Skip to content

प्रत्येकाच्या वैवाहिक आयुष्यात काहीना काही समस्या असतातच.

प्रत्येकाच्या वैवाहिक आयुष्यात काहीना काही समस्या असतातच.


टीम आपलं मानसशास्त्र


मनुष्य म्हणले की काही ना काही समस्या या त्याच्या आयुष्यात असतातच. कौटुंबिक , आर्थिक , व्यावसायिक , सामाजिक , कायदेशीर अनेक समस्या त्याच्याशी निगडित असतात .

तसेच प्रत्येकाच्या वैवाहिक आयुष्यात काहीना काही समस्या असतातच.त्या समस्या अनुक्रमे बघुयात.

१. लग्न झाल्यावर सुरुवातीला येणाऱ्या समस्या :

लग्न झाल्या झाल्या नक्कीच कोणी खूप छान सेटल नसते. आधी आर्थिक जबाबदाऱ्या ही तेवढ्या नसतात. एकाचे दोघे झाले की घरखर्च , वाणी सामान , कधी गरजेच्या वस्तू , कपडे , औषधे यांचे खर्च एकदम वाढतात. ते हळूहळू manage करण्याची सवय लागते. तर सुरुवातीला अचानक चे होणारे खर्च प्रवास , दोघांच्या आवडी निवडी जपताना होणारे खर्च, कधी सिनेमा ,बाहेर फिरायला जाणे असे थोडे थोडे खर्च वाढत जातात.

जबाबदाऱ्या वाढत जातात. जसे वेळेची बंधने , ऑफिस मधून ,. बाहेरुन वेळेत घरी येणे, कधी उशीर होणार असेल तरी आधी सांगावे लागते. न सांगता उशीर झाला तर चिडा चिडी , रुसवा फुग्वा , वाद यातून मानसिक ताण ही वाढतो.

शिवाय दोघानाही एकमेकांच्या घरच्यांच्या सोबत जमवून घेताना सुरुवातीला येणाऱ्या अडचणी, दोन्ही घरातल्या लोकांचे स्वभाव समजून घेणे , तसे वागणे. हे तर करावे लागते. त्यातून ही थोडे मतभेद होत असतात. तरी एकमेकांना सांभाळून घेवून पुढे जावे लागते.

सुरुवातीला शारीरिक संबंधांमध्ये ही तेवढी मोकळीक नसते. काही त्रास होत असतील तरी तसे मोकळेपणे बोलले जात नाही. पण मग अंतर ठेवले जाते. तर कधी कोणाच्या मध्ये काही उणीवा असण्याची शक्यता असते. त्यावर वेळीच योग्य वैदयकीय सल्ला आणि उपचार घेणे गरजेचे असते. नाही तर दोघांच्या मध्ये शारीरिक संबंध हे समाधानकारक राहत नाहीत.

२. विवाहानंतर तशा अनेक छोट्या मोठ्या समस्या असतातच. एकत्र कुटुंब असेल आणि जागा लहान असेल , किंवा नसेल तरी एकमेकांच्या मध्ये मोकळेपणा मिळत नाही. सतत इतरांना घाबरून गोष्टी केल्या जातात. सतत मनावर दडपण राहते त्यातून .

तर कधी विभक्त कुटुंबामध्ये ही जागेचा प्रश्न असतो. मुलांचे प्रश्न असतात. नवरा बायको दोघांना निवांत वेळ आन जागा ही मिळत नाही.. त्यातून ही दोघात मोकळीक निर्माण होत नाही.

मुलांना घाबरून किंवा मुलांनी बघितले तर काय असे विचार करून शारीरिक संबंधांवर ही बंधने येतात.

त्यातून चिडचिड होत राहते. किंवा असमाधान वाढत जाते.

३. वैवाहिक आयुष्यात कधी पती साथ देत नाही तर कधी पत्नी साथ देत नाही. कधी एका कोणाला आवड नसते. त्यातून मग दुसऱ्याला कायमच तडजोड करावी लागते. मन मारून जगावे लागते.

४. वैवाहिक जीवनात एकमेकांवर विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच एकमेकांविषयी respect. आदर असणे गरजेचे.

