तिला नाही म्हणायचं असतं.. पण लग्नानंतरच्या समाजमान्य वृत्तींमुळे ती आजही स्वतःला तयार करते.
टीम आपलं मानसशास्त्र
भारत म्हणले की पुरुष प्रधान संस्कृती, आणि संस्कार , रूढी , रीती रिवाज , याखेरीज घरातल्या मोठ्यांची मते आणि निर्णय, ज्यापुढे कोणाचे ही काही चालत नाही. त्यात स्त्री चे तर नाहीच नाही. जे कोणी कसे वागवतील तसे ..मग अत्याचार , हुंडाबळी , बालविवाह , बलात्कार हे सगळे सहन करावे लागे. त्यातून आत्महत्या होत.
आजच धर्मवीर सिनेमा बघितला त्यात आनंद दिघे साहेबांच्या पुढे एक वडील आणि आई आपल्या मुलीची ओढणी ठेवतात. आणि सांगतात याच ओढणीने आमच्या मुलीने जीव दिला असे सांगतात. कारण काय विचारले तर बलात्कार केला होता तिच्यावर आणि दीड वर्ष कोर्ट केस चालू होती आणि काल तो बलात्कारी निर्दोष मुक्त झाला. म्हणून आमच्या मुलीने आत्महत्या केली. तेव्हा त्या गुन्हेगाराला तडफडून मारताना कुठे तरी त्या मुलीच्या .ताईच्या आई वडिलांना न्याय मिळवून देणारे आनंद दिघे असे फार कमी असतात.
पण बहुतेक वेळा स्त्री ही तिला कोणते महत्व नाही. तिच्या मताची गरज नसते. तर तिच्यावर मते लादली जातात. आता काही ठिकाणी खूप सुधारणा झाल्या आहेत. पण तरी ही बऱ्याच ठिकाणी स्त्री वर मते लादली जातात. काही स्त्रिया ज्यांना त्यांचे मत विचारात न घेता त्यांची लग्न परस्पर ठरवली जातात. लग्नानंतर स्त्री ला बऱ्याच बदलांना सामोरे जावे लागते. कधी तिचे शरीर तयार नसते. कधी मन तयार नसते. जरी लग्न झाले तरी बायकोला समजून घेवून , तिच्या सोबत गप्पा टप्पा करत , तिला फुलवत शारीरिक संबंध करणारा नवरा फार कमी वेळा दिसून येतो.
कधी बायको दिवसभराच्या व्यापात , घरकाम , बाहेरची कामे , ऑफिस असेल ऑफिस कामे यातून खूप दमते. त्यावेळी रात्री सगळे घरकाम आवरून पटकन मस्त झोपण्याच्या मूड मध्ये असलेली बायको नवऱ्याला जर संबंध पाहिजेच असेल तर नाईलाजास्तव तयार होते. याचे कारण तिला नाही म्हणायचं असतं.. पण लग्नानंतरच्या समाजमान्य वृत्तींमुळे ती आजही स्वतःला तयार करते.
अशा समाजमान्य वृत्ती काय असतात किंवा कोणत्या असतात. तर पुरुष म्हणेल तसे म्हणेल तेव्हा स्त्रीने केलेच पाहिजे. लग्न झाले किंवा लग्न केले म्हणजे बायको ची ईच्छा आहे का नाही .किंवा तिला काही प्रोब्लेम आहे का याचा विचार न करता केवळ आपल्याला पाहिजे तेव्हा शारीरिक सुख घेणे आणि ते झालं की परत तिला प्रेमाने जवळ घेणे राहिले बाजूला आपले आपण झोपी जाणे अशीच काहीशी वृत्ती. खरे तर आता तुम्हाला धर्मवीर सिनेमा चा reference इथे लागेल की असे नवऱ्याने बायकोची इच्छा,गरज , त्रास न समजता त्याला पाहिजे तेव्हा तिच्याशी संबंध ठेवून स्वतः पुरता विचार करून गरजा पूर्ण करून घेणे म्हणजे ही तिच्यावर एक प्रकारचा बलात्कार च आहे ना ? पण तो तिने सहन करायचा कारण काय तर पण लग्नानंतरच्या समाजमान्य वृत्ती. त्याचमुळे तिने त्याला ही ती आजही स्वतःला तयार करावे लागते.नसेल तरी तिची पर्वा नसते.
