कुटुंबात असलो की एकटं रहावसं वाटतं आणि एकटा असलो की कुटुंबात रहावसं वाटतं, हे असं का होतं ?
मयुरी महाजन
माणूस समजशील प्राणी आहे, आणि समाजासोबत राहणे ही माणसाची गरज आहे, आपल्या माणसांसोबत कुटुंबात राहणे, हा माणसाच्या जगण्याचा तो अति महत्त्वाचा टप्पा आहे, हे जरी खरं असलं तरी कुटुंबासोबत जगत असताना जगण्याची धावपळ, मनाची फरफड कितीही म्हटलं तरी कधीतरी होणारे वादविवाद भांडणे ,कामाचे प्रेशर, या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना, माणसाला कुठेतरी शांतता ,निवांतपणा ,व स्वतःसाठी एकटेपणा हवा असतो, ऐकांतात माणसाची ओळख होते ती, स्वतःशी, स्वतःला नव्याने जाणून घेण्याची, तसे तर आपण भरपूर लोकांना भेटतो, परंतु स्वतःला भेटायचं असेल, तर त्यासाठी एकांतच हवा….
कुटुंबात माणसाला कधी कधी जेव्हा कुणी समजून घेणार नसतं, तेव्हा तो एकांत गाठतो ,एकटा राहतो, कुटुंबाच्या बाबतीत आपण काही बोललो, तरी परिवारातील व्यक्ती त्या नकारात्मक बाजूनेच बघणार, त्यामुळे व्यक्ती शांत होऊ लागते, व्यक्ती ला कोणालाही स्पष्टीकरण देऊ वाटत नाही, आपली बाजू कशी योग्य हे कोणालाही समजावू वाटत नाही, व्यक्ती त्याच्या जगात वावरणे, पसंत करते, एकटे राहू लागते, म्हणून कुटुंबात असताना व्यक्तीला कधी कधी एकटच राहू वाटतं, आपला आयुष्य आपल्याच पद्धतीने जगावसं वाटतं, ज्यात कोणाची बंधने नसतील, कोणाच्या काही अपेक्षा नसतील, कोणी कोणासाठी असण्यापेक्षा, आपण आपल्यासाठी आहोत, हे जाणवले की व्यक्ती एकांताकडे वळते, परंतु एकांत हा काही ठराविक वेळे पुरताच असलेला कधीही चांगला, पूर्णवेळ एकांतात राहणे, म्हणजे आपल्या सामाजिक गरजेपासून लांब राहणे,
माणूस भावनिक आहे ,त्याच्या भावना त्या त्याच्या मुडनुसार बदलत असतात, त्या चंचल असतात, सकाळी रागात असलेली व्यक्ती काही वेळेनंतर हसताना दिसते ,तर क्षणापूर्वी दुःखाची भावना घेऊन रडणारी व्यक्ती काही वेळेनंतर अगदी मजेत गाणी ही गुणगुणत असते, सर्वांन खेळ भावनांचा आहे,
एका गोष्टीतून मन भरले की व्यक्ती लगेच दुसऱ्या गोष्टीकडे वळते, त्यासाठी व्यक्ती एकांतात असली, तरी व्यक्ती जास्त काळ एकांतात राहू शकत नाही हा माणूसाचा एक गुण आहे ,जेव्हा आपल्या जीवनात भावनांचा समतोल नसतो, तेव्हा आपली भावनिक गाडी काहीतरी याच प्रकारे बिघडलेली असते की कुटुंबात असल्यावर एकांत हवा असं वाटत, तर एकांतात असल्यावर कुटुंबासोबत राहावंसं वाटतं ,असं का होतं…. त्यापैकी काही कारण म्हणजे कुटुंबीयांबद्दल मनात अविश्वासाची भावना असू शकते, आपल्या भावनांना घरात काही किंमत नाही असे वाटू शकते ,व व्यक्ती आपल्या भावनांशी पूर्ण पणे एकरूप नसते, आपल्या भावनांविषयी खूप जास्त विचार करणारे असते,
आपल्या कुटुंबाशी आपले भावनिक तार जोडलेले असतात, त्यामुळे आपण एकांत गाठला तरी भावनिक स्थिरता आल्यावर परत आपण आपल्या कुटुंबाजवळ येतोचं, त्यांच्या शिवाय आपलं अस्तित्व नाही, आपली नाळ जोडलेली असते आपल्या कुटुंबासोबत…
ज्या वेळेस व्यक्तीला समजून घेणारं कुणी नसतं, किंवा समजावून सांगूनही समोरची व्यक्ती ते चुकीचं समजू लागते, तेव्हा व्यक्ती कुटुंबापासून एकांतात जाऊ लागते, जरी रागात व्यक्ती कुटुंबापासून एकांतात जाऊ लागली ,तरी परत फिरून ती कुटुंबाकडे येतेच, कारण आपलं खरं अस्तित्व हे आपलं कुटुंबचं आहे, कारण की जगात अशी कितीतरी लोक आहेत, ज्यांचं कुटुंबच नाही…
ऐके ठिकाणी ऐकलेले काही शब्द आठवतात ,ते म्हणजे घर सोडून रागात गेलेला एक मुलगा जेव्हा तिसऱ्या दिवशी घरी परत येतो, तेव्हा बाप त्याला उत्तर देतो, भेटा दुनियादारीच्या बाजारात आपल्या कुटुंबाशिवाय जगणे कठीण आहे, रागात गेलास हरकत नाही, कुणीतरी एक दिवस खाऊ घालेलं, दोन दिवस, काही महिने, किंवा काही वर्ष ,पण शेवटी आयुष्यभर जे आपल्याला सांभाळतात ,आपल्या चुका मोठ्या मनाने माफ करतात ,ते फक्त आपल्या आई वडील असतात ,
रुपयाची किंमत बाप नसल्यावर, व ताटातल्या घासाची किंमत आई नसल्यावर कळत असते ,जरी घरातील व्यक्तींवर राग असेल ,तरी त्या रागावण्याच्या पाठीमागच्या उद्देशाचीही आपण पडताळणी करायला हवी, निवांतपणे त्यावर विचार करायला हवा, आपले कुटुंब आपल्या जगण्याच्या पाठीमागची खरी पार्श्वभूमी आहे…..
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
Mast