आपली बायको सुंदर दिसते याचं कित्येक पुरुषांना टेन्शन असतं.
गीतांजली जगदाळे
मानसशास्त्राच्या एका research नुसार असं म्हणतात की स्त्रिया ह्या पुरुषांच्या यशावरून , मालमत्ता किंवा पैसे यात् तो किती यशस्वी आहे हे पाहून लग्न करतात कारण त्यांना त्यांच्या आयुष्यासाठी आणि त्यांच्या होणाऱ्या मुलांसाठी एक् stability हवी असते. तर पुरुष हे स्त्रियांची सुंदरता , निरोगी शरीर आणि कमी वय हे पाहून त्यांच्यासाठी जोडीदार निवडायचे आणि याच कारण असं कि निरोगी आणि सुंदर शरीर असलेल्या स्त्रिया निरोगी , सुदृढ असलेल्या मुलांना जन्म देतात. आता हा असा research वाचून आत्ताच्या पिढीतल्या माणसांना चीड येऊ शकते.
पण काही वर्षांपूर्वी हा research समाजाशी अगदी बरोबर जुळत होता. आणि त्यामुळेच काही वर्षांपूर्वी त्या जोडप्यांच्या वयात बरंचसं अंतर दिसून यायचं कारण ठराविक यश मिळवण्यासाठी वयाची बरीच वर्ष पुरुषांना खर्च करावी लागायची आणि त्यांना सुंदर, सुदृढ अशा कमी वयाच्या मुलींशी लग्न करावं लागायचं. या गोष्टी अर्थात आत्ताच्या काळी फार लागू होत नाहीत. आणि आजचे स्त्री- पुरुष यापलीकडे जाऊन विचार करू लागलेत हि खूप चांगली गोष्ट म्हणावी लागेल.
प्रत्येक पुरुषाला सुंदर बायको हवी असते. म्हणजे काही पुरुष नक्कीच मन , गुण पाहून जोडीदार निवडत असतील तर काही पुरुष सुंदरता पाहून निवडत असतील. पण सुंदर बायको नकोच बाबा असं म्हणणारा पुरुष य असणं तसं मुश्कीलच नाही का !
आपली बायको किंवा आपला जोडीदार सुंदर असावा असं वाटणं साहजिक आहे. पण सुंदर बायको मिळाली , ही गोष्ट मनासारखी झाली तरी सर्व प्रश्न सुटले असं होत नाही. उलट कधी कधी तर खरे प्रश्न त्यानंतर च सुरु होतात असं म्हणायला हरकत नाही. तसे सुरु व्हावेत की नाही हा मुद्दा वेगळाच ठेवुयात आपण आत्ता तरी !
आपली बायको सुंदर असल्याचा अभिमान आणि आनंद पुरुषांना नक्कीच असतो. पण त्याच आनंदच नंतर टेन्शनमध्ये रूपांतर व्हायला लागतं. बायको जर खूप सुंदर असेल तर तिच्याकडे पाहणारा कोणताही पुरुष सहज आकर्षित होईल असं नवऱ्याला वाटू शकतं. जसं स्त्रिया इतर स्त्रियांना चांगलं ओळखतात तसेच पुरुष ही इतर पुरुषांना जास्त चांगलं ओळखत असल्याने आपल्या बायकोसाठी इतर कोणाच्या मनात येत असणाऱ्या भावना त्याला नकोशा वाटतात.
त्यात त्या माणसाची बायको एक गृहिणी नसून एखाद्या ठिकाणी नोकरी करत असेल तर टेन्शन अजून वाढू लागतं , कारण बाहेर त्या इतर बऱ्याच पुरुषांच्या संपर्कात येण्याची शक्यता असते. याचा अर्थ ते आपल्या बायकोवर संशय घेत असतात किंवा त्यांच्या नात्यात विश्वासाचा अभाव आहे असा होत नाही. आपल्या माणसावर त्याचा नक्कीच विश्वास असतो पण तोच विश्वास बाहेरच्या जगावर नसतो आणि त्यामुळेच काळजी वाटणं साहजिक असतं .