झोपडपटटीवासी जे आहेत तिथे तर सर्रास दारू ढोसून येवून बायको ला मारहाण करून स्वतः मधली कमतरता जी तो उद्योग धंदा , नोकरी करू शकत नाही. किंवा कमवलेले कमी असते ते frustration काढण्यासाठी बायकोला आपल्याला वाटेल तसे तिच्या सोबत करणारे आहेत. आणि शेजारी पाजारी गप्प बसतात कारण आपल्यावर काही नको यायला. ते त्या नवरा बायकोच आहे. त्यात नको पडायला म्हणून तमाशे बघत बसतात.
बायको नवऱ्याला त्यावेळी नाही म्हणणे म्हणजे समाज आणि नातेवाईक , वडीलधारी यांचा रोष पत्करणे , तो म्हणतो तर दे की त्याला तुला काय एव्हढे जमत नाही का ? तुला द्यायचे नसेल तर मग तो बाहेर कुठे गेला तर ती तुझी चुक . आम्ही कोणी जबाबदार नाही.
अगदी लग्न होवून मुलगी माहेराहून सासरी जाताना ही आई वडील , माहेरचे सगळे हेच सांगतात की जावई बापूंना सांभाळ हुं. त्यांना विरोध करू नको. ते म्हणतील तसे वाग. थोडे त्यांना पाहिजे तसे कर. लग्न झाले की आपले असे काही राहत नाही.
हे सगळे जरी दिले बायकोने तरी काही पुरुष असे असतात की हे तर माझे हक्काचे आहे. पाहिजे तेव्हा मला हे मिळणार आहेच. पण जसे रोजच्या जेवणात थोडा बदल म्हणून जसे कधी त्तरी एकदम तिखट , मसालेदार जेवण आवडते. तर कधी गोड आवडते. कधी अगदी सात्विक वरण भात आवडतो. तसे जरा चवीत बदल म्हणून किंवा अजून जास्त सुख मिळेल म्हणून बाहेर ही संबंध असतात. ते समाज आणि वडीलधारी यांना मान्य असतात कारण काय तर तो पुरुष आहे म्हणून सगळे चालून जाते.
आणि बाहेर जरी काही असेल तर बायकोने नाही
म्हणायचं असतं.. कारण तिला तिच्या हक्काच्या नवऱ्यात , सुखात इतर कोणाचा वाटा नको असतो. आणि नवऱ्याचे बाहेर कोणा स्त्री सोबत , अनेक स्त्रियानच्या सोबत संबंध असतील तर काही रोग , आजारपणे आपल्याला येवू नयेत म्हणून बायकोने टाळण्याचा प्रयत्न केला तरी ही लग्नानंतरच्या समाजमान्य वृत्तींमुळे ती आजही स्वतःला तयार करते. कारण समाज तिलाच दोष देतो .तिची चूक समजतात सगळे. किंवा तिला चारित्र्यहीन ठरवतात. ती नवऱ्याला सुख देत नाही म्हणजे दुसऱ्या कोणा सोबत संबंध जोडून तिला बदनाम करतात. घमेंड आहे असे समजतात.
याउलट जर खरेच सुनेने , बायकोने जर कोणाशी किंवा अनेक पुरुषांशी बाहेर संबंध ठेवले तर ते समाज , घरचे, नवरा हे स्वीकारू शकतील का ?? कदापि नाही. काही वेळेस बायकोला संबंधांच्या वेळी त्रास होत असतो
. तो समजून न घेता किंवा त्यावर कोणते इलाज न करता तिने तरी ही ते द्यावेच किंवा नवरा घेतोच असे असतें कारण तुच एकटी काय वेगळी आहेस का सगळ्या बायका आपल्या नवऱ्याला म्हणेल तेव्हा देतात ना मग तुला कुठले त्रास आले. तू काय जगावेगळी लागून गेलीस का .. असे नाना तऱ्हेने तिला मेंटल torcher करत असतात. त्यामुळे अजूनही तिला नाही म्हणायचं असतं.. पण लग्नानंतरच्या समाजमान्य वृत्तींमुळे ती आजही स्वतःला तयार करते.
आता बऱ्याच ठिकाणी थोडे परिवर्तन घडून येत आहे पण अजून ही आपल्या समाजाची , घरातल्यांची , वडीलधारी मंडळींची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तिला तयार व्हावेच लागेल.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
