Skip to content

आनंदी संसार पुढे जाऊन का उध्वस्त होतात???

घटस्फोट


हेमा जाधव

(पुणे)


सध्याची परिस्थिती पहाता घटस्फोटाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. याला एकमेव कारण आहे आणि ते म्हणजे, समाजाचे बदलते चित्र. आता समाजाचे बदलते चित्र म्हणजे नक्की काय?..असा प्रश्न समोर येतो. आज स्वावलंबी या शब्दाचा अर्थ समाजात रूढ होत आहे. शैक्षणिक सुविधा, उच्चशिक्षित समाजवर्ग वाढलेला दिसून येतो. त्यामुळे वैचारिक क्षमता वाढली. त्यायोगे निर्णयक्षमता वाढली. जो तो स्वतःची स्पेस जपण्यासाठीच जगू पहात आहे. त्यामुळे समोरच्याच्या भावना गौण वाटू लागल्या आहेत. स्वावलंबी असणं चांगलंच आहे, पण त्याने अहंकार ही वाढलेला आहे.

आता अहंकारानेच आयुष्य अयशस्वी होते हे यांना कोणी सांगावे!.. एखादे उच्चशिक्षित जोडपे संसार तर करतात, पण स्वतःच्याच भावना जपतात नि तेथे मध्ये काही अहंकार दुखावला की टोकाची भूमिका घेतात..कारण, स्त्री आणि पुरुष दोघेही कमावतात. प्रत्येकाला असेच वाटते की, मीच बरोबर आहे. लगेच घटस्फोट घेऊन वेगळे होतात. प्रगती झाली पण भौतिक, मानसिक भावविश्व मात्र ढासळत चालले आहे. नवरा बायकोचे प्रेम हे प्रेम न उरता गरज समजली जाऊन संसाराच्या छोट्या छोट्या गंमती-जमती, रुसवे फुगवे, स्वप्ने सगळ्या गोष्टी संपुष्टात येत आहेत..कोणीच एक पाऊल मागे घेऊन विचार करत नाही.

त्यामानाने, जुन्या काळातली विवाह पन्नास पन्नास वर्षे आनंदात टिकून आहेत. तेथे भावनिक गोष्टींतून माणूस कमी पैशातही आनंदी जीवन जगलेली दिसून येतात. मला वाटते की, मागणी पेक्षा पुरवठा वाढला की, त्याची किंमत कमीच होते.. पैसा वाढला नि लोकांना गगन ठेंगण वाटू लागलं, मी काहीही करू शकतो, किंवा करू शकते या अहंकारात माणूस इतकं शिकूनही मागासच आहे असे म्हणले तर नवल वाटू नये.

कारण, संस्काराची मुळे ही कमकुवत होत चालली आहेत. आधुनिकतेची कास धरताना संस्कृती मागे सुटत चालली आहे..नि घटस्फोटाचा विषाणू लोकांचे आयुष्य उद्धवस्त करत आहे. एकत्र कुटुंब पद्धत, नाती गोती, सणवार सगळं मागे पडत चाललं आहे. कारण, पाश्चात्य संस्कृतीच्या आपण इतके अधीन होत चाललेलो आहोत हे कळतच नाही. इतकी बुद्धी भ्रष्ट व्हावी की आपण आपल्याच संस्कृतीचा असा अपमान करत आहोत.

समाजातील आपली जागा टिकवून ठेवण्यासाठी स्पर्ध्येच्या चक्रात आपण नुसतं गरगर फिरत आहोत. जगणं म्हणजे काय? हेच मुळी कोणाला उमजत नाही. सध्या सगळे नुसते पुस्तकी किडे आहेत. हे कोठेतरी थांबायला हवं, असं कोणालाही वाटत नाही हीच खेदाची बाब आहे..घटस्फोट घडण्याआधी तरुण वर्गाला विवाहबंधन म्हणजे काय? जबाबदारी म्हणजे काय? तडजोड म्हणजे काय? या गोष्टींचे ज्ञान देणे काळाची गरज आहे. लहानपणापासूनच संस्कार घडवले गेले पाहिजेत. मुलांना, मुलींना पालकांनी शिक्षणाबरोबरच मूल्यशिक्षण ही ठासून भरावे. म्हणजे, मुलं अहंकारी बनणार नाहीत.

स्त्रीच स्त्रीची खरी शत्रु आहे, असे प्रसिद्ध तत्वज्ञानी मार्गारेट आलवा म्हणतात. अलीकडे आईची भूमिका ही कारणीभूत ठरते मुलीचा संसार मोडायला. मुलीला तिच्या चुकांची कानउघडणी करायचे सोडून, तिला सासरच्या लोकांची किंमत ठेवायचे हे न सांगून, तिला स्वार्थीच बनऊ पहाते.

वेगळं कसे रहायचे यासाठी भांडण ही करायला लावते. अन मुलीचा संसार बसता बसता कोलमडतो. दुसरीकडे सासू म्हणवणारी स्त्रीही कारणीभूत ठरू शकते. आपलेच घोडे पुढे दमटावून मीच बरोबर असा आव असेल तर, मुलाचा संसार होणार कसा?..संसार हा कितीही माणसाचा असू देत गुण्यागोविंदाने नांदू शकतो.

फक्त एकमेकांची स्पेस सांभाळता यायला हवी. कोणत्याही दोन व्यक्तींच्या नात्यात कोणाची मध्यस्थी असू नये. मला तुझ्याबद्दल नि तुला माझ्याबद्दल काय वाटते हे महत्वाचे आहे. अशी नाती जास्त टिकतात जेथे एकमेकांबद्दल आदरभाव असतो.

आपल्या संस्कृतीत एकत्र कुटुंबपद्धतीला प्रथम स्थान आहे. नात्यांची जपणूक कशी केली जाते याचे प्रात्यक्षिक शिक्षण लहानपणापासून घरातच मिळते.

हे जर नसेल तर सगळं विस्कळीत होणारच!..

पुढील पिढीवर काय नि कसे संस्कार घडणार?..याचा विचार व्हायलाच हवा…शेवटी पैसा म्हणजेच जीवन नाही, आपलेपणा, प्रेम, माया, हे ही जगण्यासाठी आवश्यक खुराक आहे असेच म्हणेन मी..यासाठी लहानपणीच ही मूल्ये अंगीकारावी, जेणेकरून जीवनात अडचणी येणार नाहीत.

जगणं सुकर तर होईलच, पण आनंदात समाधानाची शांतता ही लाभेल.



Online Counseling साठी !

क्लिक करा


रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whasapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

? ?
Whatsapp | Telegram


“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “आनंदी संसार पुढे जाऊन का उध्वस्त होतात???”

  1. खरंच…!हा लेख वाचल्यावर अक्षरशः अंगावर शहारे आले….
    आपण म्हणतो या तंत्रज्ञानाच्या विकासाने हे जग विकसित झाले.हे खरं आहे,परंतु या ठिकाणी आपली संस्कृती कुठेतरी लोप पावते आहे.हे या सुशिक्षित समाजवर्गाला समजत नाहीये…..!!!आणि हीच परिस्थिती या सिशिक्षित समाजासमोर मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न खूप छान होता.????

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!