Skip to content

एकमेकांसोबतची जवळीक टाळण्यासाठी पती-पत्नी या युक्त्या वापरत असतात.

एकमेकांसोबतची जवळीक टाळण्यासाठी पती-पत्नी या युक्त्या वापरत असतात.


टीम आपलं मानसशास्त्र


एकमेकांसोबतची जवळीक साधणारे पती _ पत्नी ही अनेक असतात. आणि ते जवळ राहण्याकरिता म्हणून अनेक युक्त्या वापरत असतात.

तर असेही पती – पत्नी आहेत जे एकमेकांसोबतची जवळीक टाळण्यासाठी या युक्त्या वापरत असतात. याची कारणे काय तर एकमेकांचे न पटणे , सतत आपल्या अधिकाराखाली , आपण म्हणू तसे वागावे , dominating स्वभाव असतो, शारीरिक संबंध तेवढे चांगले नसणे , उणिवा असणे , कोणाचे तरी बाहेर संबंध आहेत असा संशय, एखाद कोणी अधिकारी पदावर असेल तर घरी ही तसेच वागल जाते त्यामुळे ही सतत तो दबाव नको वाटतो, एखाद्याचा खूप संकुचित स्वभाव असतो, कोणाला किती ही केले तरी समाधान नसते, शांतता नसते, इतरांशी तुलना करण्याचे स्वभाव असतात.

एकमेकांसोबतची जवळीक टाळण्यासाठी पती-पत्नी या युक्त्या वापरत असतात. त्या कोणत्या ते बघुयात :

१. घरी वेळेत येणे टाळणे : घरी वेळेत आलो तर समोरा समोर जास्त काळ थांबावे लागेल. म्हणून उशिरा यायचे जेवण करून लगेच झोपून टाकायचे.

२. काही तरी कारणे काढून सतत बाहेर राहणे , टीव्ही , ऑफिस काम घरात ही करणे : काही तरी कारणे काढून सतत बाहेर राहणे , बाहेर एवढ्या तेवढ्या कामासाठी जाणे , शेजारी पाजारी जाणे ,किंवा काहीच नसेल तरी ही ऑफिस काम करण्यात मग्न राहणे.

३. पती पत्नी एकत्र झोपत असतील तर ज्याला टाळायचे तो / ती मुद्दाम उशिरा येवून जोडीदार झोपला आहे याची खात्री करून मग येवून झोपणार.तर मुद्दाम एकत्र झोपणे टाळणार.मग मुलांच्या सोबत , किंवा बाहेर हॉल मध्ये झोपणार. किंवा दुसऱ्या खोलीत झोपणार. जेणेकरून एकमेकांच्या सोबत जवळीक येणार नाही याची खबरदारी घेणार.

४. एकमेक एकत्र कुठे जायचे असेल , एखादे लग्न , बाहेरगावी , जवळपास कुठे तर सुट्टी नाही , काम आहे असे सांगून किंवा इतर कोणाला सोबत घेवून जा असे सांगून सोबत जाणे ही टाळत असतात.

५. बरेचवेळा एकमेकांच्या सोबत बोलणे ही टाळतात. कारण बोलण्यातून ही जवळीक नको. मग काही बोलायचे असेल तर मुलांच्या कडून , घरातल्या आई वडिलांच्या कडून , सासू सासऱ्यांच्या कडून निरोप दिले जातात. तेही एकमेकांना समजतील असे. जसे आई मुलांना सांगते बाबांना जेवायला वाढले सांगा , बाहेर जाणार असतील तर भाजी घेवून येण्याची आठवण करा, बाबा मुलांना सांगतात की आईला सांगा रात्री मी जेवणार नाही.मित्रांच्या सोबत बाहेर जाणार आहे. किंवा रात्री मी जेवायला नाही एवढेच.

६. तुटक वागणे :- एकमेक अगदी वैरी असल्यासारखे तुटक वागतात. जेणेकरून परत कधीच त्यांना एकमेकांची तोंड ही बघायची नाहीत.

७. आपले आर्थिक व्यवहार , मित्र मैत्रिणी यांच्या विषयी काही ही माहिती शेअर न करणे.

