Skip to content

“कोणीही टॅलंटेड बनू शकतो का ?

“कोणीही टॅलंटेड बनू शकतो का ?


निलेश काळे

उद्योगनिती बिझनेस कन्सलटंट*
किल्ले धारूर , जि .बीड
Whatsapp/ 9518950764


“story of Polgar Sisters”

टॅलेंट … या शब्दाला आपल्याकडे प्रचंड महत्व आहे .
जास्त टॅलेंट = जास्त चांगलं शिक्षण = जास्त चांगला जॉब = श्रीमंती

म्हणजेच

टॅलेंट = श्रीमंती , हे तत्व सगळीकडे मानलं जातं , पण विषय असा आहे कि , कोणतीही व्यक्ती टॅलंटेड बनू शकते का ?

तर याचे उत्तर आहे ….. हो !

तर ही स्टोरी आहे एका कुटूंबाची !
तसं दंगल सिनेमात फोगाट बहिणींच्या यशाची कहाणी आपण बघीतलीच आहे .
तसंच काहीशी ही स्टोरी आहे असं समजा .

हंगेरी या छोटया शा युरोपीयन देशात Leszlo Polgar नावाचा युवा शिक्षक आणि लेखक होता , त्याने एका पुस्तकातून थेअरी मांडली कि , मुलांना अथवा असं म्हणा कोणत्याही हेल्दी व्यक्तीला एखादया क्षेत्रात जिनीयस बनवणे शक्य आहे .

पण लोकांनी त्याच्या पुस्तकाचा आणि थेअरी चा उपहास केला , थट्टा टिंगल किंवा टवाळी या लेवल पर्यंत त्याची मस्करी झाली .

आता Leszlo ची पंचाईत झाली .

ते त्या वेळी अविवाहीत होते , म्हणून त्यांनी ठरवले कि , आपल्या अजून न जन्मलेल्या मुलांना जिनीयस बनवायचे

आता त्यांनी प्रपोज करणारी पत्रे पाठवायला चालू केली आणि कार्ला नावाच्या एका युक्रेन मधील युवतीने लग्नाला संमती दिली .
पण या पठ्ठ्याने तिला सर्व बाब अगोदरच सांगितली होती .

एखादी व्यक्ती आपली थेअरी सिद्ध करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते याचे हे पॉजीटीव उदाहरण आहे .

त्यांना पहिली मुलगी झाली1969 मध्ये Susan Polgar
बरं आता थेअरी सिद्ध करायची वेळ चालू झाली आणि चालु झाला , मानवी शिक्षण क्षेत्रात Amazing ठरणारा प्रयोग .
Laszlo ने Chess हे क्षेत्र निवडलं ,, कारण त्यांना त्यातलं थोडंफार कळत होतं , इथे थोडंफार मुद्दाम लिहीलय .
मुलगी मोठी होऊ लागली तस _ तसं Laszlo ने “चेस कसा शिकवायचा ” याचे स्वतः शिक्षण घेतले , आणि Susan ची ट्रेनिंग चालू झाली .

दोघं _ बाप – लेक चेस ची प्रॅक्टीस करत असत , असं करता – करता .
त्यांनी Susan ला वयाच्या चौथ्या वर्षी लोकल स्पर्धत उतरवले , जिथे किमान क्वालिफाय करणाऱ्या मुली तिच्या पेक्षा दुप्पट वयाच्या होत्या .
आणि कमाल बघा … या पोरीने 10-0 अशा फरकाने ती टूर्नामेंट जिंकली
.

पण इथे पण लोकांनी असं म्हणायला चालू केलं कि , ती जन्मजात Talented आहे …… झाला का लोच्या ?

पण त्यांनी Susan ची प्रॅक्टीस चालू ठेवली ,, दरम्यान त्यांना Sofia आणि Judit नावाच्या दोन अजून मुली झाल्या .

Susan ला आता प्रोफेशनल चेस ची कोचींग चालू झाली , होती .
तासन् तास ती आणि कोच प्रॅक्टीस करत असंत . आणि Sofia आणि Judit आपल्या बहिणीला बघत असत .

पुरुषांच्या खेळात ,,,वयाच्या पंधराव्या वर्षी 1984 मध्ये बुद्धीबळातला सर्वात प्रतिष्ठीत Top 15 Player मध्ये तिने स्थान मिळवलं आणि 1991 मध्ये Grand Master आणि 1996 _ 1999 पर्यंत world champion राहिली .

दुसरी बहीण Sofia ही पण Womans’ Top Player मध्ये पोहचुन international master बनली.

तिसऱ्या Judit ने मात्र चमत्कार ,केला तिचं रेकॉर्ड … “strongest Chess Player of ALL TIME ” असं आहे .

Judit ही पण Grand master आहे वयाच्या 15 व्या वर्षी Bobby fisher ला हरवून ती ग्रॅन्ड मास्टर बनली , गैरी कॉस्पोरॉव , विश्वनाथन आनंद आणि अशा 11 ग्रॅन्ड मास्टर्स ला तीने चेस मध्ये हरवले आहे .

अशा प्रकारे जगात असणाऱ्या 950 ग्रॅण्डमास्टर्स मधील 2 याच कुटूंबातून आले .

आता प्रश्न : का आले ?
कारण एका माणसाने ठरवलं ,,, कि टॅलेंट हे जन्मजात असलं तरीही , भरपूर प्रॅक्टीस ने कोणीही टॅलंटेड बनू शकतो ,

हवी असते ती मेहनतीची तयारी आणि थोडी कोचींग .

वरिल स्टोरी ही काल्पनीक नसून ,, सत्य घटना आहे .
आज Susan Polgar या 50 वर्षाच्या असून …. चेस अॅकेडमी चालवतात .

Judit Polgar यांचे TedX मधील भाषण पण ऐकण्यासारखे आहे .

यातून प्रेरणा मिळावी ,

आणि कोणीही टॅलंटेड होऊ शकतो , हे आपल्या लक्षात यावे कि कोणीही आईच्या पोटातून शिकून येत नाही … super 30 मध्ये पण आपण हे बघीतलेच आहे , ” राजा का बेटा अब राजा नही बनेगा , वो बनेगा जो हकदार होगा ” यासाठी हा लेखाचा पसारा*

मेहनत घ्या , यश नक्की मिळेल.

असेच लेख वाचायचे असतील तर आमचे फेसबुक पेज लाईक करा लिंक खाली आहे

https://www.facebook.com/Nilesh-Kales-Udyogniti-118721172131890/

शुभेच्छा

लेख आवडल्यास शेअर करावा ,



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर क्लिक करून दररोजचे अपडेट मिळावा!

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on ““कोणीही टॅलंटेड बनू शकतो का ?”

  1. फक्त जिद्द हवी सर्व गोष्टी साध्य होतात

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!