एकमेकांवर विश्वास असेल तर कोणाच्या सांगण्यावरून नाती तुटत नसतात.
मयुरी महाजन
जग हे विश्वासावर चालते, असे आमचे शिक्षक सांगायचे, परंतु विश्वासावर फक्त जगच नाही, तर आपले संपूर्ण आयुष्य चालत असते, मग त्यात स्वतःवर विश्वास, नात्यांवर विश्वास ,प्रत्येक गोष्ट विश्वासाच्या जोरावर चालते, जसे की काहीजण देवावर किती विश्वास ठेवतात, व आपल्या कर्मावर किती विश्वास ठेवतात, यावर पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात,
आजच्या घडीला आपण बघतोय की विश्वासाची ही नाजूक वीण किती सैल होत चाललीय, कारण आपण विकासाच्या वाटा तर तुडवतोय ,त्यासोबत माणसातला विश्वास हरवत चाललाय ,नाती सुद्धा जुळवताना हल्ली पैसा, प्रतिष्ठा, स्टेटस खूप बघितले जाते, परंतु त्या व्यक्तीला जाणण्याचा व त्यावर निःसंकोचपणे विश्वास ठेवायला ती व्यक्ती खरच विश्वासाला पात्र आहे की नाही हे सुद्धा बघितले पाहिजे,
कितीतरी घटस्फोट निव्वड एकमेकांवरती असलेल्या अविश्वासाच्या पोटी घडतात, कारण की नात्याची वीण सुरू होण्याची पहिली प्रक्रिया म्हणजे विश्वास ठेवणे, व त्यासोबत फक्त विश्वास ठेवून काम पूर्ण होत नसते ,तर कुणीतरी आपल्यावर विश्वास ठेवणे, म्हणजे आपण त्या विश्वासाला पात्र आहोत की, आपण त्या व्यक्तीला फक्त तसं भासवण्यात पात्र आहोत,हेही पाहणे गरजेचे आहे ,
हिंदीतील एक वाक्य आठवते, “अगर निभाने वाले सच्चे हो,
तो कान भरणे वाले उनका कुछ नही बिघाड सकतें”…
ती नाती खरच खूप छान असतात ,जे कुणाच्या सांगण्यावरून जुळत नाही, व कुणाच्या सांगण्यावरून तुटतही नाही, कुणी काहीही सांगत असले तरी ती व्यक्ती त्याची बाजू मांडत असते ,नाती तोडण्याचा विचार जरी आला ,तरी आपण आपल्या बाजूने त्या गोष्टीचा विचार करावा, उगाच कुणी सांगते म्हणून ती पूर्व दिशा ठरवू नये ….
एकाच गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो ,हे लक्षात घ्यायला हवे, आपल्या नात्यांची किंमत आपल्यापेक्षा जास्त कुणालाही माहिती नसते, त्यामुळे कुणाच्या काहीही सांगण्याला गृहीत धरण्या अगोदर, आपल्या नात्यांना आपणच जपायचं असतं, हे महत्त्वाच आहे, कारण कोणासाठी ते नाते काहीही असो, परंतु आपल्यासाठी व समोरच्या व्यक्तीसाठी सुद्धा जर तेच आपलं सर्वस्व असेल, व त्या नात्यात एकमेकांवर जितका विश्वास असेल, तर लाखो लोक तोडण्याचा प्रयत्न करतील, तरी ते अयशस्वी ठरतील, कारण की ज्यांचा विश्वास मजबूत असतो, त्यांना कोणीही तोडू शकत नाही, हा परंतु त्यांना तोडण्याचा प्रयत्न मात्र बर्याचदा होतो, इतकं मात्र खरं…..
ते बंध खूप स्ट्रॉंग असतात ,त्यांचा एकमेकांवर विश्वास असतो, जर आपल्याला आपल्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती लाभली असेल, तर आपण खूप भाग्यवान, कारण आजच्या जगात विश्वासू माणूस भेटणे जवळजवळ वाटवंटात पाणी शोधण्यासारखे आहे ,माणसं तर खूप भेटतात आयुष्यात, परंतु ज्यांच्यावर विश्वास ठेवता येईल अशी माणसे भेटणे खूप महत्त्वाचे आहे,
विश्वासाला गेलेला तडा विश्वासघात झालेली व्यक्ती ,पुन्हा कुणावर विश्वास ठेवताना आपल्या तुटलेल्या विश्वासाला जोडून बघते ,पुन्हा विश्वास ठेवायला व्यक्तीचे मन धजत नाही, त्यामुळे आपल्यावर कुणाचा विश्वास असलेला विश्वास म्हणजे आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आहे, ज्याची धुरा आपल्याला निरंतरपणे जपावी लागते, व जगावीसुद्धा लागते, त्याची अपेक्षाही प्रत्येकाकडून केली जात नाही, परंतु ज्यांच्याकडून केली जाते त्यांना ती पार पाडावी लागते…..
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