८. शारीरिक संबंध , स्पर्श , बोलणे या पासून दूर राहतात: एकमेकांना टाळायचे असेल तर शारीरिक संबंध , स्पर्श , बोलणे , संवाद या पासून अलिप्त राहतात.

९. भावनिक अलिप्तता : जोडीदाराचे काही होवो , त्रास होत असेल, आजारी असेल, व्यवसायात नुकसान , नोकरी जाणे असेल , किंवा साधे रोजचे जेवण खाण , कपडे या कशाची फिकीर न करणे. कोणत्याच भावना व्यक्त न करणे , भावनिकदृष्ट्या अलिप्त राहणे. जेणेकरून जवळीक होणार नाही अशी वर्तणूक.

१०. एकमेकाला कोणताच support न करणे : आर्थिक दृष्ट्या भार न उचलणे , कर्तव्य पार न पाडणे, मग नवरा असा वागेल की मुलांच्या जबाबदाऱ्या बायकोच्या आहेत तिने ते कसेही बघावे. मी पैसे टाकले की संपले. तर कधी नवरा पैसे ही देणार नाही बायको चे बायको बघून घेईल अशी बेफिकीर वृत्ती, घरकाम बायको करते म्हणून बाहेरून नवऱ्याने आणून दिले तर ती स्वैपाक करेल नाही तर बसून राहील. किंवा नोकरी करणारी असेल तर कामाला बायका लावेल आणि खर्च वाटून घेतील अथवा नवऱ्याला दे सांगेल. तुझे घर आहे.

घर ही एका कोणाच्या नावे असेल तर मला काय करायचे कसे का असेना. आपल्या गोष्टी व्यवस्थित ठेवल्या संपल्ये. बाकी कसे ही का असेना.

११. सुट्टी दिवशी ही बाहेर राहणे , मित्र मैत्रिणी , सहली , बाहेर जेवण खाण, नातेवाईक यांच्याकडे जाणे. बाहेर शॉपिंग , मॉल मध्ये जाणे. जाताना उशीर होईल सांगून जाणे अथवा काहीच न सांगता बाहेर पडणे. जोडीदार काय खाईल याची ही काळजी नसते. केवळ स्वतः चा विचार असतो.

१२. एकमेकांची पर्वा ही करत नाही. बेफिकीर वृत्ती : नातेवाईक यांच्या बरोबर ही दुरावा ठेवला जातो. दुर्लक्ष करण्याची वृत्ती असते.

एकमेकांसोबतची जवळीक टाळण्यासाठी पती-पत्नी हे सुरुवातीला अनेक युक्त्या वापरत असतात. पण हळूहळू एकमेकांना ते समजू लागते. जसे एक दोन वेळा , दहा वेळा त्याच त्याच गोष्टी घडल्या जसे नवऱ्याने बायकोला जवळ घेण्याचा प्रयत्न केला , शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला , तशी वातावरण निर्मिती तरी बायको दूर राहते , त्याला प्रतिसाद देत नाही, किंवा खूप झोप आली असे सांगून टाळते, तर कधी उद्या लवकर उठायचे धावपळ आहे असे सांगून टाळते, त्तर खूप झोप आल्याचे साँग करून झोपून टाकते. दुसरीकडे तोंड फिरविणे , किंवा दुसऱ्या खोलीत झोपणे या सगळ्यातून हळूहळू आपला जोडीदार आपल्याला टाळत आहे हे लक्षात येते आणि नंतर दोघांच्या कडूनही खूप सहजरीत्या एकमेकांना टाळले जाते.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on “एकमेकांसोबतची जवळीक टाळण्यासाठी पती-पत्नी या युक्त्या वापरत असतात.”

  1. असाच काहीतरी माझा सोबत पण होतंय पण ते बहेर गावी असतात,बोलणे टाळतात

  2. Achuk nirikshan kiva kalpana keli aahe. Pan job kiva khup kamanmule ya goshti ghadat astat.kadachit parspar samnjasyanehi ghadtat.

  3. Priyanka patankar

    Chan vatla tumcha Lekh mala pan as tar bharpur lokanchya babtit ghdat aste mag kasa vishwas karaych.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!