Skip to content

एक महिला केवळ तिच्या आवडत्या पुरुषासाठीच भावनिक होत असते…

एक महिला केवळ तिच्या आवडत्या पुरुषासाठीच भावनिक होत असते…


टीम आपलं मानसशास्त्र


स्त्री त्यात भारतीय संस्कृती मध्ये वाढलेली स्त्री, ही तशी ही भावनिक , प्रेमळ , आपुलकी असणारी असतेच. परंतु एखादी महिला केवळ तिच्या आवडत्या पुरुषासाठी भावनिक होत असते हेही खरे आहे.

जो पुरुष तिला आवडतो , जो पुरुष तिच्या जीवनाचा , आयुष्याचा एक महत्वाचा घटक, अविभाज्य भाग असतो. जसे प्रियकर असेल , नवरा असेल किंवा मुलगा , भाऊ , वडील हे आवडते पुरुष च असतात. पण त्या आवडी मध्ये ही खूप फरक असतो. याचे कारण काय निसर्ग नियम . भिन्न लिंगी व्यक्तींचे आकर्षण . मग स्त्री आणि पुरुष हे लोह चुंबका सारखे एकमेकांच्या कडे आकर्षित होत असतात. याचे कारण केवळ मन ओढ घेते असे नाही. तर शरीर रचना ही अशी असतें . हार्मोन्स ही कारणीभूत असतात.

हे मनाचे , शरीराचे आणि भावनांचे आकर्षण हे त्या स्त्रीला केवळ तिच्या आवडत्या पुरुषासाठी भावनिक होत असते… याची अनेक कारणे आहेत . एक तर एकमेकांच्या मध्ये मनाने गुंतलेलं असणे , एकमेकांवरील निस्सीम प्रेम , आपुलकी , ओढ , एकमेक एकमेकांची घेत असलेली काळजी. एकमेकांची सुख दुःखात साथ , अनुभव , आवडी निवडी आवर्जून जपत असतात. आता स्त्रीचा आवडीचा पुरुष म्हणले तर तिचा प्रियकर , नवरा , नवरा ही बळजबरी लादला असेल तर मात्र त्याच्या विषयी तेवढ्या सकारात्मक भावना तीव्र नसतात. नकारात्मक भावना याच जास्त असतात.

याउलट तिचा जीवन साथीदार हा तिचा आवडता असेल तर तिच्या त्याच्याकरिता भावना या खूप सकारात्मक असतात. मग छोट्या छोट्या गोष्टीत त्याची काळजी घेत असते किंवा तिला काळजी वाटत असते. बाहेर गेला थोडा उशीर झाला येण्यास तरी चिंता , काळजी वाटते . का उशीर झाला. काही प्रोब्लेम झाला का , काही अडचणी आल्या का असे अनेक विचार येतात. बरेचवेळा काळजी पोटी लगेच फोन , मेसेज केला जातो.

कामानिमित्त कुठे दूर गेला , गावाला , दुसऱ्या शहरात , परदेशात गेला तरी ही काळजी वाटते. मग पोहचला का इथे पासून तिकडे लोक कसे असतील, खाणे पिणे , जागा बदल झोप लागली असेल का , सोबत कोणी असेल ना , एकटे तरी नाही ना , जेवण चांगले असेल का , राहण्याची चांगली व्यवस्था असेल का , कामाचे स्वरूप कसे आहे. खुप ताण पडला का. चांगले इथपासून विचार येत राहतात. भावनिक गुंतागुंत झालेली असते.

कधी कोणी जवळची मैत्रीण असेल त्याची तर हिला मात्र तेव्हा उगीचच तिचा द्वेष , मत्सर वाटेल , आणि त्याच्यावर केवळ आपला हक्क , तो केवळ आपलाच आहे अशा भावना possesiveness वाढतो. कधी कोणी आपल्या आवडत्या पुरुषाला बोलले , दुखावले , त्याच्या चुका दाखवल्या तर ते ही हिला आवडत नाही. तिचे मन दुःखी होते.

बरेचवेळा असे होते की आपला आवडता पुरुष त्याने कसे वागावे , राहावे , त्याचा पेहराव , त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी, आवडी निवडी ही बारकाईने लक्षात ठेवून त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ती असते. त्याकरिता धडपड , प्रयत्न करते. त्याने त्याच्या प्रोफेशन नुसार किंवा वयानुसार पेहराव बदलला की हिला आनंद होतो, त्याने एखादी आवडीची गोष्ट केली की मन एकदम प्रफुल्लित , उत्साही होतें. तर एखादी गोष्ट आवडली नाही, मनाविरुद्ध केली तर मन उदास , दुःखी होते.

याउलट त्याचे व्यावसायिक , नोकरी मधले स्ट्रगल किंवा त्याच्यावर पडणाऱ्या जबाबदाऱ्या , ताण , स्ट्रेस याचा ही तिला त्रास होतो . तिला वाईट वाटते. पण जेव्हा तो आवडता पुरुष सगळ्या जबाबदाऱ्या आनंदाने , धडपडी ने , जिद्दीने पार पाडतो तेव्हा मात्र तिला त्याचा अतिशय गर्व वाटतो.

कधी येणारी अचानक ची आजारपणे , एखादा अपघात अशावेळी ती त्याला खूप जपते. त्याची मनापासून सेवा , सुश्रुषा करते. मदत करते. त्याच्याविषयी तिला अधिक जास्त सहानुभूती असते.

आपल्या आवडत्या पुरुषाने आपल्याशी एकनिष्ठ असावे ही प्रत्येक स्त्रीची प्रतिमा इच्छा असते. त्यामुळे तो कधी आपल्याला सोडून इतर कोणत्या स्त्री कडे आकर्षित होईल का याची भीती तिला वाटत असते. आणि insecure फील होत असते. तेव्हा ती त्याच्यावरच्या तिच्या हक्का करिता स्वार्थी ही होत असते. Possessive होत असते.

त्याला सोडून दूर कुठे जायचे नसते. किंवा त्याने कुठे दूर जावू नये असे मनोमन वाटत असतें. अंतर नको. दुरावा नको. जवळीक असावी ही भावना खूप strong असते. त्याच्या बाबतीत ती खूपच हळवी असते.

श्री चा फोन आला इशू मी आज आता घरी येतो आहे पण मला लगेच तासाभरात कंपनी चे काम आहे त्याकरिता दोन दिवस मुंबई ला जायचे आहे . श्री घरी आल्यावर तिचे एकच मी पण सोबत येते . एकटा कसा जाणार तू. अग इशु पुणे मुंबई कितीसे अंतर आहे अग. कॅब आहे आणि ऑफिस खर्च करणार आहे. तू कुठे येतेस ..तू कुठे राहणार कारण मी तिकडे ऑफिस guest house मध्ये मित्रांच्या सोबत शेअरिंग मध्ये राहणार आहे.

श्री एकटा निघाल्यावर ही रोज फोन करत जा ते पण सकाळ, दुपार ,संध्याकाळी , रात्री आणि वेळ मिळेल तेव्हा ही. काळजी वाटते म्हणून रे. श्री त्यावर म्हणाला ईशू काम करू का तुला फोन करत बसू त्याचा जरा चिडका स्वर वाटल्यावर तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. त्यावर श्री ने ही तिला लगेच जवळ घेवून सांगितले हो ग करतो फोन , मेसेज आता तरी हसणार का.. कळी खुलणार का? तेव्हा कुठे मग बाईसाहेब डोळे पुसून परत मिठीत घुसल्या .. आणि लवकर ये असे प्रेमाने सांगून श्री ला पाठविण्यासाठी तयार झाल्या.

त्यातही वेळेत जेवण कर , तुला मसालेदार चालत नाही. खावू नकोस . पाणी पी वेळेत . तिकडे उन्हाळा खूप असतो . पाण्याची बाटली सोबत ठेव. शंभरशे साठ सूचना . ते पण का की आपलेपणाने. आयत्या वेळी गैर सोय होवू नये म्हणून. किंवा दूर दृष्टिकोन हे सगळे विचार .
हे सगळे विचार म्हणजे तिच्या त्या भावनाच की.

तन आणि मन दोन्ही एकरूप झाले असेल तर त्याहून अधिक जास्त ती स्त्री केवळ तिच्या आवडत्या पुरुषासाठी भावनिक होत असते…जसे त्याचे आनंद त्यात तिचा आनंद , त्याच्या दुःखात ती ही सहभागी . दु:खी , त्याने प्रेम केले तर त्याच्या दस पट ती प्रेम करेल. त्यात त्याग ही असेल , आपुलकी ही , ओढ ही. आणि काळजी ही मग कधी त्याच्या आवडी निवडीचे पदार्थ करून खायला घालण्यात तिला समाधान मिळेल.

तर तो कधी ऑफिस मधून दमून भागून आल्यावर गरम गरम वाफाळता चहा सोबत आजच्या दिवसभरात काय घडले हे ती सांगेल त्याला ही विचारेल त्यातून दिवसभराचा ताण , शीण क्षणात दूर होईल. तर कधी त्याच्या नोकरी व्यवसायात होणाऱ्या चढ उताराचा त्याच्या वरचा ताण तिच्यावर ही तो दिसेल. तो ताण कमी झाला की रिलॅक्स ही.तिच्या सगळ्या छोट्या छोट्या भावना , तिचे मूड हे त्याच्या वागण्यानुसर , त्याच्यावर अवलंबून असतात.

आणि हा तोच का जो तिचा खूप आवडता कारण त्यात ती मन , भावना आणि शरीर यातून सर्वस्वी गुंतलेली असते. एकरूप झाली असते. जसे दुधात विरघळलेली साखर बाजूला काढता येत नाही. तसे तिच्या भावना , मन , शरीर त्याच्यात गुंतलेले असते.

आणि इतर कोणाचं बद्दल तिला काही ही देणे घेणे नसते. ते कसे वागले , काय करतात , त्यांची काळजी ही नसते. कारण ती त्यांच्यात गुंतलेली नसते. ते तिच्या दृष्टीने त्रयस्थ असतात त्यामुळे त्यांच्या वागण्याचा तिच्यावर फरक पडत नाही किंवा तिला त्यांच्या विषयी काही ही भावना नसतात. असल्या तरी फक्त ओळखीचे असतील तर तेवढ्या पुरते काय कसे एवढेच असते.

खरे तर पुरुषाला मग तो तिचाच असेल तरी बरेचवेळा तिच्या भावना समजत नाहीत. आणि जरी समजल्या तरी त्यातली डेप्थ समजत नाही. तरी हल्ली बर्या पैकी पुरुष हे समजून घेतात याचे कारण दोघात असलेला सुसंवाद. विचारांची आणि भावनांची मोकळेपणाने आणि मनसोक्त पणे देवाणघेवाण. यातून एकमेकांना समजून घेणे जास्त शक्य होते.

कोण कोणत्या परिस्थितीत कसे वागतो , वागते हे लक्षात येते. आणि आपण तेव्हा कसे वागावे किंवा कसे वागू नये याचे अंदाज येत जातात. थोडक्यात एकमेकांच्या भावना समजून समायोजन करण्याचे प्रयत्न केले जातात.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!