Skip to content

सर्वांसमोर ‘आमचं नातं छान सुरू आहे’ अशी म्हणणारी माणसं या १० चुका करत आहेत.

सर्वांसमोर ‘आमचं नातं छान सुरू आहे’ अशी म्हणणारी माणसं या १० चुका करत आहेत.


मेराज बागवान


अशी काही माणसं असतात जी नेहमी सर्वांसमोर म्हणत असतात, आमचं ना खूप मजेत ,छान सुरू आहे.तो/ती खूपच छान वागते,बोलते माझ्याशी.कसलीच तक्रार नाही.अशी वाक्ये खासकरून नवरा-बायको यांच्या नात्यांमध्ये बोलली जातात.तसेच सासू-सून, भावजय-नणंद,जाऊ ह्या नात्यांमध्ये देखील बरेचदा सर्वांसमोर बोलली जातात.पण सर्वांसमोर ‘ आमचं नातं छान सुरू आहे ‘ अशी म्हणणारी माणसं या १० चुका करत आहेत.

१) गृहीत धरणे – पती-पत्नी अनेकदा एकमेकांना गृहीत धरून चालत असतात. हिला हे आवडत असेलच, त्याला हे असंच लागत असणार.आणि ही गृहीतकेच डोक्यात घेऊन इतर जणांकडे बिनधास्तपणे बोलले जाते की , आमचं नात छान सुरू आहे.पण वास्तव वेगळे असू शकते.त्याला-तिला वेगळं काहीतरी आवडत असू शकते.पण गृहीत धरल्यामुळे ही गोष्ट विचारात घेतली जात नाही.

२) अंदाज बांधणे – कधी कधी नवरा बायको, किंवा सासू-सुना देखील एकमेकांविषयी प्रत्यक्षपणे अंदाज बांधतात.ह्यांचा स्वभाव साच असेल.ते असेच करीत असणार.मग स्वतःच्या मनामध्ये जी प्रतिमा तयार होत आहे, तशीच बोलताना जगासमोर मांडली जाते.

३) अपेक्षा लादणे- ‘अपेक्षा’ एका ठराविक पातळीपर्यंत ठीक असते. एकमेकांनी एकमेकांची साथ दिली पाहिजे, ही अपेक्षा साहजिक आहे.पण मला हे आवडते आणि तू हे केलेच पाहिजे. नवीन नात्यांमध्ये सुरवातीला हे केले देखील जाते.आणि त्यावरूनच मग सर्वांसमोर म्हटले जाते, आमचं नातं खूप घट्ट आहे.तिला/त्याला माझ्या मनातील सगळं कळतं. पण वास्तविकता अशी आहे की , कोणत्याही नात्यात कोणीच कायम एकाच्याच मर्जीने जगू शकत नाही.

४) जोर जबरदस्ती- तू माझ्याबरोबर ‘सेल्फी’ काढलाच पाहिजे.आणि मग जबरदस्तीने सेल्फी काढला जातो आणि सोशल मीडिया वर पोस्ट केला जातो.आणि दुनियेला दाखविले जाते, ‘मेड फॉर इच आदर’.पण ह्यामध्ये काही काही वेळेस समोरच्याची मर्जी आहे की नाही याचा विचार बाजूला राहतो आणि मला दुनियेला दाखवायचे आहे की आम्ही किती खुश आहोत हाच विचार वाढीस लागतो.

५) सुसंवादाचा अभाव – अनेक नात्यांमध्ये , हवा तसा सुसंवाद नसतो.फक्त गरजेचे आहे तेवढेच बोलले जाते.यामुळे गैरसमज होऊ शकतात.आणि ह्या अर्धवट संवादामुळेच , इतरांसमोर सांगण्याची घाई होते की,’ आमचं नातं खूप छान सुरू आहे’.

६) एकमेकांना खऱ्या अर्थाने न ओळखणे – पती-पत्नी इतके जवळचे नाते असते.पण जुळवून घ्यायच्या विचारात खरे स्वभाव कधी कधी समजत नाहीत.पण मनाची समजूत काढली जाते आणि सर्वांसमोर ती व्यक्ती वारंवार म्हणते , ‘आमचं खूप मस्त चाललं आहे’.पण खरी ओळख अनेकदा करून घेतली जात नाही आणि सर्वांसमोर मात्र नात्याचे कौतुक केले जाते.

७) स्वतःची समजूत काढणे – माझे विचार खूप मुक्त आहेत. मी नवीन विचारांची आहे.मग तो देखील तसाच असणार.अशी काही स्वतःची समजूत अनेकदा काढली जाते.आणि स्वतःची ही कल्पना जगासमोर बोलून दाखविली जाते.पण खरे तर प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते पण सारखी नसते.

८) वास्तव न स्वीकारणे- एखादी व्यक्ती जशी आहे तशी बरेचदा स्वीकारली जात नाही.स्वतःच्या कल्पना फक्त रंगविल्या जातात.मग , मी जसा विचार करत आहे अगदी तसेच घडणार असे मनाशी ठाम केले जाते.आणि ह्या विश्वासानेच सर्वांसमोर तसे म्हणले जाते.

९) सोशल मीडिया वरून अंदाज बांधणे आणि मत बनविणे- सोशल मीडिया जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.सोशल मीडिया वर एखाद्या व्यक्तीचे ‘स्टेटस,पोस्ट’ काय आहेत, त्यावरून ती व्यक्ती कशी असू शकते याचा अंदाज लावला जातो.एक ठराविक पातळीपर्यंत हे ठीक आहे.पण सोशल मीडिया च्या आधारे संपूर्ण माणूस हा असाच आहे, हे मत बनविणे चुकीचे आहे. पण आजचा वाढता सोशल मीडिया प्रभाव माणसाविषयी पटकन अंदाज बांधत आहे आणि मत बनवत आहे.

१०) अति भावनिकता – कधी पत्नी खूप भावनिक असते तर कधी पती.मग ही भावनिकता व्यावहारिकपणे वागू देत नाही.मग कधी आपला जोडीदार अयोग्य जरी वागला तरी ,’त्याला काही तरी अडचण असेल, म्हणून तो /ती तसा वागला/वागली.मग चुका पाठीशी घातल्या जातात.आणि ती व्यक्ती खूप चांगली आहे, माझ्यावर खूप प्रेम करते हे दाखविण्याची धडपड सुरू होते, तेही सर्वांसमोर.

वरील अशा काही चुका माणसं करीत आहेत, जे सर्वांसमोर म्हणत असतात,’आमचं नातं छान सुरू आहे’.समाधानी असणे खूप चांगली गोष्ट आहे.पण ‘छान आहे’ ह्या तातपर्यावर पोहचण्याआधी वरील गोष्टी देखील विचारात घेतल्या पाहिजेत.कारण हे खरे शहाणपणाचे आणि ‘म्याचुरिटीचे’ लक्षण असते. आणि मग खात्री करूनच इतर जणांकडे आपल्या नात्याविषयी बोलले पाहिजे.

सत्य कधीच बदलत नाही.आणि म्हणूनच ते स्वीकरता आले पाहिजे. उगाच सर्वांना सांगायचे आहे म्हणून आहे ते सर्व ‘गुडी गुडी’ आहे असे म्हणण्याला काहीच अर्थ उरत नाही.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!