Skip to content

आनंदाच्या आणि दुःखाच्या अती उत्कट प्रसंगी नवरा-बायको नेहमी जवळ असतात.

आनंदाच्या आणि दुःखाच्या अती उत्कट प्रसंगी नवरा-बायको नेहमी जवळ असतात.


अपर्णा कुलकर्णी


नील आणि साक्षी लगानंतर बावीस वर्षांनी वेगळे रहात होते. वेगळे रहात होते म्हणजे कागदोपत्री ते वेगळे झाले नव्हते तर दोघांच्या विचारांनी ते वेगळे रहात होते. लग्नाच्या इतक्या वर्षांनी वेगळे होण्याचे कारण म्हणजे नील आणि साक्षी मधील काही वैचारिक मतभेद. आर्थिक परिस्थिती खरतर खूप उत्तम होती त्याचा काहीच प्रॉब्लेम नव्हता पण हल्ली कोणत्याही गोष्टीवरून त्यांच्यात वैचारिक मतभेद होत होते.

मग ते एकमेकांना वेळ न देऊ शकल्यामुळे, मुलांच्या करिअर निर्णयामुळे किंवा राहणीमानाच्या अंतरामुळे अशी अनेक कारणे होती. दोघेही उत्तम शिकलेले आणि कमावते होते. त्यामुळे बाहेरच्या खाण्यापिण्याकडे सक्षीचा कल जात असे ते नीलला आवडत नसे, शिवाय मुलांच्या करिअर बाबत तो आग्रही होता तर साक्षीला मुलांच्या आवडीने त्यांनी करिअर करावे असेच वाटत होते. अशा काही गोष्टींमुळे त्यांनी विचारपूर्वक काही काळ घटस्फोट न घेता वेगळे राहायचे ठरवले होते.

नील आणि साक्षीला नक्ष आणि स्वरा अशी दोन मुले. दोघेही चांगले मोठे झाले होते आणि आपापल्या करिअर मध्ये गुंतून गेले होते. त्यामुळे त्यांनाही आता घरातील वातावरण आणि आई बाबांनी घेतलेला निर्णय यात काही चुकीचे वाटत नव्हते. कारण घरात सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडून तोंड फिरवण्यापेक्षा सामंजस्याने आणि आपापल्या परीने त्यातून तोडगा काढण्याचा हा मार्ग त्यांनाही पटला होता.

नीलकडे पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःचे दोन फ्लॅट होते. त्यामुळे त्याने दुसऱ्या फ्लॅटवर रहायला जाण्याचा निर्णय घेतला होता. स्वरा आणि नक्ष त्यांना हवे तेंव्हा बाबाकडे म्हणजेच नीलकडे जात आणि भेटून येत असत. साक्षीचाही त्याला विरोध नव्हताच. साक्षी आणि नील पण अधून मधून एकमेकांना भेटत होते.

नक्षला गयानाची खूपच आवड होती आणि त्यातच करिअर करण्याची त्याची इच्छा होती. साक्षीचा त्याला खूप पाठिंबा होता. त्याचे क्लास, त्यासाठी लागणारा वेळ आणि खाण्या पिण्याची घ्यावयाची सगळी काळजी साक्षी घेत होती. त्यामुळेच गाण्याची परीक्षा नक्ष् उत्तम प्रकारे पास झाला होता आणि त्याचा आवाज सगळ्यांना खूप आवडल्यामुळे एका संगीत कार्यक्रमात त्याला सहभागी होता येणार होते. त्याने ही बातमी घरी आल्यावर सगळ्यांना सांगितली आणि साक्षी तर आनंदाने वेडीच झाली.

आज नक्ष कार्यक्रमासाठी ऑडिशन देणार होता त्यामुळे नील आणि साक्षी सगळी कामं सोडून नक्ष सोबत आले होते. नक्ष आत ऑडिशनसाठी गेल्यापासून साक्षीची घालमेल सुरू होती तिची अवस्था पाहून नील तिला धीर देत होता. शेवटी नक्ष बाहेर आला आणि त्याने धावत येऊन आई बाबाना मिठी मारली त्याच्या या वागण्याने दोघानाही समजले नक्ष ऑडिशनसाठी सेलेक्ट झाला आहे. त्या दिवशी सगळ्या कुटुंबाने मिळून आनंद साजरा केला आणि नक्षला खूप बरे वाटले.

