Skip to content

आपण खूपच युजलेस आहोत , काहीही करू शकत नाही , या विचारांना कसं बदलायचं ?

आपण खूपच युजलेस आहोत , काहीही करू शकत नाही , या विचारांना कसं बदलायचं ?


गीतांजली जगदाळे

(समुपदेशक)


होपलेस पेक्षा युजलेस वाटणं जास्त त्रासदायक आहे. Hopelessness म्हणजे काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि त्याबाबतीत काहीच करता येत नाही याचा त्रास होण.पण Uselessness हे डायरेक्ट आपल्यावर बोट् उचलून आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो. युजलेस या भावनेने पूर्ण आत्मविश्वास कोलमडून पडतो. आपण कशातच चांगले नाही आहोत , काहीच करू शकत नाही या भावना मानसिक खच्चीकरण करणाऱ्या आहेत.

युजलेस वाटण्याची बरीच कारणे असू शकतात. शिक्षण , इनकम , स्वास्थ्य , कुटुंब इत्यादी या भावनेला कारणीभूत ठरू शकतात. उदाहरणार्थ , तरुण वयात एखाद्याला खूप काळ नोकरी मिळत नसेल तर त्याला युजलेस वाटू शकतं .

एकटेपणा ही अशा भावनेला पूरक ठरतो. आपल्यामुळे या जगात कोणाचंही काहीही अडत नाही , आपण असलो काय आणि नसलो काय सारखंच! असे विचार मनात थैमान घालू लागतात . पण हे विचार फक्त आपल्याच डोक्यातले असतात , रिऍलिटी मध्ये असं काहीही नसतं. त्यामुळे या अशा भावना फार मनावर घेता कामा नये. या आणि अशा भावना बदलण्यासाठी आपण पुढील उपायांची मदत घेऊ शकतो.

१. युजलेस या भावनेचं ‘मूळ’ शोधून काढणे- युजलेस ही भावना कुठून आणि का येतीये हे शोधणं ही पहिली आणि महत्वाची पायरी आहे. कोणत्या घटनेनंतर , किंवा एखाद्या नात्यामुळे , एखाद्या अपयशानंतर , किंवा आपला या समाजाला उपयोग होत नाही अशा कोणत्या भावनेने हि सुरुवात झाली का हे शोधावे. Problem च मुळ कळलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सोप्प जातं .

विचार करून सुद्धा हे समजत नसेल तर डायरी मध्ये लिहून काढा. आपण जेव्हा लिहितो तेव्हा सगळे गोंधळ क्लिअर होतात. किंवा एखाद्या विश्वासू मित्राशी बोलून बघा. बोलता -बोलता आपल्यालाच आपली उत्तरे ही मिळून जातात आणि काय चुकतंय हे ही.

२. तुमचं पॅशन शोधा- तुम्ही कशात चांगले आहेत हे शोधा . त्यासाठी वेगवेगळे छंद try करा , नवीन पुस्तके वाचून पहा. त्यातून काही नवीन आयडिया मिळू शकतात. तुम्हाला कशाने आनंद मिळतो ती गोष्ट करा आणि त्याचा इतर लोकांना कसा फायदा किंवा मदत मिळेल हे बघा , म्हणजे तुम्हीही या जगात कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तुमचं योगदान देऊ शकता याची तुम्हाला खात्री होईल.

३. रोज एकतरी छानशी गोष्ट करा- तुमची कृती , कितीही लहान असूद्यात पण थोडासा का होईना चांगला फरक पडेल अशी असूद्यात . एखाद्याला मदत करणे , गरजू व्यक्तीला अन्न देणे , आपल्या मित्राची किंवा कुटुंबातील व्यक्तीची त्याच्या कामात मदत करणे आणि त्यांचं काम हलकं करणे. या छोट्या- छोट्या गोष्टीतूनच आपण ही उपयोगी आहोत ही भावना येते.

४. आपल्या आयुष्यात असणाऱ्या चांगल्या गोष्टींची यादी करा- निरोगी शरीर , घर , कुटुंब , अन्न , चांगले मित्र , नोकरी , पैसे शिक्षण इत्यादी गोष्टींसाठी आभार माना. आपल्याकडे काय नाही आणि काय पाहिजे याची लिस्ट कशी लगेच आठवते तशीच काय काय आहे याचीही आठवली पाहिजे.

५. स्वतःशी आरशात पाहून सकारात्मकतेने बोलायला शिका – रोज मोडून ५ मिनिटे काढून आपण स्वतःशी संवाद साधला तर त्याचे परिणाम तुम्हाला लवकरच जाणवायला सुरुवात होईल.

६. चालढकल करणं बंद करा- कोणतंही काम पुढे न ढकलत वेळच्या वेळी करायला शिका. कामे पुढे ढकलत राहणे हे ही अपयशाचं एक् कारण असत. आणि त्यामुळे ही युजलेस ही भावना येते.

७. स्वतःकडे लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या – आपल्या जवळच्या माणसांची काळजी घेणं जसं आपल्याला महत्वाचं वाटत तसेच आपली स्वतःची काळजी घेणं हि महत्वाचं आहे. स्वतःच्या वेळेची किंमत करायला शिका आणि आत्मविश्वास कसा वाढेल याकडे लक्ष द्या.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!