कधी ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणीं स्त्री पुरुष एकत्र काम करत असतात. तसे त्यांच्यात काही नसते. पण बराच काळ एकत्र असतात त्यामुळे आणि कामाचा वाढता स्ट्रेस असेल तर त्यातून तणाव हलका होण्यासाठी , तर कधी मार्ग शोधण्यासाठी , नवनवीन ideas , या विषयी चर्चा होत असतात . प्रोग्रेस होत असतो. अशावेळी सतत एकत्र असणाऱ्या स्त्री पुरुष महिला यांच्याविषयी ऑफिस मध्ये ही कुजबुज होते. शंका घेतली जाते. तर घरी असताना कामाच्या फोनवर चर्चा , सुट्टी दिवशी ही कामानिमित्त भेटणे यातून घरच्यांचा स्त्री असो अथवा पुरुष यांच्यावरचा विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे नवरा बायको यांच्या वैवाहिक संबंधांमध्ये अडचणी निर्माण होतात

५. वैवाहिक आयुष्य सुखाचे नसेल तर बाहेर मित्र मैत्रिणी, जवळच्या व्यक्ती ऑफिस मधले सहकारी यांच्या मध्ये मैत्री आणि त्यापेक्षा ही पुढे जावून संबंध निर्माण होतात.

त्यातून ते घरी समजायला नको.म्हणून चोरून असतात. कधी मुलांच्या वर वाईट परिणाम होवू नयेत म्हणून कोणा एकाला सहन करावे लागते. गप्प बसावे लागते.

६. कधीं नोकरी निम्मित परगावी , परदेशी जावे लागते. अशावेळी सगळ्यांनाच घेवून जाणे शक्य नसते. किंवा काही कालावधी नंतर इतरांना घेवून जाणे शक्य असते. अशावेळी काही त्याग करावे लागतात. दुरावा येतो.

वेळप्रसंगी परदेशी असलेल्या जोडीदाराला येता ही येत नाही. खुप मोठे sacrifise करावे लागते.

७. जोडीदाराचे न पटणे त्यातून. वाद , विवाद तर कधी घटस्फोट ही घेतले जातात. पण यात मनस्ताप ही तसाच सहन करावा लागतो. एवढी वर्ष एकत्र राहिल्यानंतर पटवून किंवा जमवून नाही घेतले , तरी समाज , घरचे, मित्र मैत्रिणी यांच्या समोर च एकमेकांवर दोषारोप करत कायदेशीर विभक्त व्हावे लागते. जर ते नको असेल तर एकमेकांपासून कायम दुरावा पत्करावा लागतो.

८. पती पत्नी दोघे ही काम करणारे असतील तर कामातून एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नाही. त्यातून अंतर निर्माण होते. समस्या निर्माण होतात.

त्यातून मुलांच्या जन्मानंतर बायको तेवढा पुरेसा वेळ किंवा लक्ष जोडीदाराकडे देवू शकत नाही. त्यांना मर्यादा असतात. त्यामुळे दोघांच्यात अंतर निर्माण होते.

९.पती पत्नी मधील संवाद कमी पडणे किंवा नसणे :

असे जर असेल तर मतभिन्नता ही असते. संवादाची कमतरता असल्याने गोष्टी मोकळेपणाने बोलल्या जात नाहीत.

तर कधी पती पत्नी इतरांच्या सोबत तुलना करत असतात मग वस्तू. , पैसा असेल किंवा नातेसंबंध . त्यातून ही अनेक समस्या निर्माण होतात.

एखाद्या जोडीदाराला नाविन्याची आवड असते. तर दुसरा जोडीदार त्या विरूद्ध नाविन्याची आवड नसणारा , अरसिक त्यातून ही एकमेकात अंतर येते.

वैवाहिक जीवन हे तसे खूप गुंतागुंतीचे. असे म्हणतात की शादी का लड्डू खाये वो पछताये और जो ना खाये वो भी

पछताये! पण वैवाहिक आयुष्यात अडचणी येणार , adjustment करावी लागणार हे नक्की .तर काही वेळेस नाते संबंध सुधारण्यासाठी योग्य मार्गदर्शन , सल्ले घेणे गरजेचे ठरते.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!