नील स्वराला कॉलेजमध्ये सोडत होता. पण आज त्याची लाडकी स्वरा खूप गप्प गप्प असल्यामुळे त्याने त्याचे कारण तिला विचारले पण तिने काही नीट उत्तर दिले नाही. स्वराचे सगळे लक्ष तिच्या मोबाईल मध्ये होते आणि सतत ती कोणाचा तरी फोन कट करत आहे हे नीलच्या लक्षात आले पण तो फार काही तिला बोलला नाही. त्याने ऑफिसमधून साक्षीला फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला तेंव्हा साक्षी म्हणाली गेल्या काही दिवसांपासून मी पण हे नोटीस केले म्हणूनच आज तुला कॉलेजमध्ये सोडायला सांगितले होते. मला वाटलं कदाचित तुझ्याशी शेअर करेल पण आज मी तिला विचारते बघू काय सांगते का ते.

स्वरा रात्री घरी आली आणि सरळ आपल्या रूममध्ये निघून गेली तेवढ्यात नील तिथे आला आणि दोघे मिळून स्वराच्या खोलीत येऊन काय प्रॉब्लेम आहे ते विचारले. सुरुवातीला स्वराने आढेवेढे घेतले पण नंतर सांगितले की, कॉलेजमध्ये एका मुलाने तिला प्रपोज केले आणि स्वराने नकार दिल्यामुळे तो सतत तिला फोन,मेस करून त्रास देत आहे. यावर दुसऱ्या दिवशी नील आणि साक्षी स्वरा सोबत कॉलेजमध्ये गेले आणि प्रिन्सिपॉलकडे तक्रार करून त्या मुलाला माफी मागायला लावली. तेंव्हा स्वराने पटकन बाबांना मिठी मारली आणि नीलने पण तिचे खूप लाड केले.

एकदा नक्ष आजारी पडला तेंव्हा साक्षी आणि नील दोघांनीही रजा घेऊन त्याला वेळ दिला, त्याची काळजी घेतली. तेंव्हा काही दिवस नील त्यांच्याच सोबत एकत्र राहिला होता कारण नक्ष सोबत स्वराची ही तशीच इच्छा होती. नील गॅलरीत बसलेला असताना साक्षी त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली आणि म्हणाली, नील आपण दोघे एकमेकांच्या हितासाठी वेगळे रहातो तरीही जेंव्हा मुलांना आणि मला तुझी गरज असेल तेंव्हा तेंव्हा तू माझ्यासाठी उपलब्ध होतो. मध्ये माझे बाबा आजारी होते तेंव्हा तु आधार द्यायला होतास, नक्षच्या ऑडिशन वेळी होतास, स्वराला मुलगा त्रास देत होता तेंव्हाही होतास आणि आता नक्ष आजारी आहे तरीही त्यांच्यासाठी इथे थांबला आहेस.

मग काय झालं साक्षी, आपल्यात काही वाद आहेत, वैचारिक मतभेद आहेत हे मान्य आहे मला. त्यामुळे आपल्यात खूप वाद झाले म्हणूनच मी एकत्र न राहता वेगळे राहण्याचे निर्णय घेतला पण याचा अर्थ असा नाही की माज तुमच्यावर प्रेम नाही किंवा नात्याची कमिटमेंट संपली. ती कायमच राहणार आणि मी जसा तुमच्यासाठी उपलब्ध असतो तसेच तुम्ही पण असताच की. मध्ये काही दिवस मी पुण्यात नव्हतो तेंव्हा तूच काळजी घेतलीस मुलांची, माझी मेड येणार नव्हती तर तू रोज डबा पाठवत होतीस, जेवायला बोलावत होतीस, मला प्रोजेक्ट मिळवा म्हणून मला किती मदत केलीस तू. थोडक्यात काय तर आनंदाच्या आणि दुःखाच्या अती उत्कट प्रसंगी आपण कायम एकमेकांसोबत असू निलच्या या बोलण्यावर साक्षी मनापासून हसली.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!