टेन्शन फक्त याच गोष्टीचं असतं असंही नाही. कित्तेक पुरुषांच्या कल्पना सुंदर बायकांबद्दल अशा ही असतात की , जर ही एवढी सुंदर आहे , तर तिला ते maintain करण्यासाठी कितीतरी ब्युटी प्रॉडक्ट्स , सलून ट्रीटमेंट ,makeup असं काही काही वापरावं लागत असेल आणि त्याला किती तरी खर्च करावा लागत असेल. त्याशिवाय सुंदर दिसणाऱ्या बऱ्याच बायका अर्थात सगळ्या नाही पण बऱ्याच ट्रेंड नुसार किंवा फॅशन नुसार कपडे घालत असतात त्यामुळे तो एक् वेगळाच खर्च. अशा या गोष्टींमुळे देखील पुरुषांना टेन्शन आल्याशिवाय राहत नाही .
आपल्या समाजात खूप आधीपासून एक् गैरसमज चालत आलेला आहे. तो म्हणजे एक्सट्रा मॅरिटल affair हे बऱ्याचदा सुंदर दिसणारी स्त्री किंवा पुरुष करत असतात. पण असं मुळीच नाहीये affair करण्याला कसलाच criteria नसतो त्यामुळे आकर्षित न दिसणारे स्त्री किंवा पुरुष सुद्धा यात असू शकतात. पण या गैरसमजामुळे होतं काय कि , सुंदर बायको असणाऱ्यांच्या आजूबाजूची माणसे गमतीने त्याला ‘बायकोवर लक्ष ठेव बरं का ‘ असं म्हणून सांगून जातात पण नवऱ्याच्या मनात मात्र पाल चुकचुकायला लागते. आणि अशा प्रकारे मनात असलेली छोटीशी भीती टेन्शनच एक कारण बनून जाते.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

लेख छान आहे.
SSयाबरोबरच असेही नवरे पाहिले आहेत की ते स्वसौंदर्याकडे थोडंफारही लक्ष न देता केवळ हुशारी, बुध्दी, कामाचा फक्त उरक(त्यात व्पवस्थितपणा नसतो)
याकडेच लक्ष देत असतात.
लग्नानंतर पत्नीमध्ये नैसर्गिक सौंदर्याबरोबरच हुशारी, बुद्धिमत्ता, कोणतंही काम व्यवस्थितपणे करण्याची कला, गरीब-श्रीमंत भेदभाव किंवा अढ्यता नाही ,सर्व प्रकारचा व्यवस्थितपणा, नीटनेटकेपणा उत्तम संवादकौशल्य हे गुण दिसतात तेव्हा या हुशार नवर्यांना काॅम्प्लेक्स येतो.
आता येथे अशा प्रकारचे नवरे पत्नीचे जास्तीत जास्त खच्चीकरण करण्यास सुरूवात करतात.
पत्नीने याकडे दुर्लक्ष करून आपले कार्य चालू ठेवले आणि पतीला सर्वतोपरी सहाय्य केलं, नवर्याच्या पगारात आणि स्वतः घरातील सर्व कामं करून मुलांना सर्व प्रकारे व्यवस्थितपणे वाढवलं.परिणामी पतीला पाहिजे असलेला मान सर्वत्र मिळू लागला, मुलांचीही फारशी काळजी आता नाही .आयुष्याचा हा टप्पा आला की, नवर्याला त्याच्या ऑफिसमधील मुलं-मुली, स्त्रिया जास्त कष्टाळू आणि सर्वतोपरी छान-सुंदर वाटू लागतात.पत्नीला आता काही बोलूच न देता ती खरी परिस्थिती बोलू लागली तर तिचं बोलणं तोडणे, बोलण्याकडे दुर्लक्ष करणे, तिची मानसिक स्थिती बिघडली आहे असं तिलाच सांगणे असं वर्तन पती करू लागतो
आता येथे नक्की विचारावे असे वाटते , ” तेंव्हा राधासुता, तुझा कोठे गेला होता धर्म ?” तिला मानसोपचाराची गरज आहे का त्याला ? MM
यावर मानसशास्त्र समुपदेशक, अभ्यासकांनी जरूर मत सांगावे.
बरोबर आहे खूपच टेन्शन असते मला अनुभव आहे 🙏