , प्रसंगातून एकमेकांच्या विरुद्ध ची नापसंती दर्शवित असतात. पण बहुदा एकमेकांना नापसंत असणारे नवरा-बायको आणि त्यांच्यातील शारीरिक संबंध हे फारसे काही चांगले नसतात